Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*फ्लिपकार्ट बिग बिलियन डे सेलदरम्‍यान सॅमसंग गॅलॅक्‍सी ए१४ ५जी फक्‍त ९९९९ रुपायांमध्ये*

*फ्लिपकार्ट बिग बिलियन डे सेलदरम्‍यान सॅमसंग गॅलॅक्‍सी ए१४ ५जी फक्‍त ९९९९ रुपायांमध्ये* भारत - सप्‍टेंबर, २०२४: सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स ब्रँडने आज भारतातील सर्वाधिक विक्री होणारा ५जी स्‍मार्टफोन[1] गॅलॅक्‍सी ए१४ ५जी फ्लिपकार्टच्‍या आगामी बिग बिलियन डेज सेलदरम्‍यान अद्वितीय ऑफर्ससह उपलब्‍ध असण्‍याची घोषणा केली. ग्राहक २६ सप्‍टेंबरपासून बिग बिलियन डेजमध्‍ये ४ जीबी + १२८ जीबी व्‍हेरिएण्‍टसाठी ९९९९ रूपयांपासून सुरू होणाऱ्या निव्‍वळ खास किमतीत त्‍यांचा आवडता ५जी स्‍मार्टफोन खरेदी करू शकतील. या डिलमध्‍ये ६५०० रूपयांची नियमित सूट आणि १००० रूपयांची त्‍वरित सूट (मूळ किंमत १७४९९ रूपयांवर) यांचा समावेश आहे. ६ जीबी + १२८ जीबी व्‍हेरिएण्‍ट फक्‍त १०९९९ रूपयांच्‍या निव्‍वळ प्रभावी किमतीत उपलब्‍ध असेल. या किमतीमध्‍ये ९००० रूपयांची नियमित सूट आणि १००० रूपयांची त्‍वरित सूट (मूळ किंमत २०९९९ रूपयांवर) यांचा समावेश आहे.
गॅलॅक्‍सी ए१४ ५जी मध्‍ये सिग्‍नेचर फ्लोटिंग कॅमेरा डिझाइनसह सॅमसंग गॅलॅक्‍सीचा[2] एकमेव ५० मेगापिक्‍सल ट्रिपल रिअल कॅमेरा, तसेच हाय क्‍वॉलिटी फोटोंसाठी डेप्‍थ व मॅक्रो लेन्‍स, ६.६ इंच फुल एचडी+ डिस्‍प्‍ले आणि डॉल्‍बी अॅटमॉस सपोर्ट आहे. गॅलॅक्‍सी ए१४ ५जी डार्क रेड, लाइट ग्रीन आणि ब्‍लॅक या तीन आकर्षक रंगांमध्‍ये येतो. या स्मार्टफोनमध्‍ये एक्झिनॉस १३३० प्रोसेसरची शक्‍ती आहे. हा स्‍मार्टफोन सेगमेंटमधील लीडिंग गीकबेंच स्‍कोअर्स[3] वितरित करतो, ज्‍यामधून सुलभ कार्यक्षमतेची खात्री मिळते. तसेच, या स्‍मार्टफोनमध्‍ये ६ जीबी रॅमसह जवळपास ६ जीबी रॅम प्‍लस आहे, ज्‍यामुळे एकाच वेळी अधिक अॅप्‍स कार्यान्वित होऊ शकतात. गॅलॅक्‍सी ए१४ ५जी मध्‍ये सॅमसंगचे अद्वितीय 'वॉइस फोकस' वैशिष्‍ट्य देखील आहे, जे पार्श्‍वभूमीमधील आवाजाला दूर करत कॉल्‍सदरम्‍यान वॉइस क्‍वॉलिटी वाढवते, ज्‍यामुळे गोंधळाचे वातावरण असताना देखील फोनवर सुस्‍पष्‍टपणे संवाद साधण्‍याची खात्री मिळते. हे वैशिष्‍ट्य गुगल मीट, मायक्रोसॉफ्ट टीम्‍स, व्‍हॉट्सअॅप व झूम अशा व्हिडिओ आणि वॉइस कॉलिंग अॅप्‍ससोबत देखील काम करते, ज्‍यामुळे युजर अनुभव अधिक उत्‍साहित होतो. तसेच, सर्वोत्तम वन यूआय६ सॉफ्टवेअरसह वापरकर्ते व्हिडिओ वॉलपेपर्स किंवा इमोजीचा वापर करत लॉक स्क्रिन सानुकूल करू शकतात. वापरकर्ते व्‍यक्‍तींच्‍या कॉन्‍टॅक्‍ट्ससाठी अवतार्ससह कॉल पार्श्‍वभूमी देखील वैयक्तिकृत करू शकतात.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.