किया कार्निवल लिमोझिनला पहिल्याच दिवशी रेकॉर्ड बुकिंग मिळाली
September 25, 2024
0
किया कार्निवल लिमोझिनला पहिल्याच दिवशी रेकॉर्ड बुकिंग मिळाली
~ पहिल्या २४ तासांमध्ये १,८२२ प्री-ऑर्डर्स प्राप्त झाल्या ~
मुंबई, २१ सप्टेंबर २०२४: वर्षातील बहुप्रतिक्षित लाँच नवीन किया कार्निवल लिमोझिनने पहिल्या २४ तासांमध्ये १,८२२ प्री-ऑर्डर्ससह सेगमेंट-लीडिंग टप्पा गाठला आहे. यामुळे विभागासाठी नवीन बेंचमार्क स्थापित झाला आहे, तसेच मागील जनरेशनच्या फर्स्ट-डे १,४१० बुकिंग्जचा टप्पा देखील पार झाला आहे. किया कार्निवलच्या नवीन जनरेशनने तिच्या श्रेणीमध्ये ट्रेण्डसेटर म्हणून आधीच दर्जा स्थापित केला आहे आणि ३ वर्षांच्या कार्यसंचालनामध्ये १४,५४२ युनिट्सच्या विक्रीची नोंद केली आहे.
नवीन किया कार्निवल लिमोझिनसाठी बुकिंग्जना १६ सप्टेंबर २०२४ रोजी सुरूवात झाली. ही वेईकल किया इंडियाची ऑफिशियल वेबसाइट आणि देशभरातील अधिकृत डिलरशिप्सच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली. ग्राहकांनी सुरूवातीची रक्कम म्हणून २००,००० रूपये देय देत बुकिंग्ज सुनिश्चित केल्या.
किया इंडियाचे चीफ सेल्स ऑफिसर जून्सू चो म्हणाले, ''आमच्यासाठी हा अभिमानास्पद क्षण आहे, जेथे नवीन कार्निवल नवीन मानक स्थापित करत आहे. आम्हाला विश्वास आहे की, कार्निवल लिमोझिन सेगमेंटला नव्या उंचीवर घेऊन जाईल. वैशिष्ट्यपूर्ण डिझाइन, लक्झरीअस वैशिष्ट्ये आणि सेगमेंट-फर्स्ट तंत्रज्ञानांसह कार्निवल उद्योग बेंचमार्क्सना पुढे घेऊन जात आहे.''
नवीन किया कार्निवल लिमोझिन अत्याधुनिक व लक्झरीअस वैशिष्ट्यांसह सर्वांचे लक्ष वेधून घेण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे, जसे सेकंड रो लक्झरी पॉवर्ड रिलॅक्सेशन सीट्ससह व्हेण्टिलेशन व लेग सपोर्ट, वन टच स्मार्ट पॉवर स्लायडिंग डोअर, वाइड इलेक्ट्रिक ड्युअल सनरूफ, १२-स्पीकर बोस प्रिमियम साऊंड सिस्टम, ड्युअल पॅनोरॅमिक कर्व्ह डिस्प्ले: ३१.२४ सेमी (१२.३ इंच) सीसीएनसी इन्फोटेन्मेंट, ३१.२४ सेमी (१२.३ इंच) क्लस्टर, एडीएएस लेव्हल २ सह २३ ऑटोनॉमस वैशिष्ट्ये आणि इतर अनेक, ज्यामधून सुरक्षित व आरामदायी प्रवासाची खात्री मिळते.
प्री-लाँच बुकिंगला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद, तसेच अपवादात्मक फर्स्ट-डे आकडेवारींमुळे किया इंडियाची भारतातील ग्राहकांशी संलग्न होणारी उल्लेखनीय उत्पादने वितरित करण्याप्रती कटिबद्धता अधिक दृढ झाली आहे.