Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

झेलियो ईबाईक्सने नवीन 'Eeva' सीरीज लॉन्च केली

झेलियो ईबाईक्सने नवीन 'Eeva' सीरीज लॉन्च केली ~ इवा सिरीजमध्ये Eeva, Eeva Eco आणि Eeva ZX+ मॉडेलचा समावेश ~
मुंबई: भारताच्या इलेक्ट्रिक टू-व्हीलर मार्केटमधील अग्रेसर कंपनी असलेल्या झेलियो ईबाईक्सने आपली नवीनतम श्रेणी, Eeva सीरीज लाँच करण्याची घोषणा केली आहे. रु. ५६,०५१ आणि ९०,५०० (एक्स-शोरूम) दरम्यानच्या किंमतींसह, Eeva सीरीज द्वारे Eeva, Eeva Eco आणि Eeva ZX+ यासह तीन वेगळे मॉडेल ऑफर करण्यात आले आहे. ग्रेसी सीरीज आणि एक्स मेन लो-स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर सारख्या पूर्वीच्या मॉडेल्सच्या यशावर आधारित, Eeva सीरीज विद्यार्थी, व्यावसायिक आणि तात्पुरत्या कामगारांसह शहरी प्रवाशांसाठी त्यांना हवी तशी नाविन्यपूर्ण, पर्यावरणास अनुकूल गतिशीलता उपाय पुरवण्यासाठी झेलियोची सतत वचनबद्धता दर्शवते. Eeva मॉडेल हे, जशी पाहिजे तशी दैनंदिन शहरी गतिशीलता पुरवण्यासाठी तयार करण्यात आले आहे, ज्यामध्ये एक मजबूत बीएलडीसी मोटर (६०/७२व्ही), एकूण वजन ८० कि.ग्रॅ. आणि लोडिंग क्षमता १८० कि.ग्रॅ. आहे. ही स्कूटर समोरील आणि मागील दोन्ही बाजूस ड्रम ब्रेकसह सुसज्ज आहे, ज्यामुळे थांबण्याची विश्वसनीय शक्ती सुनिश्चित केली जाते. खडबडीत पृष्ठभागांवरही सहजपणे प्रवास घडवून आणणाऱ्या हायड्रॉलिक शॉक अॅबसॉर्बरचे रायडर्स कौतुक करतील. Eeva मध्ये अँटी-थेफ्ट अलार्म, रिव्हर्स गियर, पार्किंग स्विच, ऑटो रिपेअर स्विच, यूएसबी चार्जर आणि डिजिटल डिस्प्ले यासारख्या प्रगत वैशिष्ट्यांचाही समावेश आहे, ज्यामुळे हा प्रवाशांसाठी एक हुशार पर्याय बनतो. इवा निळा, राखाडी, पांढरा आणि काळा या रंगांत उपलब्ध
Eeva Eco मध्ये, Eeva च्या पावलावर पाऊल ठेवून, दमदार कामगिरीसह स्टायलिश डिझाइनचे मिश्रण आहे. या मॉडेलमध्ये ८० कि.ग्रॅ. वजन आणि १८० कि.ग्रॅ. वजनाची भरीव लोडिंग क्षमता आहे, ज्यामुळे टिकाऊपणा आणि क्षमता दोन्हीची खात्री होते. मागील बाजूस ड्रम ब्रेक आणि पुढच्या बाजूला डिस्क ब्रेकसह सुरक्षितता वाढविली जाते, तर पुढची रिम मिश्र धातुपासून तयार करण्यात आली आहे. Eeva Eco मध्ये, Eeva मध्ये असलेल्या रिव्हर्स गियर, पार्किंग स्विच, ऑटो रिपेअर स्विच आणि यूएसबी चार्जर यांसारख्या वैशिष्ट्यांचा पूर्ण संच देखील आढळून येतो. ही स्कूटर ४८/६०व्ही बीएलडीसी मोटरवर चालते आणि तिला पुढील आणि मागील दोन्ही बाजूस हायड्रॉलिक शॉक अॅबसॉर्बर जोडलेले आहेत, शिवाय तिच्यात अतिरिक्त सुरक्षिततेसाठी डिजिटल डिस्प्ले आणि सेंट्रल लॉकिंग देखील आहे. Eeva Eco ही निळा, राखाडी, पांढरा आणि काळा आणि लाल या रंगाच्या चैतन्यपूर्ण पॅलेटमध्ये उपलब्ध आहे. Eeva ZX+ मॉडेल हे, प्रीमियम इलेक्ट्रिक स्कूटरचा अनुभव घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी तयार करण्यात आले आहे. हे एक मजबूत बीएलडीसी मोटर (६०/७२व्ही), एकूण वजन ९० कि.ग्रॅ., आणि १८० कि.ग्रॅ. लोडिंग क्षमतेसह सुसज्ज आहे. ZX+ मध्ये फ्रंट डिस्क ब्रेक आणि मागील ड्रम ब्रेकची वैशिष्ट्ये आहेत, ज्यामुळे असाधारण नियंत्रण आणि सुरक्षितता सुनिश्चित होते. या मॉडेलमध्ये Eeva आणि Eeva Eco च्या सर्व प्रगत वैशिष्ट्यांचा समावेश आहे, जसे की अँटी-थेफ्ट अलार्म, रिव्हर्स गियर, पार्किंग स्विच, ऑटो रिपेअर स्विच, यूएसबी चार्जर आणि डिजिटल डिस्प्ले. Eeva ZX+ निळा, राखाडी, पांढरा आणि काळा या रंगात उपलब्ध आहे.
झेलियो ईबाईक्सचे सह-संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक, श्री. कुणाल आर्य म्हणाले, “Eeva सीरीजची ओळख भारतातील शहरी गतिशीलता बदलण्याच्या आमच्या प्रवासातील एक महत्त्वपूर्ण मैलाचा दगड आहे. आमच्या पूर्वीच्या लो-स्पीड मॉडेल्सच्या यशावर आधारित, ज्यांना त्यांच्या विश्वासार्हता आणि कार्यक्षमतेसाठी चांगला प्रतिसाद मिळाला आहे, आम्ही विविध ग्राहकांच्या गरजा पूर्ण करणारी वर्धित श्रेणी ऑफर करण्यास उत्सुक आहोत. Eeva सीरीज सुधारित सुरक्षा यंत्रणा, आधुनिक डिझाइन घटक आणि उच्च कार्यक्षमता यासारख्या प्रगत वैशिष्ट्यांना एकत्रित करते, ज्यामुळे लो-स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर विभागात नवीन मापदंड स्थापित केला जातो."

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.