Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

लिंक्‍डइनकडून मराठी, बंगाली, पंजाबी आणि तेलुगूसह १० नवीन भाषा पर्यायांची भर

लिंक्‍डइनकडून मराठी, बंगाली, पंजाबी आणि तेलुगूसह १० नवीन भाषा पर्यायांची भर १ बिलियनहून अधिक सदस्‍य माहिती व संधींसाठी लिंक्‍डइन (LinkedIn)कडे वळत असताना जगातील सर्वात मोठे व्‍यावसायिक नेटवर्क अधिक सर्वसमावेशक आणि वैविध्‍यपूर्ण व्‍यावसायिक कर्मचारीवर्गाला चालना देण्‍यासाठी १० नवीन भाषा पर्यायांची भर करत आहे. नवीन भाषा पर्याय आहेत व्हिएतनामी, ग्रीक, पर्शियन, फिन्निश, हिब्रू, हंगेरियन आणि ४ भारतीय प्रादेशिक भाषा बंगाली, मराठी, तेलुगू व पंजाबी. लिंक्‍डइनची भारतातील सदस्‍य संख्‍या 135 दशलक्ष पलीकडे गेली आहे, जेथे सहभाग दर वार्षिक २० टक्‍क्‍यांनी वाढत आहे. हे नवीन भर करण्‍यात आलेले भाषा पर्याय भारतात वाढती मागणी असताना हिंदीसह पाच भारतीय प्रादेशिक भाषांमध्‍ये लिंक्‍डइन सपोर्ट देतात. या भाषांची भर करत लिंक्‍डइनचा प्‍लॅटफॉर्मवरील भाषेसंदर्भातील अडथळा दूर करण्‍याचा मनसुबा आहे, ज्‍यामुळे अधिकाधिक व्‍यक्‍ती सखोल व्‍यावसायिक ओळख स्‍थापित करू शकतील आणि त्‍यांच्‍या नेटवर्क्‍सशी अधिक अर्थपूर्णपणे संलग्‍न राहू शकतील. लिंक्‍डइनमधील लीडस चीफ पर्ॉडक् र् ट ऑिफसर तोमर कोहन आिण भारतातील संपादकीय प्रमुख निराजिता बॅनर्जी यांचे या विस्‍तारीकरणाबाबत मत येथे जाणून घ्‍या. लिंक्‍डइनवरील समर्थित भाषांबाबत अधिक माहितीसाठी, येथे वाचा.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.