Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

इंडियन ऑइलच्या फ्लॅगशिप ‘XtraPower’ इंधन व ताफा व्यवस्थापन प्रोग्रॅमसाठी प्रीपेड कार्ड प्लॅटफॉर्म व्यवस्थापनाची सुरुवात

AGS Transact Technologies Limited तर्फे इंडियन ऑइलच्या फ्लॅगशिप ‘XtraPower’ इंधन व ताफा व्यवस्थापन प्रोग्रॅमसाठी प्रीपेड कार्ड प्लॅटफॉर्म व्यवस्थापनाची सुरुवात मुंबई, सप्टेंबर 2024, AGS Transact Technologies Limited ने (बीएसई: ५४३४५१आणिएनएसई: AGSTRA)आज ‘XtraPower’ या इंधन व ताफा व्यवस्थापन प्रोग्रॅमसाठी प्रीपेड कार्ड प्लॅटफॉर्मच्या अंमलबजावणीची व प्रारंभाची घोषणा केली. 'XtraPower’ हा इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड या भारतातील सर्वांत मोठ्या सार्वजनिक तेल कंपनीचा (पीएसयू) प्रोग्रॅम आहे. एजीएस ट्रांझॅक्ट ही बँका व कॉर्पोरेट क्लाएंट्सना डिजिटल व रोख रकमेवर आधारित एकात्मिक सर्वमार्गी पेमेंट उत्पादने पुरवणारी भारतातील आघाडीची कंपनी आहे. एजीएस ट्रांझॅक्टला पाच वर्षांच्या कालखंडामध्ये या सेवा पुरवण्यासाठी निश्चित शुल्क प्राप्त होणार आहे. इंडियन ऑइलचा ‘XtraPower’हा कार्यक्रम IOC इंधनाच्या भारतातील २५,०००हून अधिक रिटेल दुकानांनी स्वीकारला आहे आणि याद्वारे वर्षभरात ६०,००० कोटी रुपयांहून अधिक मूल्याच्या इंधन व्यवहारांवर प्रक्रिया केली जाते. आपल्या इंधनावर व ताफा व्यवस्थापनावर संपूर्ण नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता असलेले मोठे लॉजिस्टिक सेवा पुरवठादार, छोटे ताफे चालवणारे व कॉर्पोरेट ग्राहक सर्वांसाठीच लाखो ग्राहकांचा विश्वास प्राप्त करणारा XtraPower हा कार्यक्रम आदर्श पर्याय आहे. हा कार्यक्रम ग्राहकांना आकर्षक लॉयल्टी लाभही देऊ करतो. AGS Transact Technologies Limited चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. रवि बी. गोयल म्हणाले, ''इंडियन ऑइलच्या फ्लॅगशिप XtraPower इंधन व ताफा व्यवस्थापन प्रोग्रॅमसाठी त्यांच्यासोबत भागीदारी करता आली याचा आम्हाला आनंद वाटतो. भारतातील वाहतूक परिसंस्थेचा कायापालट घडवून आणण्यासाठी आम्ही एजीएस ट्रांझॅक्टच्या माध्यमातून समर्पितपणे काम करत आहोत. सर्वसमावेशक प्रीपेड कार्ड प्लॅटफॉर्म व व्यवस्थापन सेवा देऊन देशभरातील ताफा व्यवस्थापन पद्धतींमध्ये आधुनिकीकरणाला चालना देण्याचे ध्येय आमच्यापुढे आहे. व्यवसायांना अधिक कार्यक्षमतेने व सुलभतेने काम करण्याची क्षमता देणारी नवोन्मेष्कारी, सुरक्षित पेमेंट उत्पादने पुरवण्याप्रती आमची बांधिलकी या सहयोगामुळे अधिक दृढ झाली आहे."

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.