Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

आयोटेकवर्ल्ड एविगेशनला मिळाली डीजीसीएची मान्यता

आयोटेकवर्ल्ड एविगेशनला मिळाली डीजीसीएची मान्यता ~ रिमोट पायलट ट्रेनिंग ऑर्गनायझेशनसाठी मान्यता मिळाली ~ मुंबई, : भारतातील अग्रगण्य ड्रोन निर्माता आयोटेकवर्ल्ड एविगेशनला रिमोट पायलट ट्रेनिंग ऑर्गनायझेशन स्थापन करण्यासाठी नागरी विमानचालन महासंचालनालय (डीजीसीए)कडून मान्यता मिळाली आहे. हा महत्वपूर्ण टप्पा आयोटेकवर्ल्डच्या भारतातील ड्रोन तंत्रज्ञान आणि प्रशिक्षणाच्या उन्नतीसाठी असलेल्या वचनबद्धतेला अधोरेखित करतो, ज्यामुळे कंपनी युएव्ही (अनमॅन्ड एरियल व्हेईकल) उद्योगात आघाडीवर आहे. ही मान्यता आयोटेकवर्ल्डला लहान आणि मध्यम वर्गातील ड्रोनसाठी सर्वसमावेशक प्रशिक्षण देण्याचा अधिकार देते, ज्यामुळे कंपनीच्या क्षमतांमध्ये एक महत्त्वपूर्ण झेप घेता आली आहे. हे प्रशिक्षण डीजीसीए प्रमाणित प्रशिक्षकांद्वारे दिले जाईल, ज्यामुळे सुरक्षा आणि प्राविण्याच्या उच्चतम मानकांचे पालन सुनिश्चित केले जाईल. आयोटेकवर्ल्डच्या आरपीटीओची खासियत म्हणजे त्याचे नाविन्यपूर्ण प्रशिक्षण दृष्टिकोन, जो सैद्धांतिक ज्ञान आणि हस्त-व्यावहारिक ड्रोन उड्डाण अनुभवाचा एकत्रित समावेश करतो.
आयोटेकवर्ल्ड एविगेशनचे सह-संस्थापक व संचालक श्री. दीपक भारद्वाज यांनी सांगितले, “आमच्या रिमोट पायलट ट्रेनिंग ऑर्गनायझेशनसाठी मिळालेली ही डीजीसीए मान्यता आयोटेकवर्ल्ड आणि भारतीय ड्रोन उद्योगासाठी क्रांतिकारक ठरेल. यातून आम्हाला भावी ड्रोन पायलटांना सर्वसमावेशक, उच्च-गुणवत्तेचे प्रशिक्षण देण्याचे सामर्थ्य मिळेल, ज्यामुळे आमची उद्योगातील आघाडीची भूमिका अधिक बळकट होईल. आमचे उद्दिष्ट म्हणजे अशा नवनिर्मित ड्रोन ऑपरेटरच्या पिढीला तयार करणे जे विविध क्षेत्रांमध्ये, विशेषतः आमचे लक्ष कृषी क्षेत्रावर केंद्रित आहे, या तंत्रज्ञानाचा पूर्ण फायदा घेऊ शकतील.” हे अत्याधुनिक रिमोट पायलट ट्रेनिंग ऑर्गनायझेशन सुविधा धोमसपूर रोड, दिल्ली पब्लिक स्कूलजवळ, गुरुग्राम येथे आहे. ही जागा प्रशिक्षार्थ्यांसाठी सहज प्रवेश देताना सैद्धांतिक शिक्षण आणि व्यावहारिक उड्डाण अभ्यास तसेच रिअल-टाइम ऍप्लिकेशन आधारित प्रशिक्षणासाठी आदर्श वातावरण प्रदान करते. नवीन स्थापन करण्यात आलेल्या रिमोट पायलट ट्रेनिंग ऑर्गनायझेशनमध्ये वार्षिक सुमारे ८०० व्यक्तींना प्रशिक्षण देण्याची क्षमता आहे. आयोटेकवर्ल्ड विविध आवश्यकतांना आणि ड्रोन वर्गीकरणांना पूर्ण करण्यासाठी विविध प्रशिक्षण कार्यक्रमांची ऑफर करेल. यामध्ये लहान आणि मध्यम ड्रोनसाठी रिमोट पायलट सर्टिफिकेट कोर्सेस तसेच विशिष्ट ड्रोन मॉडेल्स आणि त्यांच्या वापराबद्दल सखोल ज्ञान देणारे विशेष आरपीसी +ओईएम (ऑरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर) कोर्सेस समाविष्ट आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.