झी5 तर्फे अत्याधुनिक कॉमन मिडिया अॅप्लिकेशन फॉरमॅट अंमलबजावणी
October 04, 2024
0
झी5 तर्फे अत्याधुनिक कॉमन मिडिया अॅप्लिकेशन फॉरमॅट अंमलबजावणी
आशय वितरण सुरळीत आणि दृश्यमानता गुणवत्ता सुधारण्यासाठी ‘सिएमएएफ’ चा वापर
मुंबई, ४ ऑक्टोबर २०२४: भारतातील सर्वात मोठा स्वदेशी व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म झी5 ने व्यापक प्रमाणात आशय वितरण परिवर्तन आणि प्रेक्षकांचा अनुभव वाढवण्यासाठी कॉमन मीडिया अप्लिकेशन फॉरमॅट (CMAF) यशस्वीरित्या अंगिकारला आहे. कंपनीच्या बंगळुरूस्थित टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन सेंटरद्वारे लागू करण्यात आलेल्या या नवकल्पनात्मक उपायामुळे विविध उपकरणांवर व्हिडिओ प्लेबॅक अधिक सुरळीत होतो आणि कमी इंटरनेट बँडविड्थ असलेल्या भागातही झी5 वापरकर्त्यांना चांगल्या ऑडिओ व्हिज्युअल (AV) गुणवत्तेचा अनुभव मिळतो.
अधिकाधिक दर्शकांना उच्च-गुणवत्तेच्या स्ट्रीमिंगचा लाभ मिळेल हे सुनिश्चित करत जास्तीत जास्त बँडविड्थ वापर आणि ऑपरेशनल खर्च कमी करून झी5 100 दशलक्ष वापर कर्त्यां पर्यंत पोहोचत आहे. विनाअडथळा क्रॉस डिव्हाईस कम्पेटिबिलिटी सक्षम करत सेगमेंट मीडिया पॅकेजिंगसाठी सिएमएएफ हा एक बहुमुखी आणि विस्तृत मापदंड डिझाइन केला आहे. सिएमएएफ स्वीकारल्याने झी5 केवळ विनाअडथळा दृश्य अनुभव सुनिश्चित करत नाही तर कमी विलंब देखील साध्य करतो. खेळ, बातम्या आणि इव्हेंट्सच्या लाइव्ह स्ट्रीमिंगमध्ये तो एक महत्त्वपूर्ण घटक आहे.
शिवा चिन्नासामी, चीफ टेक्नॉलॉजी-प्रॉडक्ट ऑफिसर, झी म्हणाले,“आमचे धोरणात्मक उद्दिष्ट कमी इंटरनेट असलेल्या भागांमध्ये देखील सर्वोत्तम ऑडिओ व्हिजीयुल (AV) अनुभव पुरविण्यावर आहे. बँडविड्थ कितीही असली तरी प्रत्येक प्रेक्षकापर्यंत उच्च-गुणवत्तेचा अनुभव पोहोचविणे सुनिश्चित करत कोणताही डेटा वाया न घालवता सिएमएएफ आम्हाला आशय अधिक कार्यक्षमतेने वितरित करण्यास अनुमती देते. झी5 मजबूत सेवा आणि आपल्या ग्राहकांना अनुभव प्रदान करण्यासाठी इन-हाउस क्षमता निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे आणि हे साध्य करण्यासाठी सिएमएएफ अंगीकार हे महत्त्वाचे पाऊल आहे.”
मनीष कालरा, चीफ बिझनेस ऑफिसर, झी5 इंडिया म्हणाले,“झी5 मध्ये आम्ही अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दर्शकांचा अनुभव सुधारण्यासाठी लक्ष केंद्रित करत आहोत. कॉमन मीडिया अप्लिकेशन फॉरमॅट (CMAF) स्वीकारणे हे झी5 च्या दर्जेदार मनोरंजनाचे सार्वत्रिकीकरण करण्याच्या दृष्टिकोनाचे पुढचे पाऊल आहे. कमी इंटरनेट कनेक्टिव्हिटी असलेल्या भागांमध्ये देखील, आमचे वापरकर्ते विनाअडथळा कार्यक्रम पाहण्याचा अनुभव घेऊ शकतात हे सुनिश्चित होते. ही धोरणात्मक पायरी म्हणजे व्यापक प्रेक्षकांसाठी दर्जेदार आशय सादर करण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे प्रतिबिंब असून एकाच वेळी अनेक उपकरणांवर मनोरंजन वितरित करण्याच्या आमच्या उद्दिष्टाशीही सुसंगत आहे. सिएमएएफ हे आमच्या प्लॅटफॉर्मवर दर्शक कशा प्रकारे आशयाचा आनंद घेतात यात आणखी सुधारणा करण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल दर्शवते."