Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*मॅगीकडून नवीन 'हॅप्‍पी बाऊल' लाँच: तरूणांसाठी स्‍वादिष्‍ट नूडल्‍स!*

*मॅगीकडून नवीन 'हॅप्‍पी बाऊल' लाँच: तरूणांसाठी स्‍वादिष्‍ट नूडल्‍स!* पाककला नाविन्‍यतेचा उत्‍साह कायम राहत मॅगीने हॅप्‍पी बाऊल लाँच केले आहे. या नवीन उत्‍पादनामध्‍ये आटाच्‍या पौष्टिकतेसह स्‍वादिष्‍ट चवीचा समावेश आहे. तसेच हे नवीन उत्‍पादन प्रथिने, कॅल्शियम, व्हि‍टॅमिन ए आणि फायबरचा स्रोत आहे. दोन स्‍वादिष्‍ट फ्लेवर्स 'यम्‍मी मसाला' आणि 'ट्विस्‍टी टोमॅटो'मध्‍ये उपलब्‍ध ही असलेली ही नवीन ऑफरिंग तरूणांना अद्वितीय चवींचा आस्‍वाद देण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आली आहे, ज्‍यामधून मॅगीची नाविन्‍यतेच्‍या माध्‍यमातून उत्तम स्‍वाद देण्‍याप्रती कटिबद्धता दिसून येते.
नेस्‍ले इंडियामधील फूड बिझनेसचे संचालक श्री. रजत जैन या नवीन उत्‍पादनाप्रती आनंद व्‍यक्‍त करत म्‍हणाले, ''मॅगीमध्‍ये आम्‍ही उत्‍पादित करणाऱ्या फूडप्रती कटिबद्ध आहोत आणि मॅगी हॅप्‍पी बाऊलचे आमच्‍या मनात अत्‍यंत खास स्‍थान आहे. हे उत्‍पादन कुटुंबामधील सर्वांसाठी आवडती उत्‍पादने निर्माण करण्‍याचा मॅगीचा वारसा कायम ठेवते आणि त्‍यांना अधिक पर्याय देते. मॅगी हॅप्‍पी बाऊल लहान मुलांसाठी आमची ऑफरिंग, तर मातांसाठी गिफ्ट आहे, जेथे प्रत्‍येक बाइटमधून उत्‍साहवर्धक पौष्टिकतेची खात्री मिळते.'' या लाँचला पाठिंबा देत मॅगीने सर्वसमावेशक विपणन मोहिम लाँच केली आहे, जी प्रमुख शहरांमध्‍ये टेलिव्हिजन, डिजिटल मीडिया, प्रिंट आणि आऊटडोअर जाहिरातीच्‍या माध्‍यमातून राबवण्‍यात येईल. या मोहिमेमधून उत्तम चव व पौष्टिकतेचे दुहेरी मिश्रण दिसून येते, जेथे या मोहिमेचा हॅप्‍पी बाऊलला कुटुंबामधील नवीन आवडते उत्‍पादन बनवण्‍याचा मनसुबा आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.