Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

इझमायट्रिपने ‘ट्रॅव्‍हल उत्‍सव सेल’ची घोषणा केली

इझमायट्रिपने ‘ट्रॅव्‍हल उत्‍सव सेल’ची घोषणा केली ~ फ्लाइट्स, हॉटेल्‍स बुकिंगवर सवलत ~ मुंबई, १६ ऑक्टोबर २०२४: इझमायट्रिप डॉटकॉम या भारतातील सर्वात मोठ्या ऑनलाइन ट्रॅव्‍हल टेक प्‍लॅटफॉर्मने आपली भव्‍य फेस्टिव्‍ह सीझन ऑफर 'ट्रॅव्‍हल उत्‍सव सेल'च्‍या शुभारंभाची घोषणा केली आहे. हा लिमिटेड-पीरियड सेल २२ ऑक्‍टोबर २०२४ पर्यंत इझमायट्रिपच्‍या अधिकृत वेबसाइटवर सुरु राहिल. लक्षवेधक डील्‍समध्‍ये आंतरराष्‍ट्रीय व देशांतर्गत फ्लाइट्स, हॉटेल्‍स, बसेस्, कॅब्‍स आणि हॉलिडे पॅकेजेसवरील व्‍यापक सूटचा समावेश आहे. ट्रॅव्‍हल उत्‍सव सेलदरम्‍यान ग्राहक फ्लाइट्सवर जवळपास ३४ टक्‍के, हॉटेल्‍सवर जवळपास ६५ टक्‍के, बस बुकिंग्‍जवर १५ टक्‍के आणि कॅब रेण्‍टल्‍सवर १२ टक्‍के सूटचा आनंद घेऊ शकतात. परिपूर्ण गेटवेचा आनंद घेऊ पाहणाऱ्यांसाठी हॉलिडे पॅकेजेस् ६,९९९ रूपये इतक्‍या कमी किमतीपासून सुरू होतात. या बचतींना अनलॉक करण्‍यासाठी ग्राहक इझमायट्रिप अॅप किंवा वेबसाइटवर संबंधित बँकांचे प्रोमोकोड वापरत बुकिंग करू शकतात.
इझमायट्रिपने या सेलसाठी आघाडीच्‍या बँकांसोबत सहयोग केला आहे, जेथे आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्ड, बँक ऑफ बडोदा डेबि‍ट कार्ड, अमेरिकन एक्‍स्‍प्रेस क्रेडिट कार्ड, बॉबकार्ड क्रेडिट कार्ड, एचएसबीसी बँक क्रेडिट कार्ड व क्रेडिट कार्ड ईएमआय, आरबीएल बँक क्रेडिट कार्ड व नो कॉस्‍ट ईएमआय आणि एयू बँक क्रेडिट कार्डचा वापर करणाऱ्या ग्राहकांना अतिरिक्‍त सूट मिळेल. इझमायट्रिपचे सह-संस्‍थापक श्री. रिकांत पिट्टी म्‍हणाले, ''सणासुदीचा काळ जवळ येत असताना इझमायट्रिपमध्‍ये आम्‍हाला आमचा ट्रॅव्‍हल उत्‍सव सेल सादर करण्‍याचा आनंद होत आहे. हा सेल प्रवाशांना आमचे गिफ्ट आहे, ज्‍यामुळे त्‍यांना अद्वितीय किमतींमध्‍ये नवीन साहसी प्रवासाचा आनंद घेण्‍यासोबत प्रियजनांसोबत संस्‍मरणीय आठवणींचा संग्रह करता येईल. आम्‍ही सर्व प्रवास श्रेणींमध्‍ये ऑफर्सची व्‍यापक श्रेणी डिझाइन केली आहे, ज्‍यामुळे सर्व प्रकारच्‍या प्रवाशांना यंदा सणासुदीच्‍या काळाला साजरे करण्‍यासाठी परिपूर्ण डिल मिळेल.'' ट्रॅव्हल उत्‍सव सेल फक्‍त सूट देत नाही तर आकर्षक रिवॉर्डस जिंकण्‍याची संधी देखील देतो. सेल कालावधीदरम्‍यान सर्वाधिक खर्च करणाऱ्या ग्राहकांना कार्स२४ कडून जवळपास ५ लाख रूपयांची प्री-ओन्‍ड कार जिंकण्‍याची संधी मिळेल. तसेच, काही सर्वाधिक खर्च करणाऱ्या ग्राहकांना ५,००० रूपयांचे विशेष पुमा वाऊचर्स मिळतील, तर इतर सर्वाधिक खर्च करणाऱ्या ग्राहकांना नाशेर माइल्‍सकडून स्‍टायलिश बॅकपॅक मिळेल. इझमायट्रिपने या सेलसाठी विविध प्रतिष्ठित एअरलाइन सहयोगींसोबत सहयोग केला आहे, जसे एअर अस्‍ताना, एअर फ्रान्‍स, केएलएम रॉयल डच एअरलाइन्‍स, एअर इंडिया एक्‍स्‍प्रेस, एअर मॉरिशस, आकासा एअर, ब्रिटीश एअरवेज, कंबोडिया अंगकोर एअर, इजिप्‍त एअर, गल्‍फ एअर, आयटीए एअरवेज, केनिया एअरवेज, लुफ्थान्‍सा, मलेशियन एअरलाइन्‍स, कतार एअरवेज, सिंगापूर एअरलाइन्‍स, स्‍पाइसजेट, तुर्किश एअरलाइन्स, युनायटेड एअरलाइन्‍स, व्हिएतनाम एअरलाइन्‍स, व्‍हर्जिन अॅटलांटिक, विस्‍तारा आणि एअर इंडिया. या विशेष सेलसाठी निवडक हॉटेल सहयोगींमध्‍ये प्रतिष्ठित हॉटेल्‍सचा समावेश आहे, जसे सयाजी, ट्रीहाऊस, क्‍लार्क्‍स कलेक्‍शन, लॉर्डस्, सुबा ग्रुप, झोन बाय द पार्क, ब्‍लूम, प्राइड, स्‍प्री, वेलकमहेरिटेज, अमृतारा, व्हिट्स, फर्न, स्‍टर्लिंग, मूस्‍ताच हॉटेल्‍स, फतेह कलेक्‍शन, वेस्‍टा हॉटेल्‍स अँड रिसॉर्टस्, ट्री ऑफ लाइफ, नीमराणा हॉटेल्‍स, ओयो, फॅब हॉटेल्‍स, स्‍टारलिट, वन अर्थ, द क्‍लार्क्‍स, ओटीएचपीएल, ली रॉय, बाइके, रिनेसट, श्रीगो आणि ट्रीबो. या सेलमध्‍ये सहभाग घेण्‍यासाठी ग्राहकांनी २२ ऑक्‍टोबर २०२४ पर्यंत त्‍यांच्‍या ट्रॅव्‍हल सेवा बुक करण्‍याची गरज आहे. प्रत्‍येक व्‍यवहारानंतर ग्राहकांना ईमेल मिळेल, ज्‍यामध्‍ये पुमा, आर्चीज, झेप्‍टो, लॅक्‍मे आणि नाशेर माइल्‍स अशा लोकप्रिय ब्रँड्सच्‍या अनेक गिफ्ट वाऊचर्सचा समावेश असेल, जे सहजपणे रीडिम करता येऊ शकतात.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.