Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

डायबेटिक रेटिनोपॅथी तपासणीसाठीच्या मार्गदर्शक सूचना प्रसारित

मधुमेहामुळे येणाऱ्या दृष्टिहीनतेला प्रतिबंध करण्यासाठी VRSI आणि RSSDI द्वारे पहिल्यांदाच डायबेटिक रेटिनोपॅथी तपासणीसाठीच्या मार्गदर्शक सूचना प्रसारित या मार्गदर्शक सूचना म्हणजे मधुमेहाशी संबंधित दृष्टिहीनतेचा सामना करण्यासाठी घेतलेला पुढाकार आहे. या समस्येचे वेळीच निदान झाल्यास तिला रोखता येणे शक्य आहे. मधुमेहाचे १०.१ कोटींहून अधिक रुग्ण असलेला भारत जगाची मधुमेहाची राजधानी म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. याचा परिणाम म्हणजे मधुमेहाच्या वाढत्या प्रमाणाबरोबरच मधुमेहाशी संबंधित टाळता येण्याजोग्या अंधत्वाच्या प्रमाणातही प्रचंड वाढ नोंदवली गेली आहे. डायबेटिक रेटिनोपॅथी या समस्येचे वेळीच निदान करण्यामध्ये व त्याच्या व्यवस्थापनासाठी रुग्णाला नेत्रविकारतज्ज्ञाकडे पाठविण्यामध्ये मधुमेहतज्ज्ञ महत्त्वाची भूमिका बजावत असतात. व्हिट्रिओ रेटिनल सोसायटी ऑफ इंडिया (VRSI) आणि रिसर्च सोसायटी फॉर द स्टडी ऑफ डायबेटिस इन इंडिया (RSSDI) ने परस्पर सहयोगातून डायबेटिक रेटिनोथेरपी स्क्रिनिंगसाठीच्या मार्गदर्शक सूचनांची यादी तयार केली आहे. ही अशा प्रकारची पहिलीच यादी असून भारतातील प्रत्येक फिजिशियन व मधुमेहतज्ज्ञास आपल्या रुग्णांना डायबेटिक रेटिनोपॅथीविषयी शिक्षित करण्यासाठी या सूचनांची मदत होणार आहे. जीवनशैलीतील बदल, शहरांमध्ये होणारे स्थलांतर, लठ्ठपणा आणि ताणतणाव यांमुळे देशातील मधुमेहाच्या संख्येमध्ये वाढ होत आहे, त्याचवेळी मधुमेहाशी निगडित दृष्टिहीनतेची प्रकरणेही वाढत आहेत. रोजगारक्षम वयातील लोकसंख्येमध्ये टाइप-२ मधुमेहाची समस्या सार्वत्रिक असल्याचे दिसते, ज्यामुळे त्यांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य प्रभावित होते. या स्थितीची वेळीच तपासणी झाली नाही तर ते भारतामध्ये अंधत्वाचे प्रमुख कारण बनू शकते ज्याचा प्रचंड आर्थिक भार सोसावा लागू शकतो. राष्ट्रीय पातळीवर डायबेटिक रेटिनोपॅथीचे प्रमाण १२.५% व दृष्टीला धोका निर्माण करणाऱ्या ‘डायबेटिस रेटिनोपॅथी’ चे प्रमाण ४% असल्याने सुमारे ३० लाख भारतीयांना दृष्टी गमावण्याचा धोका हे. यातून अपरिवर्तनीय दृष्टिहीनतेला रोखण्यासाठी प्रत्येक मधुमेहग्रस्त व्यक्तीची वेळच्या वेळी तपासणी केली जाण्याची निकड अधोरेखित होते. कारण सुरुवातीच्या टप्प्यावर हा आजार लक्षात येत नाही आणि म्हणूनच ‘सायलन्ट थीफ ऑफ साइट’ असे नाव देण्यात आले आहे. या आजाराचे लवकरात लवकर निदान होण्यास व उपचारांस प्रोत्साहन मिळण्याच्य दृष्टीने आवश्यक ती साधने मधुमेहग्रस्त व्यक्ती ज्यांच्याशी प्रथम संपर्क