द बॉडी शॉपने 'स्पार्क ए चेंज २.०' मोहीम लाँच केली
October 07, 2024
0
द बॉडी शॉपने 'स्पार्क ए चेंज २.०' मोहीम लाँच केली
~ द बॉडी शॉप व प्लास्टिक्स फॉर चेंज यांच्यामधील सहयोगाला पाच वर्ष पूर्ण ~
मुंबई, ६ ऑक्टोबर २०२४: द बॉडी शॉप हा ब्रिटीश-निर्मित आंतरराष्ट्रीय एथिकल ब्युटी ब्रँड प्लास्टिक फॉर चेंज (पीएफसी) सोबतच्या प्रभावी सहयोगाच्या पाचव्या वर्षाला साजरे करत आहे. पीएफसी हा मुंबईमध्ये स्थित जगातील प्रमाणित रिसायकल केलेल्या प्लास्टिकचा सर्वात मोठा स्रोत आहे. या क्षणाला साजरे करण्यासाठी ब्रँडने पुरस्कार-प्राप्त स्पार्क ए चेंजचा भाग म्हणून नवीन डिजिटल जाहिरातीचे अनावरण केले, ज्यामध्ये भारतीय अभिनेत्री व मॉडेल डायना पेण्टी आहेत.
यानिमित्त आयोजित कार्यक्रमात दक्षिण आशियामधील द बॉडी शॉपच्या क्वेस्ट रिटेलचे चीफ ब्रँड ऑफिसर हरमीत सिंग, तसेच प्लास्टिक्स फॉर चेंजच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीनिधी कश्यप आणि प्रोग्राम लाभार्थी दीपा एकत्र आले. त्यांनी या अर्थपूर्ण सहयोगाचा प्रवास आणि प्रभावाला प्रकाशझोतात आणले.
उत्सवी उत्साह आणि स्पार्क ए चेंजची थीम कायम ठेवत द बॉडी शॉप या मोहिमेच्या प्रभावाचा विस्तार करण्याच्या माध्यमातून प्लास्टिक्स फॉर चेंजसोबतचा सहयोग साजरा करत आहे. स्पार्क ए चेंज २.० सह द बॉडी शॉप फेस्टिव्ह गिफ्टिंगच्या उत्साहाला नव्या उंचीवर घेऊन जात आहे, जेथे प्रत्येक खरेदी ही दाता व प्राप्तकर्त्याला आनंद देण्यासोबत भारतभरातील वंचित समुदायांच्या उदरनिर्वाहाला पाठबळ देखील देते.
डायना पेण्टी असलेल्या जाहिरातीमध्ये उत्सवी संदेश सुरेखरित्या कॅप्चर करण्यात आला आहे, जेथे त्या सीझनमध्ये सकारात्मकता व आनंदाची भर करतात. या जाहिरातीमध्ये त्या द बॉडी शॉपची उत्पादने, गिफ्ट्स आणि प्लास्टिक्स फॉर चेंज मर्चंडाइज (पाऊचेस्) यांचा आनंद घेताना, तसेच प्रेक्षकांना उद्देशासह सणासुदीचा काळ साजरा करण्याचे आवाहन करताना पाहायला मिळतात.
या नवीन उपक्रमाचा भाग म्हणून द बॉडी शॉपने प्लास्टिक्स फॉर चेंजला ई-ट्रायसायकल्स देण्यासाठी दान मोहिम सुरू केली आहे, ज्यामुळे कचरा गोळा करणारे त्यांचा उदरनिर्वाह सुधारण्यास सक्षम होतील. ग्राहकांना ब्रँडची वेबसाइट आणि भारतभरातील २०० स्टोअर्सच्या माध्यमातून दान करत या उपक्रमाला पाठिंबा देण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
दक्षिण आशियामधील द बॉडी शॉपच्या क्वेस्ट रिटेलच्या चीफ ब्रँड ऑफिसर हरमीत सिंग म्हणाल्या, ''आम्हाला स्पार्क ए चेंज २.० मोहिम लाँच करण्याचा आनंद होत आहे, ज्यामधून दान करण्याचे आणि दूरवर पोहोचणारा आनंद शेअर करण्याचे महत्त्व दिसून येते. ही जाहिरात प्लास्टिक्स फॉर चेंजसोबतच्या आमच्या सहयोगाच्या सकारात्मक प्रभावाला दाखवते, तसेच व्यवसाय अर्थपूर्ण परिवर्तनाला चालना देऊ शकणाऱ्या पद्धतींना निदर्शनास आणते. गेल्या पाच वर्षांमध्ये आम्ही लँडफिल्समधून लाखो प्लास्टिक बॉटल्स गोळा करून रिसायकल केल्या आहेत आणि हजारो कचरा गोळा करणाऱ्यांना, विशेषत: महिलांना सुधारित उत्पन्न संधी व बाजारपेठ उपलब्धतेसह सक्षम केले आहे. ई-ट्रायसायकल्स देण्याप्रती आमची दान मोहिम शाश्वत व इको-फ्रेण्डली पद्धतीने या त्यांच्या प्रयत्नांना अधिक पाठिंबा देते.''
तसेच या मोहिमेचा भाग म्हणून द बॉडी शॉप सुरेखरित्या कलर्ड क्रिएट युअर ओन आणि प्रीपॅक गिफ्ट बॉक्सेसची श्रेणी देत आहे, जे आकर्षक उत्सवी रंगांमध्ये उपलब्ध असून किंमत ६९५ रूपयांपासून सुरू होते. ब्रँडने प्लास्टिक फॉर चेंजसोबत सहयोगाने रिसायकल केलेल्या प्लास्टिकपासून बनवण्यात आलेले बहु-उद्देशीय मेकअप पाऊचेस् दोन आकर्षक रंगांमध्ये (क्रॉस-झिप पाऊच आणि चौरसाकृती नेट-झिप पाऊच) लाँच केले आहेत.
२०१९ मध्ये हा सहयोग केल्यापासून द बॉडी शॉप आणि प्लास्टिक्स फॉर चेंज यांनी अथक मेहनत घेत अधिक एथिकल व शाश्वत प्लास्टिक पुरवठा साखळी तयार केली आहे. या सहयोगाचा २,००० हून अधिक कचरा गोळा करणाऱ्यांना फायदा झाला आहे, ज्यामध्ये अर्ध्याहून अधिक महिला आहेत, ज्यांना योग्य किमती, सुधारित कामाच्या स्थिती आणि संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, ज्या पूर्वीच्या अनौपचारिक अर्थव्यवस्थेमध्ये उपलब्ध नव्हत्या. आजपर्यंत या उपक्रमाने २,००० मेट्रिक टनहून अधिक प्लास्टिक कचरा गोळा केला आहे, जो १०० दशलक्ष बॉटल्स इतका आहे. ज्यामुळे प्लास्टिक रिसायकलिंगप्रती दृष्टीकोनाला नवीन आकार देण्यास मदत होत आहे.
अभिनेत्री व मॉडेल डायना पेण्टी म्हणाल्या, ''मला 'स्पार्क ए चेंज' उपक्रमाचा भाग असण्याचा अभिमान वाटतो, जो दान करण्याच्या आनंदाचे महत्त्व सांगतो. यंदा, द बॉडी शॉपच्या निसर्ग-प्रेरित सौंदर्य उत्पादनांचा आनंद घेत दिवाळी सण साजरा करा आणि एथिकल गिफ्ट्सचा शोध घेत प्रियजनांसोबत शेअर करा. स्टोअरमध्ये व ऑनलाइन सणासुदीच्या काळाचा आनंद घ्या आणि त्यांचे कम्युनिटी फेअर ट्रेड पार्टनर प्लास्टिक्स फॉर चेंजला पाठिंबा द्या. ज्यामुळे पर्यावरण स्वच्छ ठेवण्याप्रती योगदान देणाऱ्या कचरा गोळा करणाऱ्यांच्या जीवनात सुधारणा होण्यास मदत होईल.''