Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

विजय सेल्सद्वारे फेस्टिव्ह सेलिब्रेशन सेलची सुरुवात

विजय सेल्सद्वारे फेस्टिव्ह सेलिब्रेशन सेलची सुरुवात ~ टेक उत्पादनांवर ७०% पर्यंत सवलत ~ मुंबई, १८ ऑक्टोबर २०२४: सणासुदीचा मोसम सुरू झाला आहे आणि विजय सेल्स ही भारतातील आघाडीची इलेक्ट्रॉनिक ओम्नी-चॅनल रिटेल चेन आपल्या ग्राहकांसाठी घेऊन आली आहे आपली जीवनशैली उंचावण्याची आणि फेस्टिव्ह सेलिब्रेशन सेलचा लाभ घेऊन जास्तत जास्त बचत करण्याची संधी! या सेलमध्ये ग्राहकांना नानाविध इलेक्ट्रॉनिक्स आणि उपकरणांवर तब्बल ७०% पर्यंत सवलतीसह त्यांचा टेक शॉपिंग अनुभव अविस्मरणीय करण्याची हमी आहे. विजय सेल्सचे संचालक श्री. निलेश गुप्ता म्हणाले, “आमच्या फेस्टिव्ह सेलिब्रेशन सेलचे उद्घाटन करताना आम्हाला आनंद होत आहे. या सेलमध्ये कधीच न अपेक्षिलेल्या किंमतीत लेटेस्ट टेक्नॉलॉजी ऑफर करण्यात येत आहे. तुम्हाला तुमचा फोन अपग्रेड करायचा असो किंवा घरातील मनोरंजन वाढवायचे असो किंवा तुम्ही श्रेष्ठ कम्प्यूटिंग उपकरणाच्या शोधात असलात तरी आमच्याकडे प्रत्येकासाठी काही ना काही आहेच. आमच्या ग्राहकांसाठी नवीन कल्पक उपकरणांचा शोध घेऊन आपली जीवनशैली उंचावण्याची ही एक नामी संधी आहे.”
अॅपल इकोसिस्टम: बेजोड किंमतीत प्रीमियम उत्पादने: विविध उत्पादनांवर बेजोड डील्ससह अॅपलचा सर्वश्रेष्ठ अनुभव मिळवा. आयफोन १४आणि आयफोन १५ वरील अद्भुत सवलती व्यतिरिक्त नवी आयफोन सिरिज देखील ७४,९०० रुपयांपासून उपलब्ध आहे, ज्यात इन्स्टंट बँक कॅश बॅकचा समावेश आहे तसेच इन्स्टंट बँक कॅश बॅकच्या फायद्यासह अॅपल घड्याळे २२,९०० रुपयांपासून उपलब्ध आहेत. मॅकबुकच्या चाहत्यांना ७२,५९० रु. पासून उत्तम ऑफर्स मिळू शकतात. अगदी अलीकडच्या एअरपॉड्स ४ सह आपला ऑडिओ अनुभव वाढवा, ज्याची किंमत इन्स्टंट बँक कॅश बॅकच्या लाभासह ११,९०० रुपयांपासून सुरू होत आहे. आयपॅड प्रेमी २५,९९० रु. पासून पर्याय मिळवू शकतात. यात देखील बँक कॅश बॅकचा लाभ आहेच. ८९९ रु. पासून सुरू होत असलेल्या अॅक्सेसरीजसह तुमची अॅपल इकोसिस्टम परिपूर्ण करण्याची ही संधी आहे. नेत्रसुखद स्मार्टफोन्स: खिशाला परवडणाऱ्या मॉडेल्सपासून ते फ्लॅगशिप मॉडेल्सपर्यंत स्मार्टफोन्सवरील अविश्वसनीय डील्ससह तुमचा मोबाइलचा अनुभव अपग्रेड करा. परवडण्याजोगे पर्याय शोधत असणाऱ्यांसाठी स्मार्टफोन्स अगदी ७,९९९ रु. पासून उपलब्ध आहेत. टेक-चाहत्यांना उत्तम ५जी स्मार्टफोन्स १०,९९९ रु पासून मिळू शकतात. अगदी अलीकडे जे स्मार्टफोन लॉन्च झाले आहेत, त्यांच्या किंमती ७,९९९ रु. पासून सुरू आहेत, तर प्रीमियम स्मार्टफोन इन्स्टंट बँक कॅश बॅकसह ३१,९९९ रु. पासून आहेत. वनप्लस नॉर्ड ५जी स्मार्टफोन आवर्जून बघा, जो बँक कॅशबॅक लाभासह फक्त ३१,९९९ रुपयांत उपलब्ध आहे. कम्प्युटिंगची ताकद: प्रत्येक गरजेसाठी लॅपटॉप आणि टॅब्लेट: लॅपटॉप आणि टॅब्लेट्सवर अद्भुत डील्स मिळवून तुमचे कम्प्युटिंग आणि मनोरंजन वाढवा. लॅपटॉप्सची सुरुवात १९,९९० रु. पासून होत आहे आणि त्यातील काही निवडक मॉडेल्सवर ४०% पर्यंत सूट आहे. गेमिंगचे चाहते गेमिंग गॅजेट्स आणि अॅक्सेसरीजवर ५०% पर्यंत सवलत मिळवू शकतात. टॅब्लेट वापरणाऱ्यांना अनेक उपकरणांवर ४०% पर्यंत सवलतीचा लाभ मिळू शकतो. होम एन्टरटेन्मेंट रिफ्रेश: टीव्ही आणि ऑडिओ सिस्टम्स टीव्ही आणि ऑडिओ उपकरणांवर अविश्वसनीय डील्ससह तुमच्या लिव्हिंग रूमचा चेहरा-मोहरा बदलून टाका. ब्लॉकबस्टर टीव्ही डील्स ८,५०० रु. पासून सुरू होत आहेत, तर क्यूएलईडी टीव्ही फक्त १४,९९० रु. पासून सुरू होत आहेत. बोट अवंटे बार थीम ८,९९९ रु. मध्ये मिळवा. स्पीकर्स ३०% सवलतीच्या दरात मिळत आहेत. आणि होम ऑडिओ सिस्टम १,२९९ रु. पासून सुरू होत आहेत. पार्टी स्पीकर्सवर ५०% पर्यंत सूट आहे. वेअरेबल टेक आणि अॅक्सेसरीज: कनेक्टेड रहा, स्टाइलमध्ये: आमच्या वेअरेबल्स आणि अॅक्सेसरीजच्या रेंजसह स्टाइलमध्ये कनेक्टेड रहा. फायरबोल्ट ४जी व्हीओएलटीई स्मार्टवॉच फक्त १,९९९ रुपयात उपलब्ध आहे आणि इतर स्मार्ट वॉचेस ९९९ रु. पासून सुरू होत आहेत. १,७९९ रुपयांत नोथान्ग इयर बड्सच्या सीएमएफसह तुमचा ऑडिओ अनुभव वाढवा. विविध स्मार्टफोन अॅक्सेसरीज आणि ऑडिओ उत्पादने १४९ रु. पासून सुरू होत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.