Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

तीन उद्योजक उद्यमांचा केविनकेअर-एमएमए चिन्नीकृष्‍णन इनोव्‍हेशन अवॉर्डस् २०२४ सह सन्‍मान

तीन उद्योजक उद्यमांचा केविनकेअर-एमएमए चिन्नीकृष्‍णन इनोव्‍हेशन अवॉर्डस् २०२४ सह सन्‍मान
१६ सप्‍टेंबर २०२४: केविनकेअर आणि मद्रास मॅनेजमेंट असोसिएशन (एमएमए) यांनी एकत्रितपणे आयआयटीएम रिसर्च पार्क, चेन्‍नई येथे १४ सप्‍टेंबर २०२४ रोजी प्रतिष्ठित चिन्नीकृष्‍णन इनोव्‍हेशन अवॉर्डस् २०२४ च्‍या १३व्‍या पर्वाचे आयोजन केले. तीन उद्यमांना पुरस्‍कारासह सन्‍मानित करण्‍यात आले. या पुरस्‍काराचा नाविन्‍यतेच्‍या माध्‍यमातून वास्‍तविक जीवनातील आव्‍हानांचे निराकरण करणाऱ्या लुप्‍त उद्योजकता टॅलेंट्सचा शोध घेण्‍याचा मनसुबा होता. प्रत्‍येक विजेत्‍याला केविनकेअरकडून १ लाख रूपयांचे रोख बक्षीस, तसेच ट्रॉफी व प्रमाणपत्रासह गौरवण्‍यात आले. प्रमुख अतिथी म्‍हणून कोलगेट-पामोलिव्‍ह (इंडिया) लिमिटेडच्‍या व्‍यवस्‍थापकीय संचालक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्रीमती प्रभा नरसिंहन यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. दिवंगत श्री. आर. चिन्नीकृष्‍णन यांच्‍या स्‍मरणार्थ पुस्‍तक 'चिन्नीकृष्‍णन: फादर ऑफ द सॅशे रिवॉल्‍यूशन'चे अनावरण हे या कार्यक्रमाचे खास आकर्षण ठरले.
दिवंगत श्री. आर. चिन्नीकृष्‍णन यांच्‍या एफएमसीजी उद्योगाचे नेतृत्‍व करणाऱ्या नाविन्‍यतांचा सन्‍मान करण्‍याच्‍या उद्देशाने त्‍यांच्‍या स्‍मरणार्थ २०११ मध्‍ये सुरू करण्‍यात आलेल्‍या या अवॉर्डने स्‍थापनेपासून आतापर्यंत देशभरातील ३६ उद्योगांना सन्‍मानित केले आहे. आता १३व्‍या वर्षामध्‍ये या पुरस्‍काराने राष्‍ट्रीय स्‍तरावरील सर्वोत्तम उद्योजकांचा शोध घेण्‍यामध्‍ये वाढ केली आहे. तसेच, केविनकेअर इनोव्‍हेशन अवॉर्डसच्‍या विजेत्‍यांना विपणन, वित्त, डिझाइन, पॅकेजिंग, आरअँडडी आणि एचआरमध्‍ये साह्य करण्‍यासोबत मार्गदर्शन करते. याप्रसंगी मत व्‍यक्‍त करत केविनकेअर प्रा. लि.चे अध्‍यक्ष व व्‍यवस्‍थापकीय संचालक सीके रंगनाथन म्‍हणाले, ''आम्‍हाला अपवादात्‍मक व्‍यक्‍तींना प्रशंसित करण्‍याचा अभिमान वाटतो, ज्‍यांच्‍या इनोव्‍हेशन्‍सनी सर्जनशीलतेला चालना देण्‍यासोबत वास्‍तविक विश्‍वातील महत्त्वपूर्ण आव्‍हानांचे निराकरण देखील केले आहे. चिन्नीकृष्‍णन इनोव्‍हेशन अवॉर्डसमधून ही अविरत समर्पितता दिसून येते. अलिकडील वर्षांमध्‍ये या अवॉर्डने भारतातील उद्योजकता इकोसिस्‍टममध्‍ये असलेल्‍या इनोव्‍हेटर्सची वैविध्‍यपूर्ण श्रेणी दाखवली आहे. त्‍यांच्‍या कार्यामधून दिसून येते की दूरदर्शी विचारसरणी आणि उद्योजकता उत्‍साह प्रभावीपणे सामाजिक गरजांची पूर्तता करू शकतात, तसेच आर्थिक विकासाला चालना देऊ शकतात. या इनोव्‍हेटर्सनी पर्यावरण स्थिरतेपासून आरोग्‍यसेवापर्यंतच्‍या समस्‍यांचे निराकरण करण्‍यासाठी तंत्रज्ञान आणि शाश्‍वततेच्‍या क्षमतेचा अवलंब केला आहे. उत्तम कामगिरी करणाऱ्या व्‍यक्‍तींचे अभिनंदन, ज्‍यांची सकारात्‍मक प्रभाव घडवून आणण्‍याप्रती कटिबद्धता आपल्‍या सर्वांना मार्गदर्शक ठरत आहे.''
