Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*एचडीएफसी लाइफकडून ११.० टक्‍के मार्केट शेअरची नोंद*

*एचडीएफसी लाइफकडून ११.० टक्‍के मार्केट शेअरची नोंद* • नवीन व्‍यवसायाच्‍या मूल्‍यामध्‍ये १७.४ टक्‍क्‍यांची वाढ • नवीन बिझनेस प्रीमियम (वैयक्तिक एपीई) मध्‍ये प्रबळ ३१ टक्‍क्‍यांची वाढ मुंबई, १६ ऑक्‍टोबर २०२४ - एचडीएफसी लाइफच्‍या संचालक मंडळाने ३० सप्‍टेंबर २०२४ रोजी समाप्‍त झालेल्‍या सहामाहीसाठी स्‍वतंत्र व एकत्रित आर्थिक निकाल मंजूर करून स्‍वीकारले आहेत. कंपनीने सर्व महत्त्वपूर्ण बाबींमध्‍ये मोठी वाढ केली असून सकारात्‍मक गती राखली आहे. कामगिरीची ठळक वैशिष्‍ट्ये:  उच्‍च-स्‍तरीय वाढ: नवीन बिझनेस प्रीमियम (वैयक्तिक एपीई) मध्‍ये प्रबळ ३१ टक्‍के वाढीची नोंद केली, ज्‍याला विक्री करण्‍यात आलेल्‍या पॉलिसी आणि संतुलित उत्‍पादन संयोजनामध्‍ये २२ टक्‍के वाढीचे पाठबळ मिळाले.  मार्केट शेअर: खाजगी क्षेत्र मार्केट शेअर (वैयक्तिक डब्‍ल्‍यूआरपी) ६० बीपीएसने वाढून १६.३ टक्‍क्‍यांपर्यंत पोहोचले. एकूण मार्केट शेअर सर्वोच्‍च ११ टक्‍क्‍यांपर्यंत पोहोचला.  नवीन व्‍यवसायाचे मूल्‍य (व्‍हीएनबी) १७.४ टक्‍क्‍यांनी वाढून १,६५६ कोटी रूपयांपर्यंत पोहोचले, ज्‍यामधून लाभदायी व्‍यवसायावरील फोकस दिसून येतो.  अॅसेट्स अंडर मॅनेजमेंट (एयूएम): एयूएम ३० सप्‍टेंबर २०२४ रोजी ३.२५ लाख कोटी रूपये राहिले, ज्‍यामध्‍ये आर्थिक वर्ष २५ च्‍या पहिल्‍या सहामाहीत २३ टक्‍क्‍यांची वाढ झाली.  सातत्‍यता: १३व्‍या व ६१व्‍या महिन्‍याचे सातत्‍यता प्रमाण अनुक्रमे ८८ टक्‍के आणि ६० टक्‍क्‍यांपर्यंत सुधारले, ज्‍यामुळे मागील वर्षाच्‍या तुलनेत मटेरिअलमध्‍ये अनुक्रमे १२० बेसिस पॉइण्‍ट्स व ७३० बेसिस पॉइण्‍ट्सची वाढ झाली. यामधून कंपनीची ग्राहकांसोबत संलग्‍न होण्‍यासोबत त्‍यांना कायम ठेवण्‍याची क्षमता दिसून आली.  एम्‍बेडेड व्‍हॅल्‍यू (ईव्‍ही) ने तिमाहीदरम्‍यान ५०,००० कोटी रूपयांचा टप्‍पा पार करण्‍यासोबत ईव्‍हीवरील कार्यरत परताव्‍यामध्‍ये १६.० टक्‍क्‍यांची नोंद केली, यामधून पॉलिसीधारक आणि शेअरधारकांसाठी स्थिर दीर्घकालीन मूल्‍य नि‍र्मिती दिसून आली.  आर्थिक वर्ष २५ च्‍या पहिल्‍या सहामाहीत ९११ कोटी रूपयांचा करोत्तर नफा (पीएटी) संपादित करण्‍यात आला, ज्‍यामध्‍ये वार्षिक १५ टक्‍के वाढीची नोंद करण्‍यात आली.  सॉल्वन्सी रेशिओ १८१ टक्‍के राहिला, जो नियामक थ्रेशोल्‍ड १५० टक्‍क्‍यांपेक्षा जास्‍त होता. ९ ऑक्‍टोबर २०२४ रोजी १,००० कोटी रूपयांच्‍या अधीनस्‍थ कर्ज वाढीनंतर सॉल्वन्सी १९२ टक्‍के राहिले.  एचडीएफसी पेंशन फंड मॅनेजमेंट एचडीएफसी लाइफची पूर्णत: मालकीची उपकंपनी आणि भारतातील सर्वात मोठी खाजगी पेंशन फंड मॅनेजर आहे. या कपंनीने आर्थिक वर्ष २५ च्‍या पहिल्‍या सहामाहीत असेट्स अंडर मॅनेजमेंटमध्‍ये १ लाख कोटी रूपयांचा टप्‍पा गाठत मोठी उपलब्‍धी संपादित केली.  