सलाम किसानचा शेतकरी सक्षमीकरण उपक्रम
August 21, 2024
0
सलाम किसानचा शेतकरी सक्षमीकरण उपक्रम
: सलाम किसान या अग्रगण्य कृषी-तंत्रज्ञान प्लॅटफॉर्मने आपले स्वातंत्र्यदिन अभियान राबवले. यामध्ये शेतकरी सक्षमीकरणाच्या अनेक प्रभावी कृषी उपक्रमांचा समावेश होता. या अभियानात ड्रोन पायलट्स, शेतकरी कौशल्य विकास उपक्रम तसेच शेतकऱ्यांना स्थानिक नेते व कृषीतज्ज्ञांशी जोडून देणाऱ्या समुदाय समारंभांचा समावेश होता. ग्रामीण समुदायांमध्ये अर्थपूर्ण बदल घडवून आणण्याप्रती तसेच तंत्रज्ञानाचा लाभ घेऊन व सहयोगाला प्रोत्साहन देऊन भारतीय कृषीक्षेत्राचा कायापालट करण्याप्रती सलाम किसानची बांधिलकी दिसून आली.
या अभियानाचा एक भाग म्हणून सलाम किसानने नाशिकमध्ये १० ते १७ ऑगस्ट २०२४ दरम्यान आठ दिवसांचे श्री गगनगिरी कृषी प्रदर्शन प्रायोजित केले. प्रदर्शनादरम्यान कंपनीचे प्रतिनिधी अक्षय खोब्रागडे, परेश कुल्लरकर, सुमित मुंगले, विक्रम थेटे व ड्रोन पायलट शेतकऱ्यांशी थेट संवाद साधत त्यांना सलाम किसान सेवांबद्दल माहिती दिली तसेच चांगल्या शेतीच्या अनुभवासाठी सलाम किसान अॅपचे महत्व पटवून दिले.
सलाम किसानने नागपूरमधील सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंटमध्ये (एसआयबीएम) दोन दिवसांची उद्योजकता विकास कार्यशाळाही आयोजित केली. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अक्षय खोब्रागडे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या सत्रांमध्ये विकासाला चालना देण्यातील स्टार्टअप्सच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर भर देण्यात आला. त्याचप्रमाणे व सलाम किसान चे अधिकारी विक्रम थेटे आणि रोहित पाटील ह्यांच्या मार्फत विद्यार्थ्यांना संस्थेच्या सहाय्याने त्यांच्या इनोव्हेटिव्ह कल्पना वास्तवात आणण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले.