Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

इंडिरोचे आर्थिक वर्षात १०० हून अधिक संस्थांसोबत भागीदारीचे लक्ष्य

इंडिरोचे आर्थिक वर्षात १०० हून अधिक संस्थांसोबत भागीदारीचे लक्ष्य मुंबई, २३ सप्टेंबर २०२४: इंटरनोव्हो व्हेंचर्स अंतर्गत एक अग्रणी बीटूबीटूसी कर्ज देणारी कंपनी इंडिरोने अर्थिक वर्ष २०२५ मध्ये १०० हून अधिक संस्थांसोबत धोरणात्मक भागीदारी करण्याचे ठरवले असून आपली नवीन योजना जाहीर केली आहे. कर्ज वितरण आणि गुंतवणुकीला आकार देण्याच्या कंपनीच्या मोहिमेचा एक भाग म्हणून हा विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारतातील बीटूबीटूसी कर्ज देण्याचे व्यासपीठ म्हणून इंडिरोकडे पाहण्यात येते. कर्ज देण्यातील मूल्यांकन प्रक्रियेतील प्रमुख अकार्यक्षमता दूर करणारे नाविन्यपूर्ण ऑफर देऊन स्वतंत्र वितरकांना सशक्त बनविण्याकडे लक्ष देत आहे. फिनटेक उद्योग विकसित होत असताना, इंडिरो त्याच्या मालकीच्या कर्ज वितरण प्लॅटफॉर्मसह एक वेगळा विचार सध्या करत आहे. वितरकांना कार्यक्षमतेने ग्राहकांना सुविधा देण्यास आणि मूलभूत क्रेडिट मूल्यांकन आयोजित करण्यास अनुमतीही देण्यात येते. कर्जाचे अर्ज सर्वात योग्य फायनान्सर्सकडे धोरणात्मकपणे ठेवण्यात आले आहेत. ही प्रक्रिया केवळ ग्राहक क्रेडिटपात्र नाहीत हे शोधण्यासाठी निधीधारकांना प्रकरणे विपणन करण्यासाठी वेळखाऊ आणि अनेकदा निराशाजनक कार्य दूर ठेवण्यात मोठी मदत करते. या आव्हानांवर उपाय करून इंडिरो आपल्या भागीदारांसाठी संपूर्ण कर्ज वितरण प्रक्रिया सुव्यवस्थित करण्याचा प्रयत्न करत आहे. आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी इंडिरोने "फक्त आमंत्रित करून' कर्ज देणारा मार्केटप्लेस लॉन्च केला आहे. हे चॅनल भागीदारांना संपूर्ण भारतातील फायनान्सर्सच्या नेटवर्कमध्ये ग्राहक अर्ज सादर करण्यास अनुमती देते. तसेच कर्ज सुरक्षित करण्यासाठी अधिक कार्यक्षम मार्ग तयार करते. हे नाविन्यपूर्ण व्यासपीठ वितरकांना संबंधित कर्जदारांशी जोडण्याची इंडिरोची क्षमता मजबूत करते. तसेच कर्ज मंजूरी आणि वितरणाची गती आणि कार्यक्षमताही सुधारण्यास मदत करते. सध्या, इंडिरो दरमहा २५ कोटी रुपये कर्ज वितरण करत आहे. पुढील दोन तिमाहीत हा आकडा दरमहा १०० कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. ही वाढ इंडिरोची कार्यक्षमता आणि भारतभर भागीदारी निर्माण करण्याची वचनबद्धता दर्शवते. अर्थिक वर्ष २०२५ च्या अखेरीस, इंडिरो १०० हून अधिक भागीदार इंटरनोवो ब्रँड अंतर्गत कार्यरत करण्यास प्रयत्नशील असेल. त्यांच्या कर्ज वितरण नेटवर्कचा विस्तार करेल.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.