साधतात त्या आरोग्यसेवाकर्मींना उपलब्ध करून देत त्यांना सक्षम बनविणे हे या उपक्रमाचे लक्ष्य आहे, ज्यातून अंतिमत: डायबेटिक रेटिनोपॅथीमुळे होणारी दृष्टीची गंभीर हानी आणि अंधत्व यांचा धोका कमी होऊ शकेल. दिल्ली येथे पार पडलेल्या एका परिषदेमध्ये VRSI आणि RSSDI यांनी डायबेटिक रेटिनोपॅथी स्क्रिनिंग गाइडलाइन्स फॉर फिजिशियन्स इन इंडिया या शिर्षकाच्या, या विषयावरील आपली भूमिका स्पष्ट करणाऱ्या पोझिशन स्टेटमेंटचे प्रकाशन केले. यावेळी प्रख्यात आरोग्यकर्मी व उद्योगक्षेत्रातील अग्रगण्य व्यक्ती उपस्थित होत्या. या डॉ. सुधा चंद्रशेखर (माजी कार्यकारी संचालक – राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण – आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग), डॉ. आर. किम (अध्यक्ष – VRSI), डॉ. मनिषा अग्रवाल (सरचिटणीस, VRSI) डॉ. राकेश सहाय (अध्यक्ष, RSSDI), आणि डॉ. संजय अग्रवाल (महासचिव, RSSDI) यांनी आपला दृष्टिकोन मांडला व डायबेटिक रेटिनोपॅथीची भारतातील सद्यस्थिती तसेच प्रस्थापित शिफारशींद्वारे यासंदर्भातील उपाययोजनांमधील त्रुटी कशाप्रकारे भरून काढल्या जात आहेत याची रूपरेखा मांडली. तक्ता १: भारतातील फिजिशियन्ससाठी डायबेटिक रेटिनोपॅथी तपासणीसाठीच्या मार्गदर्शक सूचना: व्हिट्रिओरेटिनल सोसायटी ऑफ इंडिया (VRSI) आणि रिसर्च सोसायटी फॉर द स्टडी ऑफ डायबेटिस इन इंडियाद्वारे प्रसारित पोझिशन स्टेटमेंट (RSSDI) टाइप १ डायबेटिस मेलिटस टाइप १ डायबेटिस मेलिटसच्या निदानानंतर 5 वर्षांत नेत्रतपासणी करून घ्यावी टाइप २ डायबेटिस मेलिटस टाइप २ डायबेटिस मेलिटसच्या निदानाच्या वेळी प्रारंभिक नेत्रतपासणी करून घ्यावी गर्भावस्थेतील डायबेटिस मेलिटस रुग्णांसाठी • गर्भधारणेच्या आधी आणि पहिल्या तिमाहीच्या सुरुवातीच्या काळात नेत्रतपासणी करून घ्यावी • प्रत्येक व्यक्तीमधील रेटिनोपॅथीची तीव्रता आणि नजिकच्या काळात झालेल्या बदलांनुसार फॉलो-अप घेतला जावा डायबेटिस रेटिनोपॅथीची तीव्रता सकृतदर्शनी DR न आढळल्यास वार्षिक फिजिशियनच्या क्लिनिकमध्ये फंडस फोटो स्क्रिनिंग करून घ्यावे DR किंवा DME ची चिन्हे आढळल्यास तत्काळ नेत्रविकारतज्ज्ञांकडे पाठवले जावे. DR डायबेटिक रेटिनोपॅथी DMR डायबेटिक मॅक्युलर एडेमा आरोग्य व कुटुंबकल्याण विभागाअंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या माजी कार्यकारी संचालक डॉ. सुधा चंद्रशेखर म्हणाल्या, “मधुमेहासह जगणाऱ्या लक्षावधी भारतीयांच्या दृष्टीचे संरक्षण करण्यासाठी डायबेटिक रेटिनोथेरपी तपासणीचा सरकारच्या आयुषमान भारत योजनेमध्ये समावेश करण्यात आला आहे. या आजाराच्या लवकरात लवकर निदान होण्यास राष्ट्रीय स्तरावर प्राधान्य देत, दृष्टी जतन करणे आणि