फाइंडॅबिलिटी सायन्सेसने बदलली ‘औरंगाबाद’ची तंत्रज्ञान जगतातील ओळख
July 28, 2024
0
फाइंडॅबिलिटी सायन्सेसने बदलली ‘औरंगाबाद’ची तंत्रज्ञान जगतातील ओळख
मुंबई, १८ जुलै २०२४: औरंगाबाद हे ऐतिहासिक आणि नाविन्यपूर्ण असे दोन्हीचे मिश्रण असलेले आधुनिक शहर आहे. अशा या प्रगतीशील शहरात 'फाइंडॅबिलिटी सायन्सेस' ही कंपनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात अग्रगण्य म्हणून उदयास आली आहे. या कंपनीने अत्याधुनिक तंत्रज्ञान, सर्वसमावेशक आणि व्यावसायिक (औद्योगिक) समृद्धीची संस्कृती या सर्वांचा अनोखा समन्वय साधला आहे. त्यामुळे विविध क्षेत्रातील प्रतिभावंत तंत्रज्ञ, या ऐतिहासिक शहराने आकर्षित केले आहेत. औरंगाबाद हे पारंपारिक पद्धतीने आय टी हब म्हणून ओळखले जात नसले तरी 'फाइंडॅबिलिटी सायन्सेस' ने या शहरात आपले असे अग्रगण्य कृत्रिम बुद्धिमत्ता इनोवेशन सेंटर स्थापित केले आहे. या कामगिरीमुळे औरंगाबादला जागतिक तंत्रज्ञान पटलावर स्थान मिळाले असून स्थानिक तंत्रज्ञान क्षेत्रातही क्रांती घडवून आणली आहे. शैक्षणिक संस्थांसोबत सहकार्य करून, इंटर्नशिप देऊन, आणि प्रगत तंत्रज्ञानावरील सेमिनार घेऊन कंपनी स्थानिक तंत्रज्ञान प्राविण्य विकसित करण्यास योगदान देत आहे.
'फाइंडॅबिलिटी सायन्सेस'चे इनोवेशन आणि विकासाचे प्रयत्न स्थानिक सीमा पार करतात. कंपनी एम्आयटी, टोकियो विद्यापीठ (टोडाई विद्यापीठ) आणि वूस्टर पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट यासारख्या प्रतिष्ठित संस्थांसोबत आदान-प्रदान कार्यक्रम राबवते. त्यामुळे औरंगाबादला आंतरराष्ट्रीय दर्जाचे तज्ञता मिळत आहे. कंपनीच्या विशेष उपक्रमाद्वारे, परदेशात किंवा बाहेरगावी कार्यरत असलेल्या अभियंत्यांना स्वगृही परत येऊनही आधुनिक अशा कृत्रिम बुद्धिमतेच्या प्रोजेक्टवर काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाते. या उपक्रमांमुळे स्थानिक आर्थिक वाढीस चालना मिळून, कुटुंबियांच्या कल्याणालाही बळकटी येते.
'फाइंडॅबिलिटी सायन्सेस' मध्ये कर्मचाऱ्यांच्या कल्याण्याकडे विशेष लक्ष दिले जाते. नियमित क्रिडा स्पर्धा आणि शारिरीक आरोग्यासाठी व्यायामाचा सराव, यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये निरोगी आणि सतत कार्यरत राहण्यासाठीची जीवनशैली प्रोत्साहित केली जाते. इशा फाऊंडेशनच्या सहकार्याने घेतल्या जाणाऱ्या योग-वर्गामुळे मानसिक शांती व बौद्धिक समतोल राखण्यास मदत होते. 'फाइंडॅबिलिटी सायन्सेस' मध्ये मानसिक आरोग्याचीही तितकीच काळजी घेतली जाते. कॉर्पोरेट सक्सेस ट्रेनर श्री. सुनील पारेख यांच्या मार्गदर्शनाखाली घेतल्या जाणाऱ्या-कार्यक्रमांमध्ये 'मिरॅकल मॉर्निंग रिचुअल वर्कशॉप' यासारख्या उपक्रमांमुळे कर्मचाऱ्यांना यशस्वी आणि सुखी राहाण्यासाठी मदत होते. वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे 'फाइंडॅबिलिटी सायन्सेस' हे आणि असे विविध कार्यक्रम कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांसाठीही आयोजित करत असल्यामुळे कर्मचाऱ्यांना पूर्णपणे पाठिंबा मिळतो. 'फाइंडॅबिलिटी सायन्सेस' मध्ये सोयिस्कर कामाच्या वेळा आणि वाढीव रजा इ. पर्यायाद्वारे काम आणि वैयक्तिक जीवन यांचा समतोल साधला जातो. या तऱ्हेच्या सहकार्याने व्यावसायिक वृध्दीच्या संधी न गमावता वैयक्तिक जबाबदारीही पार पाडता येते.