Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

10 सिटी रोलआऊटसह मारुती - सुझुकी अरेना डेव्हिल्स सर्किट परतले

10 सिटी रोलआऊटसह मारुती - सुझुकी अरेना डेव्हिल्स सर्किट परतले 12 व्या हंगामात आतापर्यंतचे सर्वात मोठे उद्दिष्ट राष्ट्रीय: मारुती - सुझुकी अरेना डेव्हिल्स सर्किट या भारतातील सर्वात मोठ्या ऑबस्टकल रेसच्या 12 व्या हंगामाची अहमदाबाद आणि इंदूरसह 10 शहरांमध्ये पॅन इंडिया रोलआऊट घोषणा करण्यात आली आहे. साधारण दशकभरापूर्वी सुरू झालेल्या मारुती सुझुकी अरेना डेव्हिल्स सर्किट रेसने खेळाडू आणि आयुष्यात रोमांच शोधणाऱ्यांना आपल्याकडे आकर्षून घेतले आहे. आशियातील सर्वात कठीण शर्यत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मारुती सुझुकी अरेना डेव्हिल्स सर्किट स्पर्धेतील आतापर्यंतच्या विजेत्यांमध्ये सैन्य कर्मचारी, फिटनेस प्रशिक्षक आणि शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी प्रयत्नरत असलेल्या व्यावसायिकांचा समावेश आहे.
नुकत्याच घोषणा केलेल्या हंगामात 60 हजारपेक्षा अधिक डेव्हिल्सलेअर्स सहभागी होतील, असे उद्दिष्ट आहे. यामध्ये या सर्वांना लष्करी शैलीतील 15 ऑबस्टकलसह 5 किमी लांबीचे अंतर पार करावे लागेल. हौशी क्रीडा स्पर्धेमध्ये सर्वात मोठे पारितोषिक देण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या सहभागाच्या स्पर्धात्मक श्रेणीमध्ये लोक हंगामातील प्रत्येक शहरात धाव घेऊन पोडियम फिनिश मिळवण्याचा प्रयत्न करतात, यामुळे त्यांना गुण मिळतात. हंगामाच्या शेवटी पुरुष आणि महिला खेळाडू नवी कोरी मारुती - सुझुकी स्विफ्ट कर जिंकू शकतात. प्रत्येक वर्षी ही स्पर्धा अतिशय चुरशीची होत असून जे स्पर्धक विजयी होतात ते कोणत्याही हौशी स्पर्धेप्रमाणे सर्वोत्तम खेळाचे प्रदर्शन करतात. चालू हंगामाच्या शुभारंभप्रसंगी संस्थापक अदनान अदिब म्हणाले की, "स्पर्धेचा 12 वा हंगाम सुरू करताना मी अतिशय भावूक झालो आहे. आता स्पर्धक किंवा आम्ही प्रेक्षकांसाठी नव्हे तर आपल्या वैयक्तिक तंदुरुस्तीच्या उद्दिष्टांचा पल्ला आणखी पुढे घेऊन जाण्यासाठी आणि त्यात विजयी होण्यासाठी या स्पर्धेत उतरत आहोत. डेव्हिल्सलेअर्सची वाढती संख्या त्याचेच लक्षण आहे, या भावनेसाठी मी हा हंगाम समर्पित करत आहे." "गेल्या 10 पेक्षा अधिक वर्षांमध्ये, 800 पेक्षा अधिक शहरे आणि 30 देशांतील सहभागी स्पर्धकांचे यजमानपद आम्ही भूषवले आहे. पुढील हंगामाकडे पाहताना मी कृतज्ञ असून आमचे भागीदार, सहभागी स्पर्धक आणि डेव्हिल्स लेअर्सकडून बहुमोल पाठिंबा मिळाल्याबद्दल मी खरोखरच धन्य झालो आहे. डेव्हिल्स सर्किटवर विश्वास ठेवल्याबद्दल मारुती सुझुकीचे मी सर्वांत मोठे आभार मानतो, एकत्रितपणे आम्ही ही स्पर्धा आकाशाला गवसणी घालणाऱ्या उंचीवर पोहोचवू,” असे ते पुढे म्हणाले. मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडचे विपणन आणि विक्री विभागातील वरिष्ठ कार्यकारी अधिकारी पार्थो बॅनर्जी यावेळी म्हणाले की, “डेव्हिल्स सर्किटशी आमचा संबंध अनेक वर्षांपासून आहे. हा संबंध अधिक बळकट होत असताना, आम्ही एपिक न्यू स्विफ्टचे प्रदर्शन होत असलेल्या डेव्हिल्स सर्किटच्या या वर्षीच्या 12 व्या हंगामात नव्या जोशात आणि उत्साहात प्रवेश करत आहोत. आम्हाला आशा आहे की आयुष्यात रोमांचप्राप्ती करणाऱ्या म्हणजेच ‘डेव्हिल्स लेअर्स’ना पुन्हा एकदा साहसी खेळ करण्याची इच्छा होईल. आपले चापल्य आणि उत्कृष्ट कामगिरीसह मारुती सुझुकी स्विफ्ट आव्हानात्मक अडथळ्यांवर मात करण्यासाठी स्पर्धकांची दृढता आणि उच्च ऊर्जेला मूर्त रूप देते. आम्हाला विश्वास वाटतो की हे सहकार्य उत्कृष्टतेसाठी प्रयत्न करण्याचे आमचे सामायिक मूल्य अधोरेखित करते.” मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड