Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

स्विगी आणि सिंघम अगेनच्या टीमने वडापावची सगळ्यात मोठी ऑर्डर डिलिव्हर करून प्रस्थापित केला जागतिक विक्रम.

विशेष बातमी -- दिलीप रामचंद्र यादव यांजकडून
स्विगी आणि सिंघम अगेनच्या टीमने वडापावची सगळ्यात मोठी ऑर्डर डिलिव्हर करून प्रस्थापित केला जागतिक विक्रम. स्विगीने रॉबिन हूड आर्मीचे साहाय्य असलेल्या शाळेला ११००० वडापाव पोहोचवण्याचा नवा विक्रम केला आहे. सिंघम अगेनचा अभिनेता अजय देवगण आणि दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या एकत्रित प्रयत्नातून हा उपक्रम करण्यात आला. ही ऑर्डर स्विगीच्या नव्याने लॉन्च झालेल्या एक्सएल इव्ही च्या माध्यमातून डिलिव्हर करण्यात आली. मोठ्या ऑर्डरसाठी या गाडीचा वापर करण्यात येणार आहे.
मुंबई १८ ऑक्टोबर २०२४- स्विगी आणि बहुप्रतिक्षित चित्रपट सिंघम अगेनने एका डिलिव्हरीत वडापावची सगळ्यात मोठी ऑर्डर ग्राहकांपर्यंत पोहोचवून गिनीज बुकमध्ये एका जागतिक विक्रमाची नोंद केली आहे. सिंघम अगेनची टीम अजय देवगण आणि रोहित शेट्टी यांच्या एकत्रित प्रयत्नातून हा विक्रम प्रस्थापित करण्यात आला. स्विगीने रॉबिन हूड आर्मी या एनजीओतील मुलांसाठी वडापावची डिलिव्हरी केली. ही संस्था अतिरिक्त अन्न मुंबईच्या विविध भागात वितरित करण्याचं आणि भूक भागवण्याचं काम करते. एमएम मिठाईवाला या मुंबईच्या आयकॉनिक दुकानातले वडापाव स्विगीच्या नव्याने लॉन्च झालेल्या XL गाडीने डिलिव्हर करण्यात आले. मोठ्या प्रमाणात असलेल्या डिलिव्हरीसाठी हे वाहन वापरलं जाणार आहे. टिपिकल सिंघम स्टाईलमध्येय स्विगीने सिंघम अगेनच्या टीमशी भागीदारी केली आणि रॉबिन हूड या एनजीओचं साहाय्य लाभत असलेल्या विविध शाळांना ११००० वडापावचे वाटप केलं. या ऑर्डरचा पहिला स्टॉप विलेपार्ल्यातील एअरपोर्ट हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज होता. तिथे अजय देवगण, रोहित शेट्टी आणि स्विगीचे सह संस्थापक फणी किशन यांनी ऑर्डर स्वीकारली आणि एकाच ऑर्डरमध्ये सर्वांत जास्त संख्येने वडापाव डिलिव्हर करण्याचा जागतिक विक्रम रचला गेला. या वडापावचे रॉबिन हूड आर्मीचे साहाय्य असलेल्या वांद्रे, जुहू, अंधेरी (पूर्व) (चांदिवली आणि चकाला), मालाड आणि बोरिवली येथील शाळांमध्ये वाटप करण्यात आले. स्विगीचे सह संस्थापक आणि चीफ ग्रोथ ऑफिसर फणी किशन म्हणाले, “गेल्या १० वर्षांपूर्वी स्विगीची स्थापना झाल्यापासून आम्ही मुंबई आणि इतर शहरांमध्ये लाखो वडापाव डिलिव्हर केले आहेत. आम्ही आता XL चा वापर करून, आणि सिंघम अगेनच्या टीमबरोबर भागीदारी करून वडापावची सगळ्यात मोठी ऑर्डर डिलिव्हर करण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करत आहोत. यामुळे कोणताही पदार्थ मग तो छोटा असो की मोठा, तो डिलिव्हर करण्याबद्दलची तसंच मुंबईच्या आयकॉनिक स्ट्रीट फूड असलेल्या वडापावचा आनंद सिंघम स्टाईलने घेण्याबद्दलची कटिबद्धता दिसून येते.” स्विगी XL या इलेक्ट्रिक गाड्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणातील ऑर्डर डिलिव्हर केल्या जाणार आहेत. हा जागतिक विक्रम करण्यासाठीसुद्धा या गाड्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तंत्रत्रान आणि नावीन्यपूर्ण कल्पना यांचा वापर करून डिलिव्हरीच्या वेगवेगळ्या गरजा लक्षात घेऊन समाजासाठी महत्त्वाचं काहीतरी करणं हे स्विगीचं उद्दिष्ट या अनोख्या उपक्रमातून दिसून येतं. या विक्रमाबद्दल दिग्दर्शक रोहित शेट्टीनेही प्रतिक्रिया व्यक्त केली. तो म्हणाला, “स्विगीबरोबर वडापावच्या डिलिव्हरीसाठी भागीदारी करताना आणि त्याद्वारे मुलांच्या चेहऱ्यावर आनंद पाहताना आम्हालाही अतिशय आनंद झाला आहे. सिंघमसारख्या भव्यदिव्य आणि तत्त्वननिष्ठ व्यक्तिमत्त्वाप्रमाणे या उपक्रमाने सुद्धा अर्थपूर्ण काम केलं आहे.” मुलांनी या वडापावचा आनंद घेतला आणि स्विगी आणि सिंघम अगेन टीमचा उपक्रम यशस्वी झाल्याची पावती दिली. ही विक्रमी डिलिव्हरी स्विगीने नवीन लॉन्च केलेल्या केलेल्या XL या इलेक्ट्रिक गाड्यांमुळे शक्य झाली. ओमेगा सिकी मोबिलिटी (OSM) या कंपनीतर्फे गाड्यांचं उत्पादन केले जात असून मुव्हइंग अर्बन टेक्नॉलॉजी लिमिटेड तर्फे या गाड्या चालवल्या जातात.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.