Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

बिग सिने एक्स्पो 2024 आपल्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या इव्हेंटमध्ये सिनेमा प्रदर्शनाच्या नव्या संकल्पना मांडण्यासाठी सज्ज

बिग सिने एक्स्पो 2024 आपल्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या इव्हेंटमध्ये सिनेमा प्रदर्शनाच्या नव्या संकल्पना मांडण्यासाठी सज्ज · मल्टिप्लेक्स, सिंगल स्क्रीन, मॉल आणि चित्रपटगृहातील वितरणासाठी आयोजित करण्यात येणारे हे आशियातील एकमेव अधिवेशन आणि व्यापार प्रदर्शन असून या ठिकाणी क्रांतिकारी नवकल्पना सादर होणार · दिग्दर्शक ॲटली 'बेबी जॉन' या त्यांच्या निर्मिती पदार्पणातील चित्रपटातील एक्स्क्लुझिव्ह दृश्ये या ठिकाणी दाखवणार · रमेश सिप्पी यांना स्पेशल अचिव्हमेंट अवॉर्ड देण्यात येणार
मुंबई, सप्टेंबर 2024 : बिग सिने एक्स्पोचे बहुप्रतिक्षीत 7वे पर्व 30 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर 2024 दरम्यान भारतातील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर (नेस्को) येथे आयोजित करण्यात आले आहे. हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे आणि आशियातील सर्वात मोठे, प्रमुख आंतरराष्ट्रीय अधिवेशन आणि व्यापार प्रदर्शन असून यंदाच्या वर्षी हा इव्हेंट आणखी भव्य आणि नाविन्यपूर्ण स्वरुपात असेल. या तारांकित उद्घाटन सोहळ्यासाठी मॅडॉक फिल्म्सचे संस्थापक दिनेश विजन, आणि पीव्हीआर-आयनॉक्सचे सह-सीईओ आलोक टंडन यांसारख्या, उद्योगक्षेत्रातील मान्यवर व्यक्ती उपस्थित राहणार आहे. एक्स्पोच्या पहिल्या दिवशी, चित्रपट निर्माता अ‍ॅटली आपल्या 'बेबी जॉन' या निर्मिती पदार्पणातील चित्रपटाचे विशेष फुटेज दाखवणार आहेत. या चित्रपटात वरुण धवन मुख्य भूमिकेत आहे. बिग सिने एक्स्पोने आशियातील सर्वात मोठा बी2बी प्लॅटफॉर्म म्हणून आपले स्थान कायम ठेवले आहे. हा एक्स्पो मुख्यत्वे मल्टिप्लेक्स आणि सिंगल-स्क्रीन क्षेत्रासाठी समर्पित आहे. या दोन दिवसांच्या भव्य इव्हेंटमध्ये स्थानिक तसेच आंतरराष्ट्रीय भागधारकांना एकत्र येण्याची अनोखी संधी मिळणार आहे. सिनेमा आणि मनोरंजन क्षेत्राला पुढे नेणारे अत्याधुनिक तंत्रज्ञान, उत्पादने आणि सेवा या ठिकाणी सादर केल्या जातील. बिग सिने एक्स्पो 2024च्या प्रमुख भागीदारांमध्ये गॅलालाइट, आयमॅक्स, क्यूब सिनेमा, क्रिस्टी, आणि वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरी व युनिव्हर्सल यांचा समावेश आहे. या इव्हेंटमध्ये प्रॉडक्ट डिस्प्ले, प्रात्यक्षिके, स्टुडिओ प्रेझेंटेशन्स, चर्चासत्रे, पॅनेल डिस्कशन्स, पुरस्कार समारंभ, विशेष स्क्रीनिंग्ज, नवीन उत्पादनांचे लॉन्च आणि नव्या उपक्रमांच्या घोषणांसह अनेक आकर्षक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. याशिवाय बी2बी भेटीगाठी आणि नेटवर्किंगसाठी देखील भरपूर संधी मिळणार आहे. आयमॅक्स बिग सिने अवॉर्ड्स 2024 मध्ये सिनेमा प्रदर्शन उद्योगातील उल्लेखनीय कामगिरीचा सन्मान करण्यात येईल. या अंतर्गत विविध क्षेत्रांत आघाडीवर असलेल्या आणि नाविन्यपूर्ण कामगिरी व्यक्तींना गौरवण्यात येणार आहे. उत्कृष्टता, सर्जनशीलता आणि उद्योगक्षेत्राला पुढे नेणाऱ्या प्रेरणादायी वृत्तींची दाखल घेणे हे या प्रतिष्ठित पुरस्कार देण्यामागचे उद्दिष्ट आहे. या वर्षीच्या एक्स्पोमध्ये प्रगती आणि नवकल्पनांवर भर देण्यात आला असून जगभरातील सिनेमा ऑपरेटर्स, डिझायनर्स, वितरक, स्टुडिओ, उपकरण उत्पादक, प्रकल्प व्यवस्थापन व्यावसायिक आणि उद्योगक्षेत्रातील महत्त्वाच्या व्यक्ती एकत्र येतील अशी अपेक्षा आहे. "हा अद्वितीय इव्हेंट अशा प्रकारचा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा इव्हेंट आहे. या इव्हेंटमध्ये चित्रपट प्रदर्शन क्षेत्रातील हुशार व्यक्ती एकत्र येतात.", असे बिग सिने एक्स्पोचे संचालक राघव म्हणाले. "सिनेमाक्षेत्राच्या भविष्याला चालना देणाऱ्या नावीन्यपूर्ण कल्पना आणि या क्षेत्रातील आघाडीच्या उपाययोजना यांच्या देवाणघेवाणीसाठी एक्स्क्लुझिव्ह व प्रीमिअर प्लॅटफॉर्म उपलब्ध करून द्यावा, हे आमचे ध्येय आहे.", अशी पुष्टी त्यांनी जोडली. "तंत्रज्ञान आणि प्रदर्शन यांच्याशी संबंधित घटकांची माहिती असणे ही आमच्यासारख्या चित्रपटनिर्मात्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बाब आहे. बारीकसारीक तपशीलाचा विचार करण्यात आला आहे आणि पुढे जाण्याची दृढ इच्छा दिसून येते. प्रदर्शन क्षेत्र नेमके हेच साध्य करत आहे, अशी मला खात्री आहे. या कार्यक्रमाचा एक भाग होणे हा माझ्यासाठी बहुमान आहे.", असे चित्रपट दिग्दर्शक, निर्माते व स्क्रीनरायटर पद्मश्री मणिरत्नम म्हणाले. "या इव्हेंटच्या निमित्ताने स्थानिक तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील कंपन्या एकत्र येतात, चर्चा करतात आणि वैचारिक देवाणघेवाण करतात. या इव्हेंटसाठी उपस्थित राहण्यास आणि उत्तम काम व नावीन्यपूर्ण कल्पना जाणून घेण्यास मी उत्सुक आहे. अशा प्रकारचे उपक्रम चित्रपट उद्योग व त्याच्याशी संबंधित व्यवसायांसाठी हितकारक ठरतात.", असे चित्रपटकर्ते सुभाष घई म्हणाले.
"बिग सिने एक्स्पाच्या सातव्या पर्वाच्या निमित्ताने चित्रपट प्रदर्शन क्षेत्राला पुन्हा एकदा एकत्र आणले. आमच्या उद्योगक्षेत्रातील महत्त्वाच्या कंपन्यांमध्ये नेटवर्किंग व सहयोगसाठी या इव्हेंटने नेहमीच एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. बिग सिने एक्स्पो हा ताकद व नवकल्पनांचे प्रतीक आहे. या प्रवासात सहभागी झाल्याचा आणि आम्ही एकत्रितपणे केलेल्या प्रगतीचा पीव्हीआर आयनॉक्समध्ये आम्हाला अभिमान आहे. पुन्हा एकदा एक उत्तम इव्हेंट आयोजित केल्याबद्दल आणि आमच्या उद्योगक्षेत्राची प्रगती व यशस्वितेसाठी त्यांनी दाखविलेल्या निर्धाराबद्दल या टीमचे मी अभिनंदन करतो.", असे पीव्हीआर आयनॉक्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक अजय बिजली म्हणाले. भारतात हा चित्रपट पाहणाऱ्यांची एक मोठी बाजारपेठ आहे. चित्रपटांचा अनुभव जसजसा विस्तारत जात असताना बिग सिने एक्स्पो भारतात आयोजित होणे हे समर्पकच आहे. त्याचप्रमाणे मुंबई हे भारतीय चित्रपटसृष्टीचे केंद्र आहे आणि मुंबईनेच या क्षेत्राला अने मार्गांनी आकार दिला आहे. या शहराला समृद्ध वारसा लाभलेला आहे आणि भविष्यातील विचार करण्यासाठीची कल्पकताही लाभलेली आहे. मुंबई हे सांस्कृतिक व कल्पकतेचे केंद्र आहे. त्यामुळे भारत व जगभरातील सिनेमा व मनोरंजन क्षेत्रात अमूलाग्र बदल घडवून आणण्याची क्षमता असलेल्या उत्तमोत्तम व्यक्तींना एकत्र आणणाऱ्या बिग सिने एक्स्पोसाठी हे शहर म्हणजे परिपूर्ण व्यासपीठ आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.