*Samsung TV Plus ने आपल्या मोफत चॅनेल ऑफरिंग्जमध्ये केली वाढ*
September 18, 2024
0
*Samsung TV Plus ने आपल्या मोफत चॅनेल ऑफरिंग्जमध्ये केली वाढ*
सप्टेंबर, २०२४: सॅमसंग टीव्ही प्लस या भारतातील ब्रँडच्या फ्री अॅड-सपोर्टेड स्ट्रीमिंग टीव्ही (फास्ट) सर्विसने आपल्या पोर्टफोलिओवर चार नवीन चॅनेल्स लाँच करण्यासाठी इंडिया टीव्ही ग्रुपसोबत सहयोग केला आहे. या सहयोगाचा भाग म्हणून, इंडिया टीव्ही ग्रुपचे कनेक्टेड टीव्ही (सीटीव्ही) एक्सक्लुसिव्ह चॅनेल्स इंडिया टीव्ही, इंडिया टीव्ही स्पीड न्यूज, इंडिया टीव्ही आप की अदालत आणि इंडिया टीव्ही योगा आता सॅमसंग टीव्ही प्लस प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत. प्रेक्षक आता बातम्या, चालू घडामोडी, फिटनेस आणि मनोरंजन अशा व्यापक उच्च दर्जाच्या कन्टेन्ट ऑफरिंग्जचा आनंद घेऊ शकतात.
सॅमसंग टीव्ही प्लस मोफत स्ट्रीमिंग सर्विस आहे, जी सॅमसंग स्मार्ट टेलिव्हिजन्समध्ये प्री-इन्स्टॉल केलेली आहे, ज्यामुळे निवडक देशांमध्ये बातम्या, क्रीडा, मनोरंजनासह चॅनेल्सची व्यापक श्रेणी मिळते. भारतात, सॅमसंग टीव्ही प्लस प्रेक्षकांना १०० हून अधिक लाइव्ह टीव्ही चॅनेल्स आणि हजारो लाइव्ह व ऑन-डिमांड चित्रपट व टीव्ही मालिकांचा आनंद देते.
“सॅमसंग टीव्ही प्लस प्रेक्षकांसाठी फास्टच्या माध्यमातून उच्च दर्जाचा कन्टेन्टचा आनंद देण्यामध्ये अग्रस्थानी आहे. आम्ही ग्राहकांना रोचक व उपयुक्त कन्टेन्टचा आनंद देण्याप्रती कटिबद्ध आहोत. इंडिया टीव्ही ग्रुपमधून भर करण्यात आलेले चार नवीन चॅनेल्स दर्जात्मक व वैविध्यपूर्ण कन्टेन्ट देण्याच्या आमच्या दृष्टिकोनाला अधिक दृढ करतात,'' असे सॅमसंग टीव्ही प्लस इंडियाचे पार्टनरशीप्सचे प्रमुख कुणाल मेहता म्हणाले.
“सॅमसंग टीव्ही प्लससोबतचा आमचा सहयोग प्रेक्षकांसाठी नवीन व व्यापक मार्ग खुले करतो. प्रेक्षकांना दर्जात्मक, वैविध्यपूर्ण व संपन्न कन्टेन्टचा आनंद देण्याच्या दिशेने उचलण्यात आलेले हे मोठे पाऊल आहे. आम्हाला आशा आहे की, इंडिया टीव्ही आणि सॅमसंग टीव्ही प्लसचा सहयोग ऑनलाइन कन्टेन्ट पाहण्याच्या अनुभवाला नव्या उंचीवर घेऊन जाण्यासोबत सुधारित करेल,'' असे इंडिया टीव्हीचे चीफ स्ट्रॅटेजी ऑफिसर अमित कुमार सिन्हा म्हणाले.