Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

तंत्रज्ञान क्षेत्रात कुशल कर्मचाऱ्यांना वाढती मागणी: टीमलीज डिजिटल

 

तंत्रज्ञान क्षेत्रात कुशल कर्मचाऱ्यांना वाढती मागणी: टीमलीज डिजिटल

~ ग्‍लोबल कॅपेबिलिटी सेंटर्समधील नियुक्तीमध्ये ४० टक्के वाढीचा अंदाज ~


मुंबई, १८ ऑक्टोबर २०२४: टीमलीज डिजिटल या आघाडीच्‍या टेक स्‍टाफिंग व सोल्‍यूशन्‍स प्रदाताने आगामी आर्थिक वर्ष २०२५ साठी हायरिंग ट्रेण्‍ड्स आणि टेक लँडस्‍केपबाबत नवीन इनसाइट्स सादर केले आहेत. या विश्‍लेषणामधून विविध अनुभव असलेल्‍या कर्मचाऱ्यांची वाढती मागणी, प्रभावी बाजारपेठ घटक आणि सतत विकसित होत असलेल्‍या टेक उद्योगामध्‍ये कौशल्‍य विकासाचे महत्त्व दिसून येते. टीमलीज डिजिटलने प्राप्‍त केलेली काही प्रमुख माहिती पुढे देण्‍यात आली आहे.


टेक क्षेत्रात हायरिंगसंदर्भात नवोदित, मिड-लेव्‍हल व्‍यावसायिक आणि वरिष्‍ठ व्‍यवस्‍थापनासाठी विशिष्ट पॅटर्न्‍स  दिसून येत आहेत. ग्‍लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स (जीसीसी) नवोदित टॅलेंटसाठी महत्त्वपूर्ण नियोक्‍ते म्‍हणून उदयास आले आहेत, जे एण्‍ट्री-लेव्‍हल उमेदवारांना मागणीदायी कौशल्‍यांसाठी उद्योग मानकापेक्षा जवळपास ३० टक्‍के अधिक पगार देत आहेत. ही वाढ कायम राहण्‍याची अपेक्षा आहे, जेथे जीसीसी गेल्‍या वर्षीच्‍या तुलनेत नवोदितांना नियुक्‍त करण्‍याच्‍या प्रमाणात ४० टक्‍क्‍यांनी वाढ करण्‍याचा अंदाज आहे. आशावादी असलेले आयटी सेवा क्षेत्र देखील नवोदितांच्‍या रिक्रूटमेंटमध्‍ये २० ते २५ टक्‍के वाढ होण्‍याची अपेक्षा करत आहे, ज्‍यामधून सॉफ्टवेअर डेव्‍हलपमेंट, डेटा इंजीनिअरिंग आणि क्‍लाऊड तंत्रज्ञानांमधील कौशल्‍यांसाठी मागणी दिसून येते.


दरम्‍यान, मिड-लेव्‍हल पदांसाठी स्थिरता दिसून येते, तर प्रोजेक्‍ट मॅनेजर्स, डेटा सायण्टिस्‍ट्स आणि सायबरसुरक्षा तज्ञांसाठी मागणी वाढत आहे. या पदांसाठी पगारांमध्‍ये आर्थिक वर्ष २४ च्‍या तुलनेत ७.८९ टक्‍के ते १०.२ टक्‍के वाढ दिसण्‍यात आली आहे, यामधून बाजारपेठेत व्‍यवसाय कार्यसंचालनांचे प्रभावीपणे व्‍यवस्‍थापन व सानुकूल करण्‍यासाठी त्‍यांच्‍या प्रत्‍यक्ष अनुभवाचा उपयोग करू शकणा-या व्‍यावसायिकांची गरज दिसून येते. वरिष्‍ठ व्‍यवस्‍थापन पदांच्‍या मागणीमध्‍ये गेल्‍या वर्षीच्‍या तुलनेत २१ टक्‍क्‍यांची वाढ दिसण्‍यात आली आहे, ज्‍याचे श्रेय डेटा इंजीनिअरिंग, उत्‍पादन व्‍यवस्‍थापन आणि डेव्‍हऑप्‍समधील कौशल्‍याच्‍या धोरणात्‍मक महत्त्वाला जाते, तसेच पगारांमध्‍ये ६.५४ टक्‍के ते १०.८ टक्‍क्‍यांपर्यंत झालेल्‍या वाढीने देखील यासाठी हातभार लावला आहे.


टीमलीज डिजिटलच्‍या इनसाइट्समधून निदर्शनास येते की, विविध प्रमुख घटकांनी टेक हायरिंगमधील वार्षिक वाढीला हातभार लावला आहे. एआय, मशिन लर्निंग (एमएल) व ऑटोमेशन कौशल्‍यांमधील वाढीमुळे डेटा-संबंधित पदांसाठी मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. हा ट्रेण्‍ड विशेषत: डेटा सायण्टिस्‍ट्ससाठी रोजगार पोस्टिंग्‍जमधील वाढीमधून दिसून येतो, जेथे २०२४ मध्‍ये ६९ टक्‍के नियोक्‍त्‍यांनी एमएल कौशल्‍यांचा उल्‍लेख केला. नॅच्‍युरल लँग्‍वेज प्रोसेसिंग (एनएलपी) मधील कौशल्‍यांमध्‍ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे, जेथे मागणी २०२४ मधील ५ टक्‍क्‍यांवरून २०२५ मध्‍ये १९ टक्‍क्‍यांपर्यंत वाढण्‍याची अपेक्षा आहे, यामधून उद्योगाचा एआय-संचालित सोल्‍यूशन्‍सप्रती वाढता कल दिसून येतो. तसेच, पायथॉन प्रोग्रामिंग, एथिकल हॅकिंग आणि पेनेट्रेशन टेस्टिंग, एजाइल स्‍क्रम मास्‍टर, एडब्‍ल्‍यूएस सुरक्षितता आणि जावास्क्रिप्‍ट अशा कौशल्‍यांसाठी मागणी वाढत आहे, ज्‍यामधून टेक हायरिंगची बदलती स्थिती दिसून येते.





