Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

किया सेल्‍टोस एक्‍स-लाइनचे 'ब्लॅक' एडिशन लॉन्च

किया सेल्‍टोस एक्‍स-लाइनचे 'ब्लॅक' एडिशन लॉन्च मुंबई -- किया इंडिया या देशातील आघाडीच्‍या प्रीमियम कारमेकरने आपल्‍या लोकप्रिय सेल्‍टोस लाइनअपच्‍या एक्‍स-लाइन ट्रिमसाठी नवीन अरोरा ब्‍लॅक पर्ल कलर पर्याय सादर केला आहे. हा पर्याय एक्‍स-लाइनच्‍या विद्यमान मॅट ग्रॅफाइट कलरशी पूरक आहे, ज्‍यामधून ग्राहकांना त्‍यांच्‍या वेईकल्‍सना वैयक्तिक लुक देण्‍यासाठी अधिक मार्ग मिळतात.
अरोरा ब्‍लॅक पर्ल कलर एक्‍स्‍टीरिअर व इंटीरिअर डिझाइन अधिक आकर्षक करते, जे विशिष्‍ट एक्‍स-लाइन स्‍टायलिंगला साजेसे आहे. इंटीरिअर्समध्‍ये ब्‍लॅक व स्‍प्‍लेण्डिड सेज ग्रीनचे विशेष टू-टोन संयोजन आहे, जे लक्‍झरी व अत्‍याधुनिकतेची भर करते. नवीन एक्‍स-लाइन ब्‍लॅकमध्‍ये विविध ग्‍लॉस ब्‍लॅक फिनिश एलीमेंट्स आहेत, जसे फ्रण्‍ट व रिअर स्किड प्‍लेट्स, आऊटसाइड रिअर-व्‍ह्यू मिरर्स, शार्क-फिन अॅण्‍टेना, टेलगेट गार्निश आणि रिअर बम्‍परवर फॉक्‍स एक्‍झॉस्‍ट. या एलीमेंट्समध्‍ये स्किड प्‍लेट्स, साइड डोअर गार्निश व व्‍हील सेटर कॅप्‍सर आकर्षक ‘सन ऑरेंज' अस्‍सेंट्ससह अधिक आकर्षकतेची भर करण्‍यात आली आहे. तसेच, एक्‍स-लाइन मोठ्या १८-इंच अलॉई व्‍हील्‍ससह ड्युअल टोन क्रिस्‍टल कट, ग्‍लॉसी ब्‍लॅक आऊटलाइनसह सुसज्‍ज आहे आणि टेलगेटवरील आयकॉनिक ‘एक्‍स-लाइन' बॅज विशिष्‍टतेची भर करते. नाविन्‍यता आणि एक्‍स-लाइनला मिळालेल्‍या ग्राहकांच्‍या प्रतिसादाबाबत मत व्‍यक्‍त करत किया इंडियाचे मुख्‍य विक्री अधिकारी श्री. जून्‍सू चो म्‍हणाले, “किया सेल्‍टोस आमचे सर्वाधिक विक्री होणारे मॉडेल आहे आणि आम्‍ही ५००,००० युनिट्स विक्रीचा अविश्‍वसनीय टप्‍पा गाठण्‍याच्‍या मार्गावर आहोत.
एक्‍स-लाइन ट्रिमने आधुनिक ग्राहकांचे लक्ष वेधून घेतले आहे, जे त्‍यांच्‍या खरेदी निर्णयांमध्‍ये विशिष्‍ट व विशेष उत्‍पादनांना प्राधान्‍य देतात. त्‍यांची मागणी व अभिप्रायाला प्रतिसाद देत आम्‍हाला एक्‍स-लाइन‍ ट्रिममध्‍ये नवीन ब्‍लॅक कलर पर्याय सादर करण्‍याचा आनंद होत आहे, ज्‍यामुळे ग्राहकांना त्‍यांच्‍या अद्वितीय पसंतींनुसार अधिक पर्याय मिळतील. आम्‍ही ग्राहकांच्‍या पसंतींनुसार विकसित होत राहू, ज्‍यामधून किया त्‍यांचा पसंतीचा ब्रँड म्‍हणून कायम राहण्‍याची खात्री मिळेल.''

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.