थरमॅक्सकडून बॉयलर इंडिया २०२४ मध्ये शुद्ध हवा, शुद्ध ऊर्जा आणि शुद्ध पाणी
September 29, 2024
0
*थरमॅक्सकडून बॉयलर इंडिया २०२४ मध्ये शुद्ध हवा, शुद्ध ऊर्जा आणि शुद्ध पाणी यामधील तंत्रज्ञानदृष्ट्या प्रगत सोल्यूशन्सचे प्रदर्शन*
ऊर्जा परिवर्तनासाठी हीटींग श्रेणीमध्ये नवीन उत्पादने लाँच
नवी मुंबई, सप्टेंबर २५, २०२४
थरमॅक्स या आघाडीच्या ऊर्जा व पर्यावरण सोल्यूशन्स प्रदाता आणि ऊर्जा परिवर्तनामधील विश्वसनीय सहयोगीने २५ ते २७ सप्टेंबर २०२४ पर्यत सिडको एक्झिबिशन सेंटर, नवी मुंबई येथे आयोजित करण्यात आलेले भारतातील प्रगत बॉयलर तंत्रज्ञानांवरील सर्वात मोठे प्रदर्शन 'बॉयलर इंडिया २०२४'मध्ये शुद्ध हवा, शुद्ध ऊर्जा आणि शुद्ध पाणी यामधील नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानांना दाखवले.
या प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी थरमॅक्सने आपल्या हीटिंग विभागामधील उत्पादनांच्या श्रेणीचे अनावरण केले, ज्यामध्ये नवीन युनिव्हर्सल बायोग्रेट कम्बशन तंत्रज्ञानाचा समावेश होता, जे अद्वितीय बायोमास इंधन स्थिरता देते. या तंत्रज्ञानावर आधारित लाँच करण्यात आलेल्या प्रमुख उत्पादनांमध्ये युनिव्हर्सल बायोग्रेट बॉयलर 'ग्रीनपॅक' आणि थर्मिक फ्लूइड हीटर 'ग्रीनब्लॉक'चा समावेश आहे. तसेच, थरमॅक्सने लघुस्तरीय उद्योगांसाठी डिझाइन करण्यात आलेले प्रबळ इंधन-संचालित लो-रेंज बॉयलर 'थर्मिऑन २.०' लाँच केले. थरमॅक्सचे जुने फॅक्टरी कर्मचारी दिनेश दाखवे व हनमंत बहिरगोंडे, तसेच अध्यक्ष मेहेर पुदुमजी, नॉन-एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर फिरोज पुदुमजी, व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष भंडारी आणि थरमॅक्स लीडरशीप टीमचे इतर सदस्य यांनी उपस्थिती दाखवून या लाँच इव्हेण्टची शोभा वाढवली. ही नवीन उत्पादने उद्योगांना त्यांच्या ऊर्जा परिवर्तन प्रयत्नांमध्ये साह्य करण्याप्रती थरमॅक्सच्या कटिबद्धतेला अधिक दृढ करतात.
नवीन लाँच करण्यात आलेल्या उत्पादनांव्यतिरिक्त थरमॅक्सने बायोगॅस व ग्रीन हायड्रोजन प्युरिफिकेशनसाठी गॅस एनरिचमेंट सोल्यूशन्स थरमॅक्सचे प्रोटोटाइप्स, कार्बन कॅप्चर तंत्रज्ञान, प्रगत झीरो लिक्विड डिस्चार्ज सोल्यूशन्स, हायब्रिड हीट पंप्स, फ्लेक्झीसोर्स™ बॉयलर आणि म्युनिसीपल सॉलिड वेस्ट (एमएसडब्ल्यू)-संचालित बॉयलर्स, तसेच इलेक्ट्रिक हीटिंग सोल्यूशन्सची परिपूर्ण श्रेणी सादर केली. या प्रदर्शनामध्ये थरमॅक्सच्या सेवा व डिजिटल ऑफरिंग्ज देखील पाहायला मिळाल्या.
बॉयलर इंडिया २०२४ मध्ये थरमॅक्सच्या सहभागाबाबत मत व्यक्त करत थरमॅक्सचे व्यवस्थापकीय संचालक (एमडी) व मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आशिष भंडारी म्हणाले, ''हा बॉयलर इंडियामधील आमचा तिसरा सहभाग आहे, जेथे आम्हाला आमच्या प्रगत बॉयलर तंत्रज्ञानांसह प्रक्रिया उद्योगांसाठी आवश्यक असलेल्या सोल्यूशन्सची व्यापक श्रेणी दाखवण्याचा आनंद होत आहे. बदलती धोरणे आणि वाढत्या पर्यावरणीय समस्यांमुळे आम्ही आमच्या इंजीनिअरिंग कौशल्यांचा फायदा घेत सोल्यूशन्स वितरित करतो, जी शुद्ध हवा, शुद्ध ऊर्जा आणि शुद्ध पाणी यांना चालना देतात. यासारखे अनेक सोल्यूशन्स यंदाच्या प्रदर्शनामध्ये दाखवण्यात आले आहेत. नवीन लाँच करण्यात आलेले युनिव्हर्सल बायोग्रेट-आधारित सोल्यूशन्स आमच्या सर्वोत्तम ऑफरिंग्जपैकी आहेत, जे बायोमास इंधनांसह स्थिरतेसाठी अत्याधुनिक कम्बशन तंत्रज्ञानाचा वापर करतात. तसेच यामध्ये राईस स्ट्रॉ सारख्या आव्हानात्मक लो बल्क-डेन्सिटी मटेरिअल्सचा समावेश आहे. या नाविन्यपूर्ण ऑफरिंग्जनी ऊर्जा उपलब्धता आणि शाश्वतता यामधील तफावत दूर करण्याप्रती आमच्या कटिबद्धतेला अधिक दृढ केले आहे.''
थरमॅक्स लिमिटेड बाबत
थरमॅक्स लिमिटेड (एनएसई: THERMAX) हा ऊर्जा व पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांचा आघाडीचा समूह आहे तसेच ऊर्जा परिवर्तनाच्या क्षेत्रातील विश्वासू सहयोगी आहे. थरमॅक्सच्या विस्तृत पोर्टफोलिओमध्ये शुद्ध हवा, शुद्ध ऊर्जा, शुद्ध पाणी आणि रासायनिक उत्पादनांचा समावेश होतो. अनेकविध क्षेत्रातील औद्योगिक भागीदारींच्या जोरावर थरमॅक्सने लेखापरीक्षण, सल्लागार सेवा, अंमलबजावणी व देखभाल यांच्यात भक्कम कौशल्ये विकसित केली आहेत आणि त्याला डिजिटल सोल्यूशन्सची जोड दिली आहे. त्यामुळे कंपनीकडे ऊर्जा व पर्यावरण व्यवस्थापन क्षेत्रातील एकत्रित अनुभव आहे. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण इंजिनीअरिंग क्षमतांचा लाभ घेत थरमॅक्स खर्चाचे रूपांतर नफ्यात करते आणि हे करताना पर्यावरणाचे संरक्षणही करते. हे उद्योगक्षेत्र व एकंदर समाज या दोन्हींच्या फायद्याचे आहे. थरमॅक्सचे भारत, युरोप व आग्नेय आशियामध्ये मिळून एकूण १४ उत्पादन कारखाने आहेत. त्याचप्रमाणे भारतीय व आंतरराष्ट्रीय मिळून ४३ उपकंपन्या आहेत.
अधिक माहितीसाठी www.thermaxglobal.com येथे भेट द्या किंवा LinkedIn वर फॉलो करा.