''मला स्‍वत:ला माझे वडिल दिवंगत श्री. आर. चिन्नीकृष्‍णन यांच्‍या स्‍मरणार्थ पुस्‍तक 'चिन्नीकृष्‍णन: फादर ऑफ द सॅशे रिवॉल्‍यूशन' लाँच करताना अभिमान वाटत आहे. हे पुस्‍तक त्‍यांचा उल्‍लेखनीय दृष्टिकोन व अतूट उत्‍साहाला प्रशंसित करते, ज्‍यामुळे सॅशे क्रांतीला चालना मिळाली असून उद्योगांमध्‍ये परिवर्तन घडवून आले आहे आणि लाखो व्‍यक्‍तींच्‍या जीवनात आमूलाग्र बदल झाले आहेत. सर्वांना दैनंदिन आवश्‍यक गोष्‍टी उपलब्‍ध करून देण्‍याप्रती त्‍यांच्‍या समर्पिततेने भारतीय अर्थव्‍यवस्‍थेवर अमिट छाप सोडली आहे. नाविन्‍यता व चिकाटीचा त्‍यांचा वारसा मला आणि इतरांना आजही प्रेरित करत आहे. मला त्‍यांची गाथा सांगताना अभिमान वाटतो आणि आशा करतो की यामुळे भावी पिढ्यांना धैर्याने विचार करण्‍यास आणि अर्थपूर्ण परिवर्तनाच्‍या दिशेने प्रयत्‍न करण्‍यास प्रेरणा मिळेल,'' असे श्री. सीके रंगनाथन पुढे म्‍हणाले. याप्रंसगी मत व्‍यक्‍त करत मद्रास मॅनेजमेंट असोसिएशन (एमएमए)चे अध्‍यक्ष श्री. के. महालिंगम म्‍हणाले, ''एमएमएला चिन्नीकृष्‍णन इनोव्‍हेशन अवॉर्डससाठी केविनकेअरसोबत सहयोग करण्‍याचा अत्‍यंत अभिमान वाटतो. या सहयोगामधून भारतातील इनोव्‍हेशनच्‍या क्षमतेला प्रशंसित करण्‍याप्रती आणि अर्थपूर्ण परिवर्तनाला चालना देणाऱ्या दूरदर्शी नेतृत्‍वाच्‍या वारसाला सन्मानित करण्‍याप्रती आमची परस्‍पर कटिबद्धता दिसून येते. सहयोगाने, आम्‍ही इनोव्‍हेटर्सना सन्‍मानित व सक्षम करण्‍याप्रती कटिबद्ध आहोत, जे त्‍यांच्‍या उल्‍लेखनीय संकल्‍पनांसह भारताच्‍या भविष्‍याला आकार देत आहेत. तसेच आम्‍ही या सन्‍मानाच्‍या माध्‍यमातून त्‍यांच्‍या महत्त्वाकांक्षांना पाठिंबा देत आहोत.''
नामांकन प्रक्रियेसाठी देशभरातून ३८० अर्ज मिळाले, जेथे प्रक्रिया सल्‍लागार शार्दुल अमरचंद मंगलदास अँड कं. द्वारे सुव्‍यवस्थित करण्‍यात आलेल्‍या विविध कठोर मार्गदर्शकतत्त्वांतर्गत नामांकनांचे मूल्‍यांकन करण्‍यात आले. या प्रतिष्ठित पुरस्‍कारासाठी ज्‍यूरीच्‍या पॅनेलमध्‍ये प्रतिष्ठित व्‍यक्‍तींचा समावेश होता, जसे दक्षिण भारत क्षेत्रातील जनरल ऑफिसर कमांडिंग, एव्‍हीएसएम लेफ्टनंट जनरल करणबीर सिंग ब्रार, सेंट गोबेन इंडिया प्रायव्‍हेट लिमिटेडचे व्‍यवस्‍थापकीय संचालक श्री. ए. आर. उन्नीकृष्‍णन, थेजो इंजीनिअरिंग लिमिटेडचे व्‍यवस्‍थापकीय संचालक श्री. मनोज जोसेफ कल्‍लाराकल, चोलामंडलम एमएस जनरल इन्‍शुरन्‍स कं. लि. चे व्‍यवस्‍थापकीय संचालक श्री. व्‍ही. सुर्यनारायणन, सुपर ऑटो फोर्ज प्रा. लि. चे व्‍यवस्‍थापकीय संचालक श्री. सीतारामन, सुंदरम होम फायनान्‍स लि. चे व्‍यवस्‍थापकीय संचालक श्री. लक्ष्‍मीनारायणन दुराईस्‍वामी आणि हैदराबादमधील आयसीएफएआय फाऊंडेशन फॉर हायर एज्‍युकेशनचे उप-कुलगुरू डॉ. एल. एस. गणेश. खालील उल्‍लेखनीय उद्यमांना प्रतिष्ठित १३व्‍या केविनकेअर-एमएमए चिन्नीकृष्‍णन इनोव्‍हेशन अवॉर्डस् २०२४ सह गौरवण्‍यात आले:

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.