गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्सकडून मान्सून ऑफर्सची घोषणा
August 15, 2024
0
गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्सकडून मान्सून ऑफर्सची घोषणा
मुंबई --- : गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्स या इलेक्ट्रिक दुचाकी व तीनचाकीच्या इब्लू श्रेणीच्या उत्पादक कंपनीने आज इब्लू फिओ आणि इब्लू फिओ एक्स या ईव्ही दुचाकी श्रेणीवर स्पेशल मान्सून ऑफरची घोषणा केली. ग्राहक १०,००० रूपयांच्या विशेष सूटचा आनंद घेऊ शकतात, ज्यामुळे कंपनीच्या इलेक्ट्रिक दुचाकी इब्लू फिओ एक्स आणि इब्लू फिओची किंमत मूळ किंमत ९९,९९९ रूपये एक्स-शोरूमवरून फक्त ८९,९९९ रूपये एक्स-शोरूमपर्यंत कमी झाली आहे.
गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी व संचालक श्री. हैदर अली खान म्हणाले, ''गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्समध्ये आम्ही ग्राहकांना शाश्वत व नाविन्यपूर्ण गतीशीलता सोल्यूशन्स देण्याप्रती कटिबद्ध आहोत. इब्लू फिओ आणि इब्लू फिओ एक्सवर मान्सून ऑफरसह आम्ही आमची उत्पादने अधिक किफायतशीर करण्यासोबत अधिकाधिक व्यक्तींना इलेक्ट्रिक वेईकल्सचा अवलंब करण्यास प्रेरित देखील करत आहोत. हा उपक्रम हरित भविष्याच्या दिशेने पाऊल आहे आणि पर्यावरणास अनुकूल परिवहनाला चालना देण्याच्या आमच्या दृष्टीकोनाशी संलग्न आहे.''
या लिमिटेड-टाइम ऑफरचा पर्यावरणास अनुकूल प्रवास अधिकाधिक ग्राहकांसाठी अधिक सुलभ आणि किफायतशीर करण्याचा मनसुबा आहे. इब्लू फिओ आणि इब्लू फिओ एक्स मध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानासह दीर्घकाळापर्यंत टिकणाऱ्या बॅटऱ्या, कार्यक्षम मोटर्स व स्मार्ट वैशिष्ट्ये आहेत, जी एकूण राइडिंग अनुभव उत्साहित करतात. हे मॉडेल्स सर्व वयोगटातील प्रवाशांच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहेत, तसेच सोयीसुविधा, कार्यक्षमता व शाश्वततेचे विनासायास संयोजन देतात.
ग्राहक देशभरातील जवळच्या गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्स डिलरशिपला भेट देऊन या उत्साहवर्धक ऑफरचा आनंद घेऊ शकतात आणि भावी गतीशीलतेचा अनुभव घेऊ शकतात. मान्सून ऑफर ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत वैध आहे.