ज्युलिओची २.५ दशलक्ष डॉलर्सची निधी उभारणी
August 21, 2024
0
ज्युलिओची २.५ दशलक्ष डॉलर्सची निधी उभारणी
~ ७ युनिकॉर्न संस्थापकांसह १८० हून अधिक एंजल गुंतवणूकदारांकडून उभारला निधी ~
ज्युलिओ या अविवाहितांसाठी विश्वसनीय, विशेष क्लबने भारतातील ऑनलाइन डेटिंग आणि मॅचमेकिंग संदर्भातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी १८० हून अधिक प्रख्यात गुंतवणूकदारांकडून एंजल फंडिंगमध्ये २.५ दशलक्ष डॉलर्सचा निधी उभारल्याची घोषणा केली आहे. एंजल्सच्या प्रतिष्ठित यादीमध्ये लिव्हस्पेसचे संस्थापक रमाकांत शर्मा, क्रेडचे संस्थापक कुणाल शाह, अॅकोच्या सह-संस्थापक रूची दीपक, जेपी मार्गन इंडियाचे माजी अध्यक्ष लिओ पुरी आणि ग्रोचे संस्थापक हर्ष जैन व ललित केश्रे यांचा समावेश आहे.
चिरंजीव घई आणि वरूण सूद यांनी २०२३ मध्ये स्थापना केलेली ज्युलिओ पारंपारिक भारतीय मॅचमेकरच्या कार्यपद्धतीमधून प्रेरित आहे आणि अस्सल, वास्तविक जीवनातील भेटींना चालना देत आधुनिक डेटिंग आणि मॅट्रिमोनीसाठी (विवाह) अधिक जबाबदार व उत्तम दृष्टिकोन देते.
ज्युलिओचे संस्थापकीय मुख्य कार्यकारी अधिकारी वरूण सूद म्हणाले, ''मला जगभरातील वापरकर्त्यांसाठी ज्युलिओ सादर करण्याचा आनंद होत आहे. डेटिंग अॅपची कमतरता आणि मानसिक आरोग्यसंबंधित समस्यांचा आज दुर्दैवाने जगभरातील अविवाहितांवर परिणाम होत आहे. आमचा अविवाहितांसाठी विश्वसनीय क्लब निर्माण करण्याचा मनसुबा आहे, जो त्यांना खऱ्या प्रेमाचा शोध घेण्यासाठी सुरक्षित, विश्वसनीय आणि जबाबदार सेवा देईल.''
वरूण पुढे म्हणाले, ''मी एंजल्स म्हणून संपूर्ण पाठिंबा देण्यासाठी माझ्या प्रतिष्ठित मित्रांचे व कुटुंबाचे मनापासून आभार व्यक्त करतो. त्यांचा सल्ला व नेटवर्क्स, तसेच अत्यंत स्मार्ट, उत्कट व सर्वोत्तम कर्मचाऱ्यांची आमची दर्जेदार टीम आम्हाला मोठ्या प्रमाणात एआय व इंडिया स्टॅकसह आधुनिक मॅचमेकिंग लँडस्केपमध्ये क्रांती घडवून आणण्यास मदत करेल. जसे व्हिडिओजसाठी यूट्यूब आणि शोध घेण्यासाठी गुगल आहे तसे आम्ही जागतिक स्तरावर डेटिंग/मॅचमेकिंगसाठी विश्वासार्ह सेवा बनलो तर ते चांगले काम मानू.''
लिव्हस्पेसचे संस्थापक रमाकांत शर्मा म्हणाले, ''अविश्वसनीयरित्या उत्तम व प्रतिभावान व्यावसायिकांच्या टीमद्वारे संचालित ज्युलिओ आजच्या काळातील गुंतागूंतीच्या ग्राहक इंटरनेट समस्यांचे निराकरण करण्याच्या मिशनवर आहे. मला त्यांच्या प्रवासाचा भाग असण्याचा आनंद होत आहे, तसेच मी त्यांना सर्वतोपरी पाठिंबा देण्यास उत्सुक आहे.''