Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

रत्नागिरी तालुका भंडारी समाज महाअधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून आदरणीय श्री नवीनचंद्र बांदिवडेकर साहेब यांची नियुक्ती

रत्नागिरी तालुका भंडारी समाज महाअधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून आदरणीय श्री नवीनचंद्र बांदिवडेकर साहेब यांची नियुक्ती
भंडारी समाजाची प्रगती, विकास आणि समाजाला दिशा देण्याचे दृष्टी त्यांच्याकडे आहे. इतर नेते साठमारीत गुंतलेले असताना त्यांच्या तोडीचे किंबहुना त्यांच्या आसपास पोहोचणारे व्यक्तिमत्व समाजात दुर्मिळ झाले आहे.साहेबांचे सर्व समाजाला बरोबर घेऊन जाण्याचे कर्तृत्व आणि वक्तृत्व वाखणण्याजोगे आहे.त्यांच्या पुढाकाराने शिवाजी पार्क,मुंबई येथे २००६ साली संपन्न झालेल्या अखिल भारतीय भंडारी समाज महासंघाच्या मेळाव्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला होता.पण नंतर त्याला दृष्ट लागली आणि भंडारी समाज बांधव पुन्हा एकदा काहीसा विस्कळीत झाला.आदरणीय बांदिंवडेकर साहेबांच्या प्रयत्नाने भंडारी समाजाचे दैवत भागोजीशेठ कीर यांच्या स्मृतिदिनी (महाशिवरात्री दिनी) गेली १६/१७ वर्षे बेंगाल केमिकल ते भागोजीशेठ कीर स्मशानभुमी दादर (पश्चिम) या मार्गावर भव्य रॅली काढून भागोजींच्या पुतळ्याची विधियुक्त पूजा करून अभिषेक करण्यात येतो.या भव्य रॅलीचे सर्वप्रकारचे नियोजन स्वतः ते करतात.त्यासाठी महिनाभर अथक परिश्रम घेतात.भागोंजीचे उचित स्मारक शिवाजी पार्क परिसरात व्हावे तसेच शालेय पुस्तकामध्ये भागोंजी विषयी धडा असावा यासाठी त्यांचे अविरत प्रयत्न सुरू आहेत.
मागील वर्षी स्वा.सावरकर स्मारक येथे 'मैत्र जीवांचे' या भव्यदिव्य कार्यक्रमा अंतर्गत स्वा.सावरकर आणि दानशूर भागोंजीच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. सरकारच्या अनास्थेमुळे सरखेल मायनाक भंडारी यांचा योग्य तो सन्मान झाला नाही.खांदेरी किल्ल्यावरील लढाईत इंग्रजांवर विजय मिळवणाऱ्या सरखेल मायनाक भंडारी यांचा पराक्रम जगासमोर आणण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत.त्याद्वारे खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी बांदिंवडेकर साहेब प्रयत्नाची पराकाष्ठा करत आहेत.साहेबांच्या प्रयत्नाने भंडारी साहित्य अधिवेशन ही यशस्वीपणे संपन्न झाले आहे.यानिमित्ताने बांदिंवडेकर साहेबांच्या मोजक्याच कार्यक्रम/उपक्रमाचा उल्लेख करता आला.प्रत्यक्षात त्यांचे कार्य खुप मोठे आहे.मुंबई परिसरातील आणि महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील भंडारी समाज बांधवाना एकत्र आणण्याचे शिवधनुष्य त्यांनी उचलले आहे आणि त्यात ते यशस्वी झाले आहेत. रत्नागिरी येथील भंडारी समाजाचे महाअधिवेशन यशस्वी होण्यासाठी श्री.राजूशेठ कीर आणि त्यांचे सहकारी गेले महिनाभर अथक परिश्रम घेत आहेत.अगदी उत्तम नियोजन करत आहेत.जास्तीत जास्त भंडारी बंधू भगिनी पर्यंत संपर्क साधत त्यांना सहभागी होण्यासाठी निमंत्रण देत आहेत.ते यात नक्कीच यशस्वी होतील.या महाधिवेशनास माझ्यासारख्या अनेक भंडारी बांधवांच्या लाख लाख शुभेच्छा व मनस्वी आनंद आणि समाधान आहे.(He deserve) माझ्याकडून त्यांचे विशेष अभिनंदन आणि शुभेच्छा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.