Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

आयओएएचा ‘एस्‍सेज फॉर पीस’ अभियानात सहभाग

आयओएएचा ‘एस्‍सेज फॉर पीस’ अभियानात सहभाग मुंबई, २५ सप्टेंबर २०२४: इंडियन आऊटडोअर अॅडव्‍हर्टायझिंग असोसिएशन (आयओएए)ने यूएन आंतरराष्‍ट्रीय शांतता दिनाच्या निमित्ताने एस्‍सेज फॉर पीस जागतिक अभियानात सहभाग घेतला. या उपक्रमाचा भाग म्‍हणून डिजिटल-आऊट-ऑफ-होम (ओओएच) सहयोगींनी शांतता व एकतेचे प्रतीक असलेली प्रज्‍वलित मेणबत्ती संपूर्ण भारतात दुपारी पाच मिनिटांसाठी डिजिटल स्क्रिन्‍सवर दाखवली. हा उपक्रम जगभरातील अशाच प्रकारच्‍या प्रदर्शनांशी संलग्‍न होता. शब्‍द किंवा लोगो नसलेल्‍या या इमेजने आशा व एकतेसाठी सार्वत्रिक आवाहन केले, ज्‍यामधून आजच्‍या युगामध्‍ये शांततेची नितांत गरज दिसून येते.
भारतात या उपक्रमाला उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रमुख ओओएच मीडिया कंपन्‍या जसे नेटवर्क अॅडव्‍हर्टायझिंग, वॉलोप, लक्ष्‍य मीडिया, जागरण एंगेज, एएस अॅडव्‍हर्टायझिंग, रोशन स्‍पेस, सिम्‍बायोसिस, अलख अॅडव्‍हर्टायझिंग, व्‍योमा टेक्‍नॉलॉजीज आणि ब्रँड्स ऑन व्‍हील्‍स, पायोनियर पब्लिसिटी एकत्र येऊन ही मोहिम राबवली. ओओएच मीडिया सहयोगींच्‍या संयुक्‍त नेटवर्कने दिल्‍ली, मुंबई, चेन्‍नई, कोलकाता, हुबळी, लखनौ, अलिगड, रायपूर, नोएडा, सिकंदराबाद आणि गोवा अशा विविध ठिकाणी मेणबत्तीचे यशस्‍वी प्रदर्शन केले. अशा व्‍यापक भौगोलिक क्षेत्रामधील विनासायास अंमलबजावणीमधून भारतीय ओओएच क्षेत्राची आंतरराष्‍ट्रीय दर्जाच्‍या उपक्रमांना जलदपणे आणि कार्यक्षमपणे चालना देण्‍याची क्षमता दिसून आली.
आयओएएचा सहभाग भारतीय ओओएच उद्योगाला वर्ल्‍ड आऊट ऑफ होम ऑर्गनायझेशन (डब्‍ल्‍यूओओ) सोबत सहयोगाच्‍या माध्‍यमातून आंतरराष्‍ट्रीय मानकांशी संलग्‍न करण्‍याच्‍या त्‍यांच्‍या सुरू असलेल्‍या प्रयत्‍नाचा भाग आहे, ज्‍यामधून क्षेत्राची जागतिक मंचावर संलग्‍न होण्‍याची क्षमता दिसून येते. इंडियन आऊटडोअर अॅडव्‍हर्टायझिंग असोसिएशनचे अध्‍यक्ष आणि जागरण प्रकाशन लिमिटेडच्या युनिट जागरण एंगेजचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्री. पवन बंसल म्‍हणाले, ''आयओएएला जागतिक उपक्रम व चळवळ 'एस्‍सेज फॉर पीस'चा भाग म्‍हणून आंतरराष्‍ट्रीय शांतता दिन साजरा करण्‍याचा आनंद होत आहे. हा उपक्रम आजच्‍या युगामध्‍ये संबंधित व आवश्‍यक असण्‍यासोबत जागतिक वर्ल्‍ड आऊट ऑफ होम समुदायामध्‍ये एकीकृत होण्‍याच्‍या आयओएएच्‍या व्‍यापक मिशनचा भाग देखील आहे, ज्‍यामागे भारतीय आऊट-ऑफ-होम उद्योगाला आंतरराष्‍ट्रीय मानकांशी संलग्‍न करण्‍याचा मनसुबा आहे.''
भविष्‍यात, भारतीय आऊट ऑफ होम प्‍लॅटफॉर्म विविध इव्‍हेण्‍ट्सचे आयोजन करेल. आयओएएद्वारे नेतृत्वित प्रमुख उपक्रमाचा भारतातील ओओएच उद्योगाला इको-फ्रेण्‍डली व शाश्‍वत बनवण्‍याचा मनसुबा आहे, तसेच २०३० पर्यत निव्‍वळ शून्‍य उत्‍सर्जन संपादित करण्‍याचे लक्ष्‍य आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.