खेलोमोअर क्रिकेट चॅम्प्स: युवा क्रिकेट हिरोंसाठीचा प्रारंभ बिंदू
September 26, 2024
0
खेलोमोअर क्रिकेट चॅम्प्स: युवा क्रिकेट हिरोंसाठीचा प्रारंभ बिंदू
~ क्रिकेट व्हीक्टोरियाच्या प्रमाणित प्रशिक्षकांद्वारे तयार करण्यात आलेला खेलो मोअर क्रिकेट चॅम्प्स अभ्यासक्रम सहा वेगवेगळ्या ठिकाणी उपलब्ध होणार ~
मुंबई, भारत – २५ सप्टेंबर २०२४: एक अग्रगण्य क्रीडा प्लॅटफॉर्म खेलोमोअरने ५ ते १२ वयोगटातील मुलांमध्ये क्रिकेटसाठी आवड निर्माण करण्याचे अभिवचन देणारा खेलोमोअर क्रिकेट चॅम्प्स हा एक अनोखा क्रिकेट कार्यक्रम सुरू करण्याची घोषणा केली आहे. आनंददायी, रचनात्मक आणि नाविन्यपूर्ण प्रशिक्षणाद्वारे युवा, उदयोन्मुख क्रिकेटपटू तयार व्हावेत या दृष्टीने डिझाइन केलेला खेलोमोअर क्रिकेट चॅम्प्स भावी क्रिकेट स्टार्सना घडवण्यासाठी एक केंद्र ठरू शकते.
या कार्यक्रमाच्या वैशिष्ट्यपूर्ण दृष्टिकोनातून कौशल्य विकासासोबतच शारीरिक तयारीचा समन्वय साधून एक सर्वसमावेशक शिकण्याचा अनुभव दिला जातो. क्रिकेट व्हीक्टोरिया (मेलबर्न क्रिकेट अकॅडमी) च्या प्रमाणित प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली, मुलांना मनोरंजक, आनंददायी व्यायामांद्वारे त्यांच्या तंदुरुस्तीमध्ये सुधारणा करत फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण यांसारख्या महत्त्वाच्या तंत्रांचा अभ्यास करायला मिळेल. पग नेट्स आणि द व्ही सारखी आधुनिक, प्रगत उपकरणे प्रत्येक सत्र आकर्षक आणि रोमांचक बनवतील. त्यामुळे मुले सक्रिय राहतील आणि त्यांच्यासाठी महत्त्वाची मोटर स्किल्स विकसित करू शकतील.
“खेलोमोअर क्रिकेट चॅम्प्स प्रत्यक्षात सुरु करण्यात आम्हाला खूप आनंद होत आहे,” असे खेलोमोअरचे सह-संस्थापक जतिन परांजपे म्हणाले. “हा कार्यक्रम मुलांना क्रिकेटचे मूलभूत तत्त्व शिकवण्यापुरता मर्यादित नसून, त्यांना प्रेरणा देण्याचे उद्दिष्ट आहे. ५ ते १२ वयोगटातील मुलांसाठी सुसूत्र प्रशिक्षणात मोठी कमतरता आहे आणि आम्ही हा कार्यक्रम मजेदार, नाविन्यपूर्ण आणि व्यावसायिक बनवून ती कमी भरून काढू इच्छितो. उपनगरांमध्ये हा अभ्यासक्रम सुरू करून, आम्ही शहरभरातील युवा प्रतिभांना त्यांच्या जवळच्या परिसरात जागतिक दर्जाचे क्रिकेट प्रशिक्षण देण्याच्या संधी उपलब्ध करून देत आहोत.”
मुंबईच्या उपनगरांमध्ये प्रारंभ करून, खेलोमोअर क्रिकेट चॅम्प्स तळागाळातील क्रिकेट विकासात एक महत्त्वपूर्ण जागा भरून काढत आहे. पारंपरिक कार्यक्रमांपेक्षा वेगळे काम करत ही अॅकॅडमी क्रिकेटचा खेळ नुकताच खेळायला सुरुवात करणाऱ्या लहान मुलांसाठी एक ताजातवाना, आकर्षक दृष्टिकोन सादर करत आहे. खेलोमोअर क्रिकेट चॅम्प्सच्या मागील कल्पना साधीच परंतु प्रभावशाली आहे: जिथे युवा खेळाडूंना त्यांच्या क्रिकेटिंग कौशल्यांचा विकास करता येईल आणि त्याचवेळी मजेदार आणि आधार देणाऱ्या आनंददायी वातावरणात त्यांची या खेळाची आवड विकसित होईल असे एक नियंत्रित, व्यावसायिक वातावरण पुरविणे.
परंतु खेलोमोअर क्रिकेट चॅम्प्स फक्त क्रिकेटपुरते मर्यादित नाही - हे जीवन कौशल्ये घडविण्याबद्दल आहे. ही अॅकॅडमी युवा खेळाडूंमध्ये टीमवर्क, शिस्त आणि आत्मविश्वास यांना प्रोत्साहन देण्यासाठी डिझाइन केली आहे. तंदुरूस्तीसाठीचे सराव व्यायाम, मैत्रीपूर्ण स्पर्धा आणि संघ बांधणी खेळांच्या मिश्रणाद्वारे, मुलं फक्त क्रिकेटिंग कौशल्येच विकसित करणार नाहीत, तर आयुष्यभर टिकणारी मैत्री आणि खिलाडूवृत्ती याचे महत्त्वही शिकतील.
ही सत्रे उच्च-गुणवत्तेच्या क्रीडा मैदानांवर आयोजित केली जातील. त्यामुळे सर्व खेळाडूंसाठी सुरक्षितता आणि नियंत्रित वातावरण सुनिश्चित होईल. ते मैदानावर पहिले पाऊल ठेवत असोत किंवा त्यांच्या कौशल्यांचा विकास करत असोत, खेलोमोअर क्रिकेट चॅम्प्स प्रत्येक मुलाला एक रोमांचक, व्यावसायिक वातावरणात त्यांच्या क्षमतेचा शोध घेण्याची संधी देईल.