इसा टी'ने जगातील पहिल्या मायक्रोप्लास्टिक-मुक्त कॉटन टी बॅग्स लॉन्च केल्या
July 22, 2024
0
इसा टी'ने जगातील पहिल्या मायक्रोप्लास्टिक-मुक्त कॉटन टी बॅग्स लॉन्च केल्या
~ या बायोडिग्रेडेबल टी बॅग्स फक्त पाच रुपयांपासून उपलब्ध ~
मुंबई : थेट ग्राहकांना विकला जाणारा आसामचा चहा, इसा टी या ब्रँडने जगातील पहिल्या मायक्रोप्लास्टिक-मुक्त कॉटन टी बॅग्स लॉन्च केल्याची घोषणा केली आहे. अतिशय नाविन्यपूर्ण अशा या टी बॅग्स रसायनांपासून १००% मुक्त, बायोडिग्रेडेबल आणि हातांनी बनवलेल्या आहेत. पर्यावरणपूरकता, शाश्वतता व ग्राहकांच्या आरोग्याप्रती ब्रँडची अढळ बांधिलकी यामधून अधोरेखित होत आहे. एका टी बॅगची किंमत फक्त ५ रुपये असल्याने सध्या बाजारपेठेत उपलब्ध असलेले हे एक सर्वात स्वस्त उत्पादन आहे. मॅकगिल युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी सादर केलेल्या एका निष्कर्षानुसार सर्वत्र वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक टी बॅग्स प्रत्येक कपामध्ये जवळपास ११.९ बिलियन हानिकारक मायक्रोप्लास्टिक पार्टिकल्स निर्माण करतात. यातील धोक्याची घंटा लक्षात घेऊन इसा टी ब्रँडने तातडीने पावले उचलत हा चपखल उपाय काढला आहे.
इसा टीचे संस्थापक आणि सीईओ श्री बिजित शर्मा यांनी सांगितले, "इसा टी ब्रँड उत्तम चहा पुरवतो, इतकेच नाही तर शेकडो वर्षांपासून चालत आलेल्या समृद्ध चहा परंपरेचे जतन करण्याचे काम देखील हा ब्रँड करत आहे. मायक्रोप्लास्टिक-मुक्त कॉटन टी बॅग्स आणणे हे फक्त एक प्रॉडक्ट लॉन्च नाही तर चहा उत्पादन व चहाचा आस्वाद घेण्याप्रती आपल्या दृष्टिकोनामध्ये आम्ही आमूलाग्र परिवर्तन घडवून आणू इच्छितो. एका अतिशय गंभीर आरोग्य आणि पर्यावरण समस्येचे निवारण करण्याबरोबरीनेच चहाचा आस्वाद घेण्याच्या अनुभवात वाढ करण्याचा आमचा उद्देश आहे. अतुलनीय गुणवत्ता, जबाबदारीचे भान राखून केले जाणारे उत्पादन आणि पर्यावरणाप्रती बांधिलकी या सर्व गोष्टी एकत्र आणल्या जाऊ शकतात यावर आमचा ठाम विश्वास असून या लॉन्चमधून तो दर्शवला गेला आहे. आमच्या संशोधन व विकास टीमचे आम्ही आभारी आहोत, त्यांच्या अथक प्रयत्नांमुळेच या विषमुक्त टी बॅग्स तयार होऊ शकल्या आहेत. जागरूक, जाणकार आणि चोखंदळ ग्राहकांनी पर्यावरणपूरकतेचा आनंद घेत, जबाबदारीचे भान राखत असल्याचे समाधान मिळवत इसा टीचा आस्वाद घ्यावा यासाठी आम्ही त्यांना आमंत्रित करत आहोत."
इसा टीच्या उत्पादन श्रेणीमध्ये २० पेक्षा जास्त प्रकार आहेत. हनी लेमन ग्रीन टी, ऑरगॅनिक आसाम ब्रेकफास्ट टी, ऑरगॅनिक हॅन्डमेड ब्लॅक टी आणि ऑरगॅनिक ब्ल्यू टी, ऑरगॅनिक लिची ब्लॅक टी, ऑरगॅनिक कॅमोमाइल ग्रीन टी, ऑरगॅनिक पीच ग्रीन टी, ऑरगॅनिक वॅनिला चाय आणि रोज लिची ब्लॅक टी यासारखे विविध विशेष स्वादयुक्त पर्याय यामध्ये आहेत. कार्डमम, मसाला, कडक चाय असे इन्स्टन्ट चहाचे पर्याय देखील त्यांच्याकडे आहेत. त्याबरोबरीनेच आरोग्याविषयी विशेष जागरूक असा इन्स्टन्ट मँगो टर्मरिक लाटे आहे. १९९ रुपयांपासून ३९९ रुपयांपर्यंतच्या किमतीची इसा टी उत्पादने संपूर्ण देशभरात ऑनलाईन चॅनेल्समार्फत खरेदी करता येतात. अधिकृत ब्रँड वेबसाईट तसेच ऍमेझॉनवर ती उपलब्ध आहेत.
इसा टीची मुहूर्तमेढ २०२१ साली रचली गेली. तेव्हापासून आजवर या ब्रँडने लक्षणीय प्रगती साध्य केली आहे. सुरुवातीला १० प्रीमियम स्टोर्समध्ये उपलब्ध असलेला हा ब्रँड आता भारतभरात ६०० पेक्षा जास्त दुकानांमध्ये विकला जातो. देशाबाहेर यूएसए, दक्षिण कोरिया, अबुधाबी आणि युके अशा १० पेक्षा जास्त देशांमध्ये इसा टीची निर्यात केली जाते. १००००० जास्त ग्राहक ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने हा ब्रँड खरेदी करतात व ही संख्या सातत्याने वाढत आहे.