एसीटी फायबरनेटची पुण्यामध्ये हाय-स्पीड इंटरनेट सेवा
July 22, 2024
0
एसीटी फायबरनेटची पुण्यामध्ये हाय-स्पीड इंटरनेट सेवा
~ देशामध्ये पहिल्यांदाच प्रतिमहिना १४९९ रूपयांमध्ये गिगा प्लॅन लॉन्च ~
पुणे: एसीटी फायबरनेट या भारतातील आघाडीच्या फायबर ब्रॉडबँड आयएसपीने (इंटरनेट सर्विस प्रोव्हायडर्स) आज महाराष्ट्रातील पुणे येथे त्यांच्या सर्विसेसच्या विस्तारीकरणाची घोषणा केली. हाय-स्पीड आणि विश्वसनीय फायबर ऑप्टिक इंटरनेट सर्विसेस् आता कस्पटे वस्ती, खराडी, पिंपल निलख, साईनाथ नगर, शंकर कलाटे नगर, वडगाव शेरी आणि विमान नगर येथे लाँच करण्यात आल्या आहेत. ते नजीकच्या भविष्यात पुण्याच्या बहुतांश भागांमध्ये त्यांच्या सेवा विस्तारित करतील.
एसीटी फायबरनेट ग्राहकांच्या विविध गरजा व बजेट्सची पूर्तत करणाऱ्या ब्रॉडबँड प्लॅन्सची श्रेणी देते. आपल्या स्पीड-आधारित प्लॅन्सचा भाग म्हणून एसीटी अनलिमिटेड डेटासह चार विभिन्नप्लॅन्स देते. ५४९ रूपयांपासून सुरूवात होत एसीटी बेसिस १०० एमबी/सेकंद गती देते, ६९९ रूपयांमध्ये एसीटी वेलकम २०० एमबी-सेकंद गती देते, एसीटी पुणे गोल्डची किंमत ९९९ रूपये आहे, जे ५०० एमबी/सेकंद गती देते आणि एसीटी गिगा१४९९ रूपयांमध्ये १००० एमबी/सेकंद गती देते.
एसीटी फायबरनेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. बाला मल्लादी म्हणाले, “आम्हाला उत्साही पुणे शहरामध्ये एसीटी फायबरनेट च्या हाय-स्पीड इंटरनेट सेवा लाँच करण्याचा आनंद होत आहे. आमची पुणेकरांना अत्यंत गतीशील, विश्वसनीय कनेक्टीव्हीटीसह सक्षम करण्याचे मिशन आहे, ज्यामुळे त्यांचे डिजिटल जीवन अधिक उत्साहित होईल. प्युअर, स्पीड व एंटरटेन्मेंट बंडल्सचा समावेश असलेल्या आमच्या प्लॅन्सच्या श्रेणीसह आम्ही पुण्यातील टेक-प्रेमी निवासी आणि व्यवसायांच्या विविध गरजांची पूर्तता करण्याप्रती कटिबद्ध आहोत. विनासायास वर्क-फ्रॉम-होम अनुभवांपासून बफर-फ्री स्ट्रिमिंग व गेमिंगपर्यंत एसीटी फायबरनेट पुण्यातील इंटरनेट वापरामध्ये क्रांतिकारी बदल घडवून आणण्यास सज्ज आहे. आम्ही पुणेकरांना एसीटी अडवान्टेजचा अनुभव देण्याप्रती कटिबद्ध आहोत.''
एंटरटेन्मेंट प्लॅन्समधील सर्वात किफायतशीर पर्याय एसीटी बेसिक एंटरटेन्मेंटची किंमत ६४८ रूपये आहे आणि १०० एमबी/सेकंद गतीसह डिस्नी+ हॉटस्टार, झी५, सोनी लिव्ह आणि ३०० हून अधिक टीव्ही चॅनेलससाठी मोफत स्ट्रिमिंग देते. ७९८ रूपयांमध्ये ग्राहक एसीटी वेलकम एंटरटेन्मेंटमध्ये अपग्रेड होऊ शकते, जे गती २०० एमबी/सेकंदपर्यंत दुप्पट करते आणि बेसिक प्लॅनप्रमाणे त्याच स्ट्रिमिंग सेवा देते. ९४८ रूपयांमध्ये एसीटी वेलकम स्ट्रिमिंग प्लॅन २०० एमबी/सेकंद गती देते आणि इतर स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म्सच्या पॅकेजमध्ये नेटफ्लिक्सची भर करते. उच्च गतींसाठी पुणे सिग्नेचर प्लॅन १०४८ रूपयांमध्ये उपलब्ध असून ३०० एमबी/सेकंद गती आणि सर्व स्ट्रिमिंग सेवा देते. तसेच १२४८ रूपयांमध्ये एसीटी प्लॅटिनम स्ट्रिमिंग प्लॅन ५०० एमबी/सेकंद गती आणि सर्व स्ट्रिमिंग सेवा देते. प्रीमियम एसीटी गिगा स्ट्रिमिंग प्लॅनची किंमत १७९८ रूपये आहे आणि प्रभावी १००० एमबी/सेकंद गती व सर्व स्ट्रिमिंग सेवा देते. सर्व प्लॅन्स अनलिमिटेड डेटा, तसेच राउटरसह येतात.