Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

लिव्‍हप्‍युअरकडून पहिल्‍या तिमाहीच्‍या निकालांमध्‍ये प्रबळ वाढीची नोंद

लिव्‍हप्‍युअरकडून पहिल्‍या तिमाहीच्‍या निकालांमध्‍ये प्रबळ वाढीची नोंद मुंबई: लिव्‍हप्‍युअर या भारतातील ग्राहकांच्‍या आरोग्‍याप्रती समर्पित आघाडीच्‍या व सर्वात विश्‍वसनीय ग्राहक-केंद्रित ब्रँडने आपल्‍या पहिल्‍या तिमाहीमध्‍ये सर्व व्‍यवसाय श्रेणींत अपवादात्‍मक ४५ टक्‍के वाढीची नोंद केली, जेथे आर्थिक वर्ष २४ च्‍या पहिल्‍या तिमाहीमध्‍ये ५० टक्‍के वाढीची नोंद केल्‍यानंतर या वाढीची नोंद केली आहे. कंपनीच्‍या कामगिरीमधून प्रबळ बाजारपेठ मागणी आणि त्‍यांच्‍या व्‍यवसाय धोरणांची यशस्‍वी अंमलबजावणी दिसून येते, ज्‍यामुळे आगामी वर्षासाठी प्रबळ पाया रचण्‍यात आला आहे. पहिल्‍या तिमाहीच्या निकालांमधून विविध विक्री चॅनेल्‍स आणि उत्‍पादन श्रेणींमधील प्रभावी वाढ दिसून येते. मॉडर्न ट्रेड महसूल उल्‍लेखनीय १९७ टक्‍के वाढीसह अग्रस्‍थानी होता, तर जनरल ट्रेड विक्रीमध्‍ये ९२ टक्‍क्‍यांची वाढ झाली. ई-कॉमर्सने ३६ टक्‍के वाढीसह प्रगतीच्‍या दिशेने वाटचाल कायम ठेवली, ज्‍यामधून लिव्‍हप्‍युअरची प्रबळ ऑनलाइन उपस्थिती निदर्शनास येते. कंपनीचे वैविध्‍यपूर्ण धोरण अत्‍यंत यशस्‍वी ठरले, जेथे कूलर श्रेणीमध्‍ये ६ पट प्रबळ वाढ झाली. लिव्‍हप्‍युअरची प्रमुख उत्‍पादन श्रेणी वॉटर प्‍युरिफायर्सने २१ टक्‍क्‍यांची स्थिर वाढ केली.
लिव्‍हप्‍युअरच्‍या सेवा-केंद्रित विभागांनी देखील उल्‍लेखनीय कामगिरी केली. सेवा महसूलामध्‍ये ३३ टक्‍क्‍यांची वाढ झाली, ज्‍यामधून अधिक ग्राहक सहभाग व समाधान दिसून येते. उल्‍लेखनीय बाब म्‍हणजे, नाविन्‍यपूर्ण वॉटर-अॅज-ए-सर्विस (डब्‍ल्‍यूएएएस) सबस्क्रिप्‍शन मॉडेलला मोठा प्रतिसाद मिळाला, जेथे सबस्‍क्रायबर सदस्‍यांची संख्‍या ५१ टक्‍क्‍यांनी वाढली. लिव्‍हप्‍युअरचे व्‍यवस्‍थापकीय संचालक श्री. राकेश कौल म्‍हणाले, ''आमच्‍या पहिल्‍या तिमाहीचे निकाल लिव्‍हप्‍युअरच्‍या नाविन्‍यता व ग्राहक समाधानाप्रती कटिबद्धतेशी परिपूर्ण संलग्‍न आहेत. आमच्‍या एअर कूलर श्रेणीमधील असाधारण वाढ, तसेच डब्‍ल्‍यूएएएस सबस्‍क्रायबर्समधील मोठ्या वाढीमधून आमची उत्‍पादन विविधता व सबस्‍क्रिप्‍शन-आधारित मॉडेल्‍सचे यश दिसून येते. या आकडेवारीमधून आमचे यश निदर्शनास येते आणि आगामी तिमाहींमधील शाश्‍वत विकासासाठी मंच स्‍थापित करते. आम्‍ही नाविन्‍यता आणण्‍यासह ग्राहकांच्‍या बदलत्‍या गरजांची पूर्तता करण्‍याचा प्रयत्‍न करत असताना आम्‍हाला विश्‍वास आहे की लिव्‍हप्‍युअर ही विकासगती कायम ठेवेल, ज्‍यामुळे होम अप्‍लायन्‍स आणि वॉटर प्‍युरिफिकेशन मार्केट लीडर म्‍हणून आमचे स्‍थान अधिक दृढ होईल. या तिमाहीचे निकाल लिव्हप्‍युअर आणि आमच्‍या ग्राहकांसाठी हे वर्ष परिवर्तनात्‍मक असण्‍यावरील आमच्‍या विश्‍वासाची फक्‍त सुरूवात आहे.''

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.