Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

ऑगस्टमध्ये एआय-एमएल,फार्मा आणि एफएमसीजी क्षेत्राची चमकदार कामगिरी: नोकरी जॉबस्‍पीक

ऑगस्टमध्ये एआय-एमएल,फार्मा आणि एफएमसीजी क्षेत्राची चमकदार कामगिरी: नोकरी जॉबस्‍पीक मुंबई : नोकरी जॉबस्‍पीक इंडेक्‍स या भारतातील व्‍हाइट-कॉलर हायरिंग अॅक्टिव्हिटीच्‍या आघाडीच्‍या निर्देशांकाने ऑगस्‍ट २०२३ च्‍या तुलनेत ऑगस्‍ट २०२४ मध्‍ये काहीशा सुधारणेची नोंद केली, जेथे निर्देशांक ३ टक्‍के घटसह २५७६ पॉइण्‍ट्सवर पोहोचले. रोजगार बाजारपेठेने महिन्‍याच्‍या पूर्वार्धात स्थिर कामगिरी केली असली तरी उत्तरार्धात सुट्टीच्‍या दिवसांचा एकूण निर्देशांकावर मोठा परिणाम झाला. एकूण घट असताना देखील अनेक क्षेत्रांनी स्थिरता व वाढ दाखवली. एआय-एमएल वार्षिक १४ टक्‍के वाढीसह अग्रस्‍थानी होते, ज्‍यानंतर एफएमसीजी (+११ टक्‍के), फार्मा/बायोटेक (+९ टक्‍के), ऑटो (+७ टक्‍के) आणि ऑईल अँड गॅस/पॉवर (+५ टक्‍के) यांचा क्रमांक होता. रोजगार बाजारपेठेत काहीसे मंदीचे वातावरण असताना देखील या क्षेत्रांनी उत्तम कामगिरी केली. आठवड्यातील कामकाजाच्‍या दिवसांमध्‍ये स्‍वातंत्र्य दिन, जन्‍माष्‍टमी व रक्षांबधन असे प्रमुख सुट्टीचे दिवस आल्‍यामुळे वीकेण्‍ड्समध्‍ये वाढ झाली. परिणामत: रिक्रूटमेंट अॅक्टिव्हिटी कमी झाल्‍या आणि ऑगस्‍टच्‍या उत्तरार्धात मोठी घट दिसण्‍यात आली. एआय-एमएल आणि आयटी प्रगतिशील क्षेत्र: एकूण आयटी क्षेत्राने पुरेशी वार्षिक १ टक्‍क्‍याची वाढ दाखवली, तर एआय-एमएल रोजगारांमध्‍ये १४ टक्‍क्‍यांची वाढ दिसण्‍यात आली. यामधून रोजगार बाजारपेठेत विशेष एआय कौशल्‍यांचे वाढते महत्त्व दिसून येते. रोचक बाब म्‍हणजे, आयटी युनिकॉर्न्‍स ५ टक्‍के वाढीसह ट्रेण्‍डमध्‍ये अग्रस्‍थानी होते, तसेच परदेशी एमएनसी आणि ग्‍लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स (जीसीसी) यांनी देखील सुधारणेची नोंद केली. आयटी हायरिंगसंदर्भात कोची आघाडीचे गंतव्‍य ठरले, जेथे वार्षिक २२ टक्‍क्‍यांच्‍या वाढीची नोंद झाली.
एफएमसीजी आणि फार्मा क्षेत्रांनी दर्शवली प्रबळ वाढ: एफएमसीजी क्षेत्राने वार्षिक ११ टक्‍क्‍यांच्‍या वाढीसह गती कायम राखली, ज्‍याचे श्रेय बेंगळुरू व कोलकातामधील प्रबळ कामगिरीला जाते, जेथे या दोन्‍ही शहरांमध्‍ये उल्‍लेखनीय ४० टक्‍के वाढ निदर्शनास आली. तसेच, फार्मा क्षेत्राने वार्षिक ९ टक्‍क्‍यांची वाढ केली, जेथे बडोदा प्रभावी ४४ टक्‍क्‍यांच्‍या वाढीसह अग्रस्‍थानी राहिले. वरिष्‍ठ पदे आणि उच्‍च वेतनांनी बाजारपेठ ट्रेण्‍ड्सना नव्‍या उंचीवर नेले: बाजारपेठेत सुधारणा होत असताना देखील वरिष्‍ठ व्‍यावसायिकांसाठी उच्‍च मागणी कायम आहे. १६ वर्षांपेक्षा अधिक अनुभव असलेल्‍या व्‍यावसायिकांसाठी हायरिंगमध्‍ये वार्षिक ११ टक्‍क्‍यांची वाढ झाली आणि सर्व शहरांमध्‍ये सकारात्‍मक वाढ दिसण्‍यात आली. तसेच धोरणात्‍मक व टॉप मॅनजमेंट पदांमध्‍ये ३० टक्‍क्‍यांची वाढ झाली. उच्‍च वेतन असलेल्‍या श्रेणींनी देखील स्थिरता दाखवली, जेथे प्रतिवर्ष १३ ते २० लाख रूपयांचे पॅकेज देणाऱ्या पदांमध्‍ये ६ टक्‍क्‍यांची वाढ झाली, तर प्रतिवर्ष २० लाख रूपयांपेक्षा अधिक पॅकेज देणाऱ्या पदांमध्‍ये १९ टक्‍क्‍यांची वाढ झाली. या ट्रेण्‍ड्समधून एकूण हायरिंग पद्धतींच्‍या तुलनेत अनुभवी व्‍यावसायिक आणि उच्‍च वेतन असलेल्‍या पदांसाठी बाजारपेठेत प्रबळ मागणी दिसून येते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.