*हेंकेल इंडियाकडून ठाणे येथील शाळेमध्ये अॅस्ट्रॉनॉमी लॅबची स्थापना*
October 13, 2024
0
*हेंकेल इंडियाकडून ठाणे येथील शाळेमध्ये अॅस्ट्रॉनॉमी लॅबची स्थापना*
मुंबई - हेंकेल अॅधेसिव्ह्ज टेक्नॉलॉजीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (हेंकेल इंडिया) ने ग्लोबल मिशन अॅस्ट्रॉनॉमी, इंडियासोबत सहयोगाने आदर्श इंग्लिश स्कूल, ठाणे येथे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम स्पेस ऑब्जर्वेशन सेंटर नावाची खगोलशास्त्र प्रयोगशाळा व वेधशाळेची स्थापना केली आहे. हेंकेल इंडियाच्या आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी सीएसआर योजनेअंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या या खगोलशास्त्र प्रयोगशाळा व वेधशाळेचे आर्ममेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टाब्लिशमेंट (एआरडीई)चे माजी उपसंचालक डॉ. काशीनाथ देवधर, हेंकेल इंडियाचे सीएफओ कृष्णा प्रसाद, सरस्वती विद्या प्रसारक ट्रस्टच्या अध्यक्ष मीरा कोरडे, आदर्श विकास मंडळचे अध्यक्ष सचिन बी. मोरे आणि एव्हीएम आदर्श इंग्लिश स्कूलच्या व्यवस्थापकीय विश्वस्त श्रद्धा एस. मोरे यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटन प्रसंगी हेंकेल इंडियाच्या सीएसआर टीमचे सदस्य रमित महाजन, भुपेश सिंग, डॉ. प्रसाद खंडागळे, संध्या केडलया आणि कुंजल पारेख हे देखील उपस्थित होते.
उपस्थितांना मार्गदर्शन करताना एआरडीईचे माजी उपसंचालक डॉ. काशिनाथ देवधर म्हणाले, ''भारतीय अंतराळ उपक्रमाचे जनक डॉ. विक्रम साराभाई यांचा असा विश्वास होता की भारतातील अंतराळ संशोधन उपक्रम संवाद, हवामानाचा अंदाज आणि शिक्षण यांसारख्या व्यावहारिक उपयोजनांसाठी राबवला गेला पाहिजे. ज्यामुळे आपल्या राष्ट्राचा आणि देशवासीयांचा विकास होईल.'' ते पुढे म्हणाले, ''हेंकेल इंडियाचा खगोलशास्त्र प्रयोगशाळा व वेधशाळा सीएसआर उपक्रम डॉ. साराभाई यांच्या स्वप्नाला अधिक पुढे घेऊन जाईल.''
याप्रसंगी मत व्यक्त करत हेंकेल इंडियाचे सीएफओ कृष्णा प्रसाद म्हणाले, “हेंकेल इंडियाचा खगोलशास्त्र अंतराळाबाबत रूची निर्माण करेल. ज्यामुळे भारतातील भावी शास्त्रज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञांसाठी प्रबळ पाया रचला जाईल.''
हेंकेलने पुणे जिल्ह्यातील अकरा ठिकाणी आणि नवी मुंबईतील एका ठिकाणी खगोलशास्त्र वेधशाळा व प्रयोगशाळा स्थापित केल्या आहेत. आदर्श इंग्लिश स्कूल, ठाणे मधील डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम स्पेस ऑब्जर्वेशन सेंटर अशाप्रकारची तेरावी प्रयोगशाळा आहे. या खगोलशास्त्र प्रयोगशाळा व वेधशाळा विद्यार्थ्यांना लघुग्रह शोध, ग्रहांचा शोध यामध्ये सहभाग घेण्याची संधी देतात आणि त्यांच्यामध्ये अंतराळाबाबत कुतूहलता निर्माण करतात, तसेच त्यांना अंतराळापलीकडील विश्वाबाबत प्रश्न विचारण्यास प्रेरित करतात. या प्रयोगशाळांमधून दहा हजार विद्यार्थ्यांना अंतराळ संशोधन करण्यास सक्षम करण्याचा मनसुबा आहे.
हेंकेल इंडियाचे कंट्री प्रेसिडण्ट एस. सुनिल कुमार म्हणाले, “आमचा उद्देश ‘पायोनिअर्स अॅट हार्ट फॉर द गुड ऑफ जनरेशन्स'शी बांधील राहत हेंकेल इंडियामध्ये आम्ही आमच्या सीएसआर उपक्रमांच्या माध्यमातून समाजाला भविष्यासाठी सुसज्ज करण्याचा प्रयत्न करतो. समान व सर्वसमावेशक दर्जेदार शिक्षण देण्याच्या मनसुब्यासह आम्हाला या सीएसआर हस्तक्षेपाच्या माध्यमातून सरकारी शाळेमधील विद्यार्थ्यांना खगोलशास्त्र व अंतराळाचे ज्ञान देण्याचा आनंद होत आहे. आम्ही आशा करतो की, यामुळे काही विद्यार्थ्यांना भविष्यात या क्षेत्रात करिअर घडवण्यास स्फूर्ती मिळेल.''
आम्ही या सीएसआर उपक्रमांतर्गत ‘ट्रेन द ट्रेनर' प्रोग्रामच्या माध्यमातून महाराष्ट्रातील ४५० हून अधिक शिक्षकांना प्रशिक्षित केले आहे. आमच्या खगोलशास्त्र वेधशाळा व प्रयोगशाळांच्या मदतीने विद्यार्थी ग्रहण आणि ग्रह, तारे, लघुग्रह यांचे निरीक्षण अशा विविध क्रियाकलापांमध्ये सहभाग घेऊ शकतील. या सीएसआर उपक्रमाच्या माध्यमातून हेंकेलने १३ सप्टेंबर २०२४ रोजी नासाचा (NASA) 'इंटरनॅशनल ऑब्जर्व्ह द मून' उपक्रम राबवला. तसेच, आदल्या दिवशी या विद्यार्थ्यांना प्रतिष्ठित अंतराळ वैज्ञानिकांकडून ऑनलाइन व्याख्यान सत्रामध्ये मार्गदर्शन देखील मिळाले.