Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*कोटक अॅक्टिव्‍हमनीकडून #SalaryKoJagao लाँच*

*कोटक अॅक्टिव्‍हमनीकडून #SalaryKoJagao लाँच* अॅक्टिव्‍हमनी देते सर्वोत्तम लिक्विडीटी आणि परतावे मुंबई ---- - कोटक महिंद्रा बँक लिमिटेडने ('केएमबीएल'/'कोटक') आज त्‍यांची देशव्‍यापी मल्‍टीमीडिया मोहिम #SalaryKoJagao लाँच केली, ज्‍यामध्‍ये बॉलिवुड सुपरस्‍टार रणवीर सिंग आहे. ही मोहिम कोटकची प्रमुख ऑफरिंग अॅक्टिव्‍हमनीवर केंद्रित करते आणि टीव्‍ही कमर्शियल्‍स, डिजिटल प्‍लॅटफॉर्म्‍स, आऊटडोअर डिस्‍प्‍लेज आणि सोशल मीडिया चॅनेल्‍सवर प्रसारित केली जात आहे.
व्‍यावसायिकांच्‍या गरजांची पूर्तता करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आलेली ही मोहिम त्‍यांना कोटकच्‍या अॅक्टिव्‍हमनी सोल्‍यूशनचा वापर करत त्‍यांचे वेतन 'अॅक्टिव्‍हेट' करण्‍यास प्रेरित करते. ही मोहिम कोटकची प्रमुख ऑफरिंग अॅक्टिव्‍हमनीबाबत जागरूकता निर्माण करते, जे व्‍यावसायिकांना त्‍यांचे वेतन सानुकूल करण्‍यास सक्षम करते. अॅक्टिव्‍हमनी सर्वोत्तम लिक्विडीटी, तसेच परतावे देते. यामध्‍ये अॅक्टिव्‍हमनी खात्‍यामधून निधी काढण्‍याचा किंवा कोणत्‍याही वेळी व्‍यवहारांसाठी निधींचा वापर करण्‍याचा पर्याय समाविष्‍ट आहे, ज्‍यासाठी कोणताही दंड आकारण्‍यात येत नाही. बचत खात्‍यांमधील निष्क्रिय निधी ट्रान्‍सफर करत ग्राहक प्रतिवर्ष जवळपास ७ टक्‍के* व्‍याज मिळवू शकतात. तसेच, सिस्‍टम आपोआपपणे १८० दिवसांसाठी प्रत्‍यक्ष त्‍यांच्‍या बचत खात्‍यांमधील अतिरिक्‍त निधीला अॅक्टिव्‍हमनी फिक्‍स्‍ड डिपॉझिट (एफडी) खात्‍यामध्‍ये हस्‍तांतरित करते. ही मोहिम स्थिर उत्‍पन्‍न असलेल्‍या व्‍यक्‍तींना लक्ष्‍य करते, ज्‍यामागे व्‍यावसायिकांच्‍या त्‍यांच्‍या वित्त व्‍यवस्‍थापनाच्‍या पद्धतींमध्‍ये क्रांतिकारी बदल घडवून आणण्‍याचा मनसुबा आहे. टीव्‍हीसी पाहण्‍यासाठी येथे क्लिक करा (Click here). कोटक महिंद्रा बँकेच्‍या रिटेल लायबिलिटीज प्रॉडक्‍टचे प्रमुख आणि चीफ मार्केटिंग ऑफिसर रोहित भासिन म्‍हणाले, ''अॅक्टिव्‍हमनी वैविध्‍यपूर्ण उत्‍पादन आहे, जे ग्राहकांना निष्क्रिय निधींचा वापर करण्‍यास मदत करण्‍यासाठी, तसेच लिक्विडीटी व परताव्‍यांची खात्री देण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आले आहे.
या मोहिमेच्‍या माध्‍यमातून आमचा ग्राहकांचा डायनॅमिक व झपाट्याने विकसित होत असलेला विभाग पगारदार व्‍यक्‍तींमध्‍ये जागरूकता निर्माण करण्‍याचा मनसुबा आहे. हे व्‍यक्‍ती केंद्रित, महत्त्वाकांक्षी आहेत आणि नेहमी त्‍यांची संपत्ती वाढवण्‍याच्‍या मार्गांचा शोध घेतात. अॅक्टिव्‍हमनी लिक्विडीटीबाबत तडजोड न करता मुदत ठेवी सारखे व्‍याज देते, जे या विभागातील ग्राहकांसाठी पाहिजे असलेली मूल्‍य भर आहे.'' जाहिरात सिरीज दोन जाहिरातींमध्‍ये अॅक्टिव्‍हमनीच्‍या फायद्यांना दाखवते. प्रमुख पात्र चतुर्वेदीजी व्‍यक्‍ती त्‍यांच्या निष्क्रिय निधीला कार्यान्वित करून प्रतिवर्ष जवळपास ७ टक्‍के* व्‍याज मिळवू शकण्‍याच्‍या प्रक्रियेला दाखवतो. कार्यालयीन वातावरणामध्‍ये स्थित ही जाहिरात खेळीमेळीसह महत्त्वाकांक्षी व्‍यावसायिकांसाठी निष्क्रिय निधी वाढवण्‍याचे महत्त्व सादर करते, ज्‍यांची जीवनात अधिक संपत्ती मिळवण्‍याची महत्त्वाकांक्षा असण्‍यासोबत त्‍यांच्‍या फायनान्‍सवर नियंत्रण ठेवण्‍यासाठी प्रेरणेची गरज आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.