क्‍लाऊड पायाभूत सुविधांच्‍या झपाट्याने होत असलेल्‍या अवलंबामुळे क्‍लाऊड इंजीनिअरिंग, डेव्‍हलपमेंट आणि आर्किटेक्‍चरशी संबंधित पदांमधील हायरिंगला अधिक चालना मिळाली आहे. कंपन्‍या विशेषत: एडब्‍ल्‍यूएस आणि मायक्रोसॉफ्ट अझुरे यामधील प्‍लॅटफॉर्म-विशिष्‍ट सर्टिफिकेशन्‍सना प्राधान्‍य देत आहे, जेथे हे क्रेडेन्शियल्‍स अधिक प्रमाणात टेक व्‍यावसायिकांसाठी महत्त्वाचे आहेत. आर्थिक वर्ष २०२५ पर्यंत भारतात विविध क्षेत्रांमध्‍ये क्‍लाऊड तंत्रज्ञानांचा झपाट्याने अवलंब करण्‍याला साह्य करण्‍यासाठी दोन दशलक्षहून अधिक क्‍लाऊड व्‍यावसायिकांची गरज असण्‍याची अपेक्षा आहे.


टीमलीज डिजिटलच्‍या दृष्टिकोनातून निदर्शनास येते की, कंपन्‍या टॅलेंटसंदर्भातील तफावत दूर करण्‍याचा प्रयत्‍न करत असताना अपस्किलिंग आणि व्‍यावसायिक विकासाला अधिक प्राधान्‍य दिले जाईल. चिंताजनक बाब म्‍हणजे गेल्‍या वर्षी ६३ टक्‍के टेक कर्मचारी अपस्किल झाले नाहीत, ज्‍यामधून कौशल्‍यांसदर्भातील ही तफावत त्‍वरित दूर करण्‍याची गरज दिसून येते. यापैकी ७३ टक्‍के कर्मचाऱ्यांनी वेळेच्‍या अभावाचे कारण सांगितले, तर ४२ टक्‍के कर्मचाऱ्यांनी त्‍यांच्‍या विकासासाठी अडथळा म्‍हणून व्‍यवस्‍थापकांकडून पाठिंबा मिळत नसल्‍याचे सांगितले. कनिष्‍ठ पदांवरून वरिष्‍ठ पदांवर जाण्‍याची महत्त्वाकांक्षा असलेल्‍या कर्मचाऱ्यांना क्‍लाऊड कम्‍प्‍युटिंग, डेटा अॅनालिटिक्‍स आणि सायबरसिक्‍युरिटी या कौशल्‍यांमध्‍ये सर्टिफिकेशन्‍स पूर्ण करण्‍याचे आवाहन केले जात आहे, कारण ही कौशल्‍ये व्‍यवसायासाठी आवश्‍यक आहेत. अपस्किलिंग नियोक्‍त्‍यांसाठी किफायतशीर असल्‍याचे दिसण्‍यात आले आहे, ज्‍यामुळे ते टॅलेंट मागणीची पूर्तता करण्‍यामध्‍ये, तसेच व्‍यावसायिकांना उच्‍च-स्‍तरीय पदांसाठी आवश्‍यक असलेल्‍या कौशल्‍यांसह सुसज्‍ज करण्‍यामध्‍ये सक्षम होतील.

कारण ही कौशल्‍ये व्‍यवसायासाठी आवश्‍यक आहेत. अपस्किलिंग नियोक्‍त्‍यांसाठी किफायतशीर असल्‍याचे दिसण्‍यात आले आहे, ज्‍यामुळे ते टॅलेंट मागणीची पूर्तता करण्‍यामध्‍ये, तसेच व्‍यावसायिकांना उच्‍च-स्‍तरीय पदांसाठी आवश्‍यक असलेल्‍या कौशल्‍यांसह सुसज्‍ज करण्‍यामध्‍ये सक्षम होतील.


याव्‍यतिरिक्‍त, टेक कर्मचारीवर्ग सोल्‍यूशन्‍स प्रदाताच्‍या दृष्टीकोनामधून निदर्शनास येते की राज्‍य-निहाय पगारामधील फरक टेक रोजगार बाजारपेठेला आकार देत आहे, ज्‍याला राहणीमानाचा खर्च, टेक कंपन्‍यांचे एकीकरण आणि स्‍थानिक धोरणे पाठबळ देत आहेत. वरिष्‍ठ पदांसाठी आवश्‍यक असलेल्‍या विविध कौशल्‍यांमुळे आर्थिक वर्ष २४ च्‍या तुलनेत पगारामध्‍ये ६.७९ टक्‍के ते १०.७ टक्‍क्‍यांपर्यत वाढ दिसून येत आहे. यामध्‍ये प्रगत डेटा मॅनिप्‍युलेशन, स्‍टॅटिस्टिकल अॅनालिसिस, मशिन लर्निंग, क्‍लाऊड कम्‍प्‍युटिंग अशा कौशल्‍यांसह हॅडूप व स्‍पार्क यांसारख्‍या मोठ्या डेटा टूल्‍समधील कौशल्‍याचा समावेश आहे. टेक उद्योगाला सध्‍या या क्षेत्रांमधील कौशल्‍यांच्‍या कमतरतेचा सामना करावा लागत आहे, ज्‍यामुळे मागणी व पुरवठा यामध्‍ये फरक दिसून येत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.