Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

अॅल्युमिनियम खिडक्यांचा अव्वल ब्रॅण्ड 'एटर्नियाचा' महाराष्ट्रात विस्तार

अॅल्युमिनियम खिडक्यांचा अव्वल ब्रॅण्ड 'एटर्नियाचा' महाराष्ट्रात विस्तार ~ लोणावळा येथील शोरूमचे उद्घाटन करत आपले कार्यक्षेत्र विस्तारले ~ मुंबई: हिंडाल्कोचा एक विभाग असलेल्या एटर्नियाने महाराष्ट्रातील लोणावळा येथे आपल्या सर्वात नव्या ब्रॅण्ड शोरूमचा भव्य उद्घाटन सोहळा पार पडल्याची घोषणा मोठ्या अभिमानाने केली आहे. अॅल्युमिनियमपासून हिंडाल्कोने विकसित केलेल्या व स्वामित्व हक्क प्राप्त दुरेनियम या मिश्र धातूपासून बनविलेल्या खिडक्यांचा भारतातील अव्वल ब्रॅण्ड एटर्निया आता या स्टेट-ऑफ-द-आर्ट शोरूममध्ये आपल्या विवा (WiWA) प्रमाणित खिडक्या मांडणार आहे. या खिडक्या आवाज, प्रदूषण, पाणी गळणे आणि वेगवान वादळी वाऱ्यांपासून संरक्षण पुरविण्याच्या दृष्टीने अत्यंत कष्टपूर्वक निर्माण करण्यात आल्या असून येथील निवासी जागांच्या गरजा नेमकेपणाने पुरविणाऱ्या आहेत. लोणावळ्यातील एटर्निया स्टोअर हे वर्सोली येथे स्थित असून हे लोणावळ्यातील रहिवाशांना उत्कृष्ट दर्जाची यंत्रणा असलेल्या अॅल्युमिनियम खिडक्यांचे पर्याय देण्यासाठी विशेषत्वाने उघडण्यात आले आहे.
देशभरामध्ये आपले अस्तित्त्व भक्कमपणे प्रस्थापित करण्याचे लक्ष्य बाळगून असलेल्या एटर्नियाच्या महत्त्वाकांक्षी विस्तार धोरणातील एक लक्षणीय टप्पा या स्टोअरच्या उद्घाटनामुळे गाठला गेला आहे. लोणावळ्यामध्ये प्रवेश करून ब्रॅण्डने उदयोन्मुख बाजारपेठांतील संधींचा लाभ घेण्याप्रती आणि ग्राहकांच्या बदलत्या गरजांची पूर्तता करण्याप्रती आपली बांधिलकी दाखवून दिली आहे. किरकोळ विक्रीसाठीच्या या आउटलेटमध्ये ग्राहकवर्गाच्या विशिष्ट गरजांनुसार बेतलेल्या उत्पादनांची वैविध्यपूर्ण श्रेणी उपलब्ध असणार आहे, ज्यामुळे त्यांना खरेदीच्या अशा एका असाधारण अनुभवाची हमी मिळणार आहे जिथे त्यांना खरेदी करण्यापूर्वी उत्पादनांचे पर्याय व्यवस्थित तपासता येतील व त्यांच्याशी परिचित होता येईल. लोणावळ्यातील एटर्निया स्टोअरचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री संजय (बाळा) विश्वनाथ भेगडे यांच्या हस्ते पार पडले. आदित्य बिर्ला समूहातील कंपनी हिंडाल्को इंडस्ट्रीज लिमिटेडच्या एटर्निया विभागाच्या हेड ऑफ मार्केटिंग श्रीम. नेहल बझरी म्हणाल्या, “एटर्निया उत्कृष्ट दर्जाच्या अॅल्युमिनियम खिडक्या आणि दारे आदी उत्पादने लोणावळ्यामध्ये उपलब्ध करून देताना आम्ही अत्यंत भारावलो आहोत. उदयोन्मुख बाजारपेठेतील चोखंदळ होमओनर्सना उच्च दर्जाची, नाविन्यपूर्ण उत्पादने पुरविण्याप्रती आमच्या बांधिलकीचे प्रतिनिधीत्व हे शोरूम करते. आमच्या विवा प्रमाणित दुरेनियम या मिश्रधातूपासून बनलेल्या खिडक्यांच्या माध्यमातून आम्ही पर्यावरणीय घटकांपासून अतुलनीय संरक्षण देऊ करत आहोत व त्याचवेळी घरांचे सौंदर्यही वृद्धिंगत करत आहोत. हे उद्घाटन म्हणजे आमच्या देशव्यापी विस्तारधोरणातील एक लक्षणीय पाऊल आहे आणि नाजूकपणा, टिकाऊपणा व प्रगत तंत्रज्ञान यांना एकत्र आणणारी आमची उत्पादने लोणावळ्यातील लोकांना पुरविण्यास आम्ही उत्सुक आहोत.”

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.