व्यतिरिक्त, रेड बुल, बिसलेरी, पेज इंडस्ट्रीज (जॉकी), अदानी रिअल्टी, रहेजा डेव्हलपर्स आणि ओमॅक्स हे ब्रँड्स या स्पर्धेत सहकार्य करण्यासाठी पुढे आले आहेत. मारुती सुझुकी अरेना डेव्हिल्स सर्किट, कंपनीने भारतात सादर केलेल्या रेसिंगच्या उत्कृष्ट संकल्पनांपैकी एक अद्वितीय क्रीडा स्पर्धा आहे. या स्पर्धेने संपूर्ण फिटनेस आणि रेसिंग अशा एकत्रित श्रेणीमध्ये क्रांती घडवून आणली आहे. स्पर्धेचा हा प्रकार सहभागी स्पर्धकांमध्ये सौहार्द वाढविण्यास प्रोत्साहन देतो. कारण यातील स्पर्धक लष्करी शैलीतील उंचच उंच भिंती, काटेरी तारा आणि बर्फासह इतरही अनेक अडथळ्यांना भेदून धावणाऱ्या रेसिंग ट्रॅकला सामोरे जातात. चालू हंगामाची सुरुवात दि. 29 सप्टेंबर रोजी इंदूरमध्ये पहिल्या शर्यतीने होणार असून दि. 9 मार्च 2025 रोजी दिल्ली येथे स्पर्धेचा शेवट होईल. या कालावधीत, मुंबई, अहमदाबाद, पुणे, बंगळुरू, हैदराबाद, कोची, चेन्नई आणि मोहाली येथेही शर्यती आयोजित केल्या जातील. कोरोना महासाथी नंतरच्या आजच्या नवीन जगात, बहुप्रतिभा असलेल्या कर्मचाऱ्यांच्या शोधात असलेल्या संस्थांसाठी शर्यतीची ही संकल्पना एक मोठी आकर्षणाचा केंद्र ठरली आहे. मारूती - सुझुकी आरेना डेव्हिल्स सर्किटमध्ये, ऐतिहासिकदृष्ट्या 70% पेक्षा अधिक सहभागी स्पर्धक कॉर्पोरेट क्षेत्राच्या पार्श्वभूमीतून आले आहेत आणि आताचा हा हंगामदेखील पूर्वीपेक्षा वेगळा असणार नाही. मागील सहभागी स्पर्धकांच्या मते, मारुती सुझुकी आरेना डेव्हिल्स सर्किट रेस स्पर्धेमध्ये प्रत्येकजण कोणालाही मागे न ठेवता एकाच ध्येयाकडे आगेकूच करतो. यातून अकृत्रिम सौहार्द आणि संघभावना निर्माण होते. यातून भावी आयुष्यात संघटित भावनेने काम करण्याचा आणि परस्परांत दृढ संबंध निर्माण करण्याचा एक परिपूर्ण मार्ग तयार होतो.
सदर संकल्पना शारीरिक तंदुरुस्तीसाठी आग्रही असणाऱ्या तसेच निरोगी सांघिक भावना निर्माण करू पाहणाऱ्या कॉर्पोरेट्समध्ये लोकप्रिय झाली आहे. मारुती सुझुकी आरेना डेव्हिल्स सर्किट स्पर्धेमध्ये 16 ते 70 वर्षे वयोगटातील व्यक्ती सहभागी होऊ शकतात. वेगवेगळ्या शारीरिक स्थितीतील लोकांच्या दृष्टीने आखणी केलेली ही स्पर्धा प्रत्येकाला अत्यंत आव्हानात्मक वातावरणात स्वतःचीच परीक्षा पाहण्याची संधी देते. नवीन मारुती सुझुकी स्विफ्ट कारच्या बक्षीसासह ही स्पर्धा पुरुष आणि महिला या दोन्ही श्रेणीमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना सर्वात मोठे बक्षीस बक्षीस देते. डेव्हिल्स सर्किट स्पेक्टाकॉम ग्लोबल प्रा. लि. विषयी स्पेक्टाकॉम केवळ एक कंपनी नसून बहुआयामी नावीन्यपूर्ण पॉवरहाऊस आहे. स्पेक्टाकॉम कंपनी नागरिकांमध्ये सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्यासाठी आणि जीवनशैली सुधारण्यासाठी समर्पित आहे. कंपनी मनोरंजन आणि तंत्रज्ञानासह वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यवसायात मोठ्या प्रमाणावर कार्य करते. ग्राहकांना निरोगी आणि शारीरिकदृष्ट्या अधिकाधिक सक्रिय होण्यास सक्षम करणाऱ्या आकर्षक प्लॅटफॉर्मची निर्मिती आम्ही करतो. स्पेक्टाकॉम कंपनीच्या उत्पादन आणि सेवा पोर्टफोलिओमध्ये युनिक पार्टीसिपेटीव्ह कन्सेप्ट, हेल्थ अँड वेलनेससाठी डिजिटल प्लॅटफॉर्म, तिकीट आणि फेशियल रेकग्निशन सोल्यूशन्स आणि इतरही अनेक गोष्टींचा समावेश आहे. स्पेक्टाकॉम कंपनी स्वप्न पाहते, आमचे स्वप्न आहे की जीवनावर सकारात्मक परिणाम करणारी आरोग्य आणि निरोगीपणाची परिसंस्था निर्माण करणे. तुम्ही नवशिके असाल किंवा तुमच्या शारीरिक तंदुरुस्तीच्या प्रवासात अनुभवी असलात तरी आमच्याकडे तुम्ही सहभागी होऊ शकाल असा समुदाय तुमची वाट पाहत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.