Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

कियाने ईव्‍ही९ आणि कार्निवल लिमोझिनसह केआयएन २.० परिवर्तन सादर केले

कियाने ईव्‍ही९ आणि कार्निवल लिमोझिनसह केