Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

रेव्हफिनची बजाज ऑटोसह धोरणात्मक भागीदारी

रेव्हफिनची बजाज ऑटोसह धोरणात्मक भागीदारी ~ ईको-फ्रेंडली अर्बन मोबिलिटीला चालना देणार ~ मुंबई: सस्टेनेबल मोबिलिटीचा पुरस्कार करणाऱ्या रेव्हफिन या भारतातील पहिल्या डिजिटल लेंडिंग प्लॅटफॉर्मने बजाज ऑटोशी धोरणात्मक भागीदारी केल्याचे जाहीर केले आहे. बजाज ऑटो ही भारतात आणि इतर ७० देशांत तीन चाकी वाहनांचे उत्पादन करणारी एक आघाडीची कंपनी आहे. ही भागीदारी म्हणजे इलेक्ट्रिक तीन-चाकी सेगमेन्टचा प्रसार, या वाहनांचा स्वीकार आणि त्यासाठी एक दमदार ईकोसिस्टम उभी करून फर्स्ट आणि लास्ट मैल मोबिलिटीच्या हरित भविष्यात योगदान देण्याच्या दिशेने उचललेले एक लक्षणीय पाऊल आहे.
रेव्हफिन आणि बजाज ऑटो यांच्या भागीदारीत इनोव्हेशनला चालना देण्याची, बाजारपेठेतील उपस्थिती विस्तारित करण्याची आणि इलेक्ट्रिक तीन चाकी सेगमेन्टमध्ये ग्राहकांचे समाधान वाढविण्याची चांगलीच क्षमता आहे. रेव्हफिनच्या सायकोमेट्रिक असेसमेंट क्षमतांचा उपयोग करून बजाज ऑटो आपल्या इलेक्ट्रिक तीन चाकी वाहनांचा ग्राहक अनुभव सुधारू शकते आणि बाजारपेठेच्या वेगवेगळ्या मागण्या प्रभावीरित्या पूर्ण करू शकते. शिवाय, आर्थिक सेवांमध्ये रेव्हफिनचे कौशल्य आणि तीन-चाकी ईको-सिस्टमविषयीची त्यांची सखोल जाण याचाही उपयोग या भागीदारीला करून घेता येईल. त्याला बजाज ऑटोची मार्केटमधील दमदार उपस्थिती आणि त्यांचा वैविध्यपूर्ण उत्पादन पोर्टफोलिओ याची जोड मिळून बजाजच्या इलेक्ट्रिक तीन चाकी ऑफरिंगचा प्रसार आणि तीव्रता वाढण्यास मदत होईल, विशेषतः टियर २ आणि टियर ३ शहरांत, जेथिल मार्केट्समध्ये रेव्हफिनची विशेष ताकद दिसून येते. रेव्हफिनचे सीईओ समीर अग्रवाल म्हणाले, “देशभरात सस्टेनेबल मोबिलिटी सोल्यूशन्सचा स्वीकार करण्याच्या वृत्तीला गती देण्यासाठी बजाज ऑटो या भारतातील तीन-चाकी मार्केटमधील आघाडीच्या कंपनीशी भागीदारी करताना आम्हाला आनंद होत आहे. इलेक्ट्रिक वाहने आणि आर्थिक समावेशकता याबाबतची आमची समान वचनबद्धता एकवटून आम्ही एक दणकट ईको-सिस्टम स्थापित करण्यास सज्ज आहोत. एक अशी ईको-सिस्टम जी ग्राहक आणि फ्लीट (वाहन-ताफा) संचालक दोघांना ईको-फ्रेंडली तीन चाकी पर्याय निवडण्यास प्रोत्साहित करेल.”
ते पुढे म्हणाले, “बजाज ऑटोचे तांत्रिक कौशल्य आणि त्यांचे मार्केटमधले वर्चस्व याला रेव्हफिनच्या आर्थिक समावेशन शक्यतांची जोड दिल्यास आम्ही व्यापक जागरूकता आणू शकू, सुलभ फायनॅन्सिंग शक्य बनवू शकू आणि त्यायोगे या हरित आणि अधिक सक्षम वाहतूक पर्यायांचा खप व्यापक बनवू शकू. ही धोरणात्मक भागीदारी अधिक स्वच्छ आणि शाश्वत भविष्याचे आमचे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने उचललेले एक लक्षणीय पाऊल आहे.”

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.