कर्मचाऱ्यांवर फोकस: आम्‍हाला आमच्‍या सर्वसमावेशकता व कर्मचारी-केंद्रित धोरणांसाठी सन्‍मानित करण्‍यात आले, जेथे बीएफएसआय क्षेत्रामध्‍ये बेस्‍ट कंपनीज फॉर विमेन इन इंडिया आणि अवतार अँड सेरामाऊंट यांच्‍याद्वारे एक्‍झेम्‍प्‍लर ऑफ इन्‍क्‍लुजन (मोस्‍ट इन्‍क्‍लुसिव्‍ह कंपनीज इंडिया २०२४) या पुरस्‍कारांसह गौरविण्‍यात आले.  मुख्‍य कार्यकारी अधिकारी यांचे विधान: एचडीएफसी लाइफच्‍या व्‍यवस्‍थापकीय संचालक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी विभा पडळकर म्‍हणाल्‍या, ''खाजगी क्षेत्र आणि एकूण उद्योगाने दुसऱ्या तिमाहीमधील प्रबळ वाढ कायम ठेवली, तसेच आर्थिक वर्ष २५ च्‍या पहिल्‍या सहामाहीत वैयक्तिक भारित प्राप्‍त प्रीमियम बेसिसमध्‍ये अनुक्रमे २४ टक्‍के आणि २१ टक्‍के वाढीची नोंद केली. आम्‍ही याच कालावधीदरम्‍यान २८ टक्‍क्‍यांची आणि २ वर्ष सीएजीआर बेसिसवर १९ टक्‍क्‍यांची वाढ करत खाजगी क्षेत्राला मागे टाकले आहे. आम्‍ही पॉलिसींच्‍या संख्‍येमध्‍ये २२ टक्‍के वाढीची नोंद केली, जी खाजगी क्षेत्रामधील १३ टक्‍के वाढीच्‍या तुलनेत जास्‍त होती. आम्‍हाला प्रथम, द्वितीय व तृतीय श्रेणीच्‍या भौगोलिक क्षेत्रांमध्‍ये स्थिर वाढ दिसण्‍यात आली. नियामकसंदर्भात, आम्‍ही १ ऑक्‍टोबर २०२४ रोजीच्‍या सुधारित नियमनांचे पालन करत ४० हून अधिक टॉप उत्‍पादने यशस्‍वीरित्‍या रिलाँच केली आहेत, ज्‍यांनी व्‍यवसायामध्‍ये जवळपास ९५ टक्‍क्‍यांचे योगदान दिले आहे. तसेच आम्‍ही तिमाहीदरम्‍यान इतर उत्‍पादने देखील रिलाँच करणार आहोत. नवीन उत्‍पादन नियमनांशी संलग्‍न होण्‍याकरिता तीन महिन्‍यांचा अतिरिक्‍त कालावधी देण्‍यासाठी आम्‍ही नियामकांचे आभार व्‍यक्‍त करतो. तसेच, आम्‍हाला सांगताना आनंद होत आहे की एचडीएफसी लाइफला शाश्‍वतता व जबाबदार शासनाप्रती कटिबद्धतेसाठी सन्‍मानित केले जात आहे. एचडीएफसी लाइफच्‍या एसअँडपी ग्‍लोबल ईएसजी स्‍कोअरमध्‍ये गेल्‍या वर्षीच्‍या तुलनेत २० टक्‍क्‍यांहून अधिक वाढ झाली आणि आम्‍ही प्रादेशिक विमा कंपन्‍यांपैकी एक म्‍हणून प्रमाणित आहोत. आमचे एमएससीआय ईएसजी रेटिंग देखील 'ए' श्रेणीपर्यंत अपग्रेड करण्‍यात आले आहे. आम्‍ही शाश्‍वत विकासाला चालना देण्‍यावर आणि प्रमुख विभागांमधील आमचे नेतृत्‍व अधिक प्रबळ करण्‍यावर लक्ष केंद्रित केले आहे. आम्‍ही सर्वसमावेशक गरजांची पूर्तता करण्‍यासोबत गतीशील बाजारपेठेत स्थिर राहण्‍याची खात्री घेण्‍यासाठी ग्राहक-केंद्रित इनोव्‍हेशन्‍समध्‍ये गुंतवणूक करत राहू. आम्‍हाला भागधारकांसाठी दीर्घकालीन मूल्‍य देण्‍याप्रती आमच्‍या क्षमतेवर विश्‍वास आहे, तसेच आम्‍ही गतीशीलता व स्थिरतेसह बदलत्‍या बाजारपेठेत स्थितीशी जुळवून घेत राहू.''

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.