Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

एसएव्‍हीडब्‍ल्‍यूआयपीएलच्या विद्यार्थ्यांनी नाविन्‍यपूर्ण पिकअप ट्रक डिझाइन केला

एसएव्‍हीडब्‍ल्‍यूआयपीएलच्या विद्यार्थ्यांनी नाविन्‍यपूर्ण पिकअप ट्रक डिझाइन केला ~ टायगुन एसयूव्‍ही आणि व्‍हर्टस सेदानला एकत्र करत पिकअप ट्रक कन्‍सेप्‍टला दिला नवीन आकार ~
मुंबई, २५ सप्टेंबर २०२४: स्‍कोडा ऑटो फोक्‍सवॅगन इंडिया प्रायव्‍हेट लिमिटेड (एसएव्‍हीडब्‍ल्‍यूआयपीएल) आपल्‍या स्‍टुडण्‍ट कार प्रोजेक्‍टच्‍या माध्‍यमातून सरकारच्‍या 'स्किल इंडिया' उपक्रमाप्रती कटिबद्ध आहे. या वर्षी, मेकट्रॉनिक्‍स विद्यार्थ्‍यांनी फोक्‍सवॅगन टायगुन एसयूव्‍ही आणि फोक्‍सवॅगन व्‍हर्टस सेदानला एकत्र करत नाविन्‍यपूर्ण पिकअप ट्रक डिझाइन केला आहे. कार संकल्‍पनेला अंतिम रूप देणे, संकल्‍पनांचा संग्रह, बाजारपेठ विश्‍लेषण, संशोधनव विकास, खरेदी, पॅकिंग आणि नऊ महिन्‍यांहून अधिक कालावधीमध्‍ये लाँचसाठी अंतिम कार टेस्टिंग अशा विविध टप्‍प्‍यांमध्‍ये हा प्रकल्‍प राबवण्‍यात आला. विद्यार्थ्‍यांनी विविध पार्टस् डिझाइन व ३डी-प्रिंटींग केले, ज्‍यामधून डिझाइनमधील आव्‍हानांचे निराकरण करण्‍यासाठी अत्‍याधुनिक उत्‍पादन तंत्रांचा वापर करण्‍याबाबत त्‍यांच्‍या क्षमतेला दाखवले. त्‍यांनी वेईकलला अंडरबॉडी प्रोटेक्‍शन, स्‍टडेड टायर्स, अॅम्बियण्‍ट लायटिंग आणि स्‍पेशल रूफ-माऊंटेड लाइट्स अशा विशेषीकृत अॅक्‍सेसरीजसह सुसज्‍ज केले, ज्‍यामधून शक्तिशाली पिकअप ट्रक डिझाइन करण्‍यात आले. संपूर्ण प्रकल्‍पादरम्‍यान एसएव्‍हीडब्‍ल्‍यूआयपीएलमधील कुशल व्‍यावसायिकांनी विद्यार्थ्‍यांना मार्गदर्शन केले. मेन्‍टोर्सनी विद्यार्थ्‍यांना पुरवठादार व उद्योग तज्ञांसोबत सहयोग करण्‍यास मार्गदर्शन करण्‍यासोबत मदत केली, तसेच त्‍यांच्‍या नाविन्‍यपूर्ण संकल्‍पनांना प्रत्‍यक्षात आणण्‍यास देखील साह्य केले. हा प्रकल्‍प कंपनी राबवत असलेल्‍या इतर उपक्रमांपैकी एक आहे, जे नुकतेच घोषणा करण्‍यात आलेल्‍या केंद्रीय अर्थसंकल्‍प २०२४ मधील दृष्टिकोनानुसार सरकारच्‍या तरूणांना कुशल करण्‍यावरील फोकसशी संलग्‍न आहेत.
स्‍कोडा ऑटो फोक्‍सवॅगन इंडिया प्रायव्‍हेट लिमिटेडचे व्‍यवस्‍थापकीय संचालक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी पियुष अरोरा म्‍हणाले, ''स्‍टुडण्‍ट कार प्रोजेक्‍टचा भाग महणून आमच्‍या मेकट्रॉनिक्‍स विद्यार्थ्‍यांची पिकअप ट्रक विकसित करण्‍याची अद्वितीय संकल्‍पना पाहून आम्‍ही प्रभावित झालो आहोत. आमचा अद्वितीय स्‍टुडण्‍ट कार प्रोजेक्‍ट उत्तम प्‍लॅटफॉर्म आहे, जो भावी गतीशीलता शेअर करण्‍यासाठी विद्यार्थ्‍यांच्‍या कल्‍पनाशक्‍तीला वाव देतो. या प्रकल्‍पाच्‍या माध्‍यमातून आम्‍ही देशाच्‍या 'स्किल इंडिया' मिशनशी संलग्‍न झालो आहोत, जेथे आम्‍ही स्‍थानिक टॅलेंट जागतिक इकोसिस्‍टममध्‍ये प्रगती करू शकणारी प्रत्‍यक्ष अध्‍ययनाची संस्‍कृती बिंबवत आहोत. आमचा ठाम विश्‍वास आहे की, सरकारचे हे उपक्रम 'विकसित भारत'साठी मुलभूत ठरतील. स्‍कोडा ऑटो फोक्‍सवॅगन इंडियामध्‍ये आम्‍ही समाजाच्‍या एकूण विकासाप्रती, स्‍थानिक समुदायांना पाठिंबा देण्‍याप्रती आणि तरूणांना सक्षम करण्‍याप्रती कटिबद्ध आहोत.''

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.