Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*सॅमसंगकडून 'इंडिया चीअर्स फॉर नीरज' मोहिमेची घोषणा*

*सॅमसंगकडून 'इंडिया चीअर्स फॉर नीरज' मोहिमेची घोषणा* चाहते सॅमसंग इंडिया वेबसाइटच्‍या माध्‍यमातून शुभेच्‍छा देत नीरज चोप्राला पाठिंबा देऊ शकतात गुरूग्राम, भारत - जुलै ३१, २०२४: सॅमसंगने आज चाहत्‍यांना पुढाकार घेत 'इंडिया चीअर्स फॉर नीरज' मोहिमेच्‍या माध्‍यमातून नीरज चोप्राला त्‍यांच्‍या शुभेच्‍छा देण्‍यासाठी आवाहन करत असल्‍याची घोषणा केली. या मोहिमेच्‍या माध्‍यमातून सॅमसंग इंडियाचा नीरजला यशस्‍वी ठरण्‍यास आणि मर्यादांना दूर करण्यास प्रयत्‍न करण्‍यासाठी पाठिंबा देण्‍याचा व सक्षम करण्‍याचा मनसुबा आहे. ग्राहकांचा उत्‍साह, तसेच देशवासीयांचा सामूहिक उत्‍साह वाढवण्‍याच्‍या उद्देशाने सॅमसंग इंडियाने नीरज चोप्राला पाठिंबा देण्‍याकरिता जाहिरातीचे (film) अनावरण केले आहे. निपुण अॅथलीट अनेक आव्‍हानांशी संघर्ष करत असताना त्‍याची स्थिरता व दृढनिश्‍चयाच्‍या भावनेला सादर करत ही जाहिरात सॅमसंगचा नुकतेच लाँच करण्‍यात आलेला गॅलॅक्‍सी झेड फोल्‍ड६ स्‍मार्टफोन त्‍याच्‍या प्रवासाला कशाप्रकारे साह्य करतो या बाबीला दाखवते. गॅलॅक्‍सी झेड फोल्‍ड ६ स्‍मार्टफोन शक्तिशाली गॅलॅक्‍सी एआय तंत्रज्ञानाच्‍या माध्‍यमातून मर्यादांना दूर करतो आणि ग्राहकांना अद्वितीय अनुभव देतो. गॅलॅक्‍सी एआयची शक्‍ती असलेल्‍या गॅलॅक्‍सी झेड फोल्‍ड६ मध्‍ये इंटरप्रीटर व नोट असिस्‍ट यांसारखी एआय वैशिष्‍ट्ये आहेत, ज्‍यामुळे वापरकर्ते अधिक कार्यक्षमपणे संवाद साधू शकतात, त्‍यांची उत्‍पादकता वाढवू शकतात आणि त्‍यांच्‍या काम करण्‍याच्‍या व जगण्‍याच्‍या पद्धतीत बदल करू शकतात.
''सॅमसंगचा व्‍यक्‍तींना त्‍यांच्‍या मर्यादांना दूर करत नवीन उंची गाठण्‍यास सक्षम करण्‍यावर विश्‍वास आहे. आम्‍ही नीरज चोप्राला अविरत पाठिंबा देत आहोत, ज्‍याच्‍यामध्‍ये सर्वोत्तमता व अमर्यादित क्षमता आहेत. सॅमसंगमध्‍ये या मूल्‍यांना अधिक आदर दिला जातो. 'इंडिया चीअर्स फॉर नीरज' मोहिमेसह आमचा देशवासीयांच्‍या सामूहिक उत्‍साहाला चालना देण्‍याचा आणि नीरजला पाठिंबा देण्‍यामध्‍ये 'अनफोल्‍ड द बेस्‍ट' ध्‍येय साध्‍य करण्‍याचा मनसुबा आहे,'' असे सॅमसंग इंडियाच्‍या एमएक्‍स बिझनेसचे उपाध्‍यक्ष आदित्‍य बब्‍बर म्‍हणाले. ऑल-न्‍यू गॅलॅक्‍सी झेड फोल्‍ड६ मिळण्‍याव्‍यतिरिक्‍त नीरज चोप्रा यांना स्‍पेशल एडिशन गॅलॅक्‍सी झेड फ्लिप६ आणि वैयक्तिकृत फ्लिपसूट केस देखील मिळेल. ''मी अविरत पाठिंबा देण्‍यासाठी आणि 'इंडिया चीअर्स फॉर नीरज' मोहिमेच्‍या माध्‍यमातून प्रेरित करण्‍यासाठी सॅमसंग इंडियाचे आभार व्‍यक्‍त करतो. चाहत्‍यांकडून मिळणारी प्रेरणा व शुभेच्‍छा बहुमूल्‍य आहेत, ज्‍यामधून यशस्‍वी होण्‍याचा माझा निर्धार अधिक दृढ झाला आहे. मी पार करणाऱ्या प्रत्‍येक आव्‍हानासह माझ्या लक्ष्‍याच्‍या जवळ पोहोचत आहे आणि माझ्यासोबत ऑल-न्‍यू गॅलॅक्‍सी झेड फोल्‍ड६ या प्रवासाला प्रकाशझोतात आणत आहे. अत्‍याधुनिक गॅलॅक्‍सी एआय वैशिष्‍ट्ये असलेला हा उल्‍लेखनीय डिवाईस मला माझी सर्वोत्तम कामगिरी करण्‍यास सक्षम करतो. मंत्र 'गॅलॅक्‍सीफोल्‍ड्सगोल्‍ड'मध्‍ये मर्यादांना दूर करत पुढे जाण्‍याप्रती माझ्या प्रेरणास्रोतचे प्रतीक आहे,'' असे नीरज चोप्रा म्‍हणाले. नीरज चोप्रा आता सॅमसंगच्‍या विशेष 'टीम सॅमसंग गॅलॅक्‍सी'चा भाग देखील आहेत. वापरकर्ते व चाहते सॅमसंग इंडियाची वेबसाइट Cheer for Neeraj Chopra Send a wish | Samsung India ला भेट देत 'द मॅन विथ द गोल्‍डन आर्म' नीरज चोप्रा यांना शुभेच्‍छा पाठवू शकतात. प्रत्‍येक शुभेच्‍छा बदल घडवून आणू शकते यावर विश्‍वास ठेवत सॅमसंग इंडिया वापरकर्त्‍यांना ९८७०४९४९४९ या क्रमांकावर 'नीरज' मेसेज करत व्‍हॉट्सअॅपवर शुभेच्‍छा पाठवण्‍याची सुविधा देत आहे. तसेच, ते ब्रँडला @SamsungIndia येथे टॅग करत सॅमसंगच्‍या सोशल मीडिया चॅनेल्‍सवर कमेंट देखील पाठवू शकतात. सॅमसंग ग्राहकांना हॅशटॅग्‍स #IndiaCheersNeeraj, #GalaxyFoldIsGold, #GalaxyZFold6, #GalaxyAI आणि #Samsung सह संवादामध्‍ये सामील होण्‍याचे आवाहन करत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.