देशभरात या आजारावरील उपचारांच्या परिणामांमध्ये सुधारणा घडवून आणणे हे या उपक्रमाचे लक्ष्य आहे. डायबेटिक रेटिनोपॅथीची तपासणी ही विशेषकरून आयुषमान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (AB-PMJAY) योजनेच्या लाभार्थींसाठी फायद्याची ठरणार आहे. DR आजार गंभीर टप्प्यावर पोहोचल्यावर त्याचे व्यवस्थापन करण्यासाठी होणारा मोठा खर्च वाचविण्यासाठी याची मदत होणार आहे व अधिक चांगल्या परिणामांची हमी मिळणार आहे.” VRSI चे अध्यक्ष डॉ. आर. किम म्हणाले, “संयुक्तपणे या मार्गदर्शक सूचनांचे अनावरण करताना आणि भारतामध्ये डायबेटिक रेटिनोपॅथीच्या तपासणीसाठी नवे मापदंड प्रस्थापित करताना आम्हाला आनंद होत आहे. फिजिशियन्स, मधुमेहतज्ज्ञ आमि नेत्रविकारतज्ज्ञांच्या परस्पर सहयोगाला प्रोत्साहन देत मधुमेहाच्या अधिक चांगल्या व्यवस्थापनाला प्रोत्साहन देण्याचे आमि देशभरात टाळता येण्याजोग्या अंधत्वाच्या घटना कमी करण्याचे आमचे लक्ष्य आहे.” डायबेटिक रेटिनोपॅथीच्या तपासणीचे महत्त्व ठळकपणे मांडताना VRSI च्या सरचिटणीस डॉ. मनिषा अग्रवाल म्हणाल्या, “डायबेटिक रेटिनोपॅथीचा प्रादुर्भाव वाढत असूनही याविषयी अतिशय कमी जागरुकता दिसून येते व बरेचदा या आजाराची लक्षणे दिसून येत नसल्याने डोळ्यांची तपासणी करून घेणाऱ्या मधुमेहग्रस्त व्यक्तींची संख्या अगदीच किरकोळ आहे. म्हणूनच डायबेटिक रेटिनोपॅथीमुळे येणारी दृष्टिहीनत तसेच वेळच्यावेळी तपासणी आणि रोगव्यवस्थापन यांविषयी जागरुकता निर्माण करणे महत्त्वाचे आहे.” “भारतामध्ये मधुमेहासह जगणाऱ्या व्यक्तींची वाढती संख्या केवळ रक्तातील ग्लुकोजच्या पातळीवर देखरेख ठेवण्याचेच नव्हे तर मधुमेहाशी निगडित आरोग्याच्या इतर गुंतागुंतीच्या समस्यांसाठीची नियमित तपासणी करून घेण्याचे महत्त्व अधोरेखित करते. डायबेटिक रेटिनोपॅथी ही अशीच एक गुंतागुंतीची समस्या आहे, जी उपचारांविना दुर्लक्षित राहून गेल्यास त्यामुळे नजरेची गंभीर आणि बरेचदा अपरिवर्तनीय हानी होऊ शकते. या मार्गदर्शक सूचना जनरल फिजिशियन्स आणि मधुमेहतज्ज्ञांमध्ये डायबेटिक रेटिनोपॅथीची वेळेवर तपासणी करून घेण्याच्या अत्यंत महत्त्वाच्या गरजेविषयी जागरुकता वाढविण्याच्या कामी महत्त्वाची भूमिका निभावतील.” RSSDI चे महासचिव डॉ. संजय अग्रवाल म्हणाले. • प्रख्यात इंटरनॅशनल जर्नल ऑफ डायबेटिस इन डेव्हलपिंग कंट्रीजमध्ये प्रसिद्ध झालेल्या या मार्गदर्शक सूचना एक सर्वसमावेशक गणक म्हणून काम करतील व त्यामुळे मधुमेहाच्या व्यवस्थापनामध्ये सुधारणा घडवून आणण्याच्या व डायबेटिक रेटिनोपॅथीच्या तपासणीच्या भारताच्या वाटचालीमधील एका महत्त्वाच्या टप्प्याची प्रभावीपणे नोंद होईल.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.