Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

इझमायट्रिपचा वैद्यकीय पर्यटन उद्योगात प्रवेश

इझमायट्रिपचा वैद्यकीय पर्यटन उद्योगात प्रवेश ~ रोलिन्‍स इंटरनॅशनल आणि पीफ्लेज होम हेल्‍थकेअरचे संपादन केले ~ मुंबई, २२ सप्टेंबर २०२४: इझमायट्रिप डॉटकॉम या भारतातील सर्वात मोठ्या ऑनलाइन ट्रॅव्‍हल टेक प्लॅटफॉर्मने पीफ्लेज होम हेल्‍थकेअरमध्‍ये ४९ टक्‍के इक्विटी हिस्‍सा आणि रोलिन्‍स इंटरनॅशनलमध्‍ये ३० टक्‍के इक्विटी हिस्‍सा संपादित केल्‍याची घोषणा केली आहे, यासह झपाट्याने विकसित होत असलेल्‍या वैद्यकीय पर्यटन क्षेत्रात धोरणात्‍मक विस्‍तारीकरण केले आहे. हे संपादन वैद्यकीय पर्यटन म्‍हणून आपल्‍या सेवा पोर्टफोलिओमध्‍ये वेलनेस व आरोग्‍यसेवांचा समावेश करत सर्वांगीण प्रवास सोल्‍यूशन्‍स देण्‍याप्रती इझमायट्रिपच्‍या मिशनशी संलग्‍न आहे.
इझमायट्रिपचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी व सह-संस्‍थापक श्री. निशांत पिट्टी म्‍हणाले, ''रोलिन्‍स इंटरनॅशनल आणि पीफ्लेज होम हेल्‍थकेअरच्‍या समावेशामुळे इझमायट्रिपचा पोर्टफोलिओ मोठ्या प्रमाणात वाढला आहे. वैद्यकीय पर्यटनामध्‍ये क्रांती घडवून आणण्‍याच्‍या दिशेने आमच्‍यासाठी ही महत्त्वपूर्ण प्रगती आहे. उपलब्‍ध होण्‍याजोगे, दर्जात्‍मक आरोग्‍यसेवांसाठी वाढत्‍या मागणीमुळे हे संपादन वेलनेस व वैद्यकीय सोल्‍यूशन्‍सचा शोध घेणाऱ्या पर्यटकांच्‍या सर्वसमावेशक गरजांची पूर्तता करण्‍यासाठी आवश्‍यक होते. भारतातील विश्‍वसनीय प्रवास सहयोगी इझमायट्रिप पुढाकार घेण्‍यास आणि विनासायास आरोग्‍यसेवा सुविधा देण्‍यास सज्‍ज आहे. आम्‍ही देशांतर्गत व आंतरराष्‍ट्रीय ग्राहकांना प्रत्‍येक पावलावर सोईस्‍करपणे उच्‍च दर्जाची केअर सेवा मिळण्‍याची खात्री घेण्‍याप्रती कटिबद्ध आहोत.'' इझमायट्रिपने दुबईमध्‍ये मुख्‍यालय असलेली प्रख्‍यात होम हेल्‍थकेअर प्रदाता पीफ्लेज होम हेल्‍थकेअरला संपादित केले आहे. पीफ्लेज विविध विभागांमध्‍ये सर्वसमावेशक केअर सेवा देते, जसे डॉक्‍टर व्हिझिट , रजिस्‍टर्ड नर्सिंग केअर अॅट होम, फिजियोथेरपी आणि व्‍हेंटिलेटर्स व ऑक्सिजन यासारखे होम-बेस्‍ड वैद्यकीय उपकरण. त्‍यांच्‍या रूग्‍ण-केंद्रित दृष्टिकोनामधून क्‍लायण्‍ट्सच्‍या घरांमध्‍ये उच्‍च दर्जाची व सर्वसमावेशक केअर सेवांची खात्री मिळते. पीफ्लेजचे संपादन इझमायट्रिपला विश्‍वसनीय आरोग्‍यसेवा देण्‍यास, वैद्यकीय पर्यटन क्षेत्रात ऑफरिंग्‍ज विस्‍तारित करण्‍यास सक्षम करेल, ज्‍यामुळे परदेशात वैद्यकीय उपचार किंवा वेलनेस सोल्‍यूशन्‍सचा शोध घेणाऱ्या पर्यटकांच्‍या गरजांची पूर्तता होईल. पीफ्लेज होम हेल्‍थकेअर व्‍यतिरिक्‍त रोलिन्‍स इंटरनॅशनलची भारतात प्रबळ उपस्थिती आहे, जेथे त्‍यांचा ग्‍लुटेन-मुक्‍त, लॅक्‍टोज-मुक्‍त व अॅलर्जी-मुक्‍त फूड उत्‍पादने, उच्‍च गुणकारी हेल्‍थ सप्‍लीमेंट्स आणि अत्‍याधुनिक वेलनेस थेरपींवर लक्ष केंद्रित आहे. रोलिन्‍स अत्‍याधुनिक वेलनेस डिवाईसेस, पोषणाबाबत मार्गदर्शन आणि करमणूकीची सुविधा देणाऱ्या ब्रँड्सच्‍या श्रेणीचे कार्यसंचालन देखील पाहते. रोलिन्‍सची प्रमुख वेलनेस केंद्रे आता नवीन दिल्‍ली, गुरूग्राम, मुंबई, हैदराबाद व बेंगळुरूमध्‍ये आहेत आणि लवकरच इतर ठिकाणी, शहरे व देशांमध्‍ये असणार आहेत. हे संपादन इझमायट्रिपला फूड अॅलर्जी, विशिष्‍ट वेलनेस गरजा आणि जीवनशैलीसंदर्भात आव्‍हानांचा सामना करणाऱ्या ग्राहकांच्‍या अद्वितीय गरजांची पूर्तता करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आलेल्या प्रबळ पोर्टफोलिओसह आरोग्‍यसेवा बाजारपेठेत प्रवेश करण्‍यास साह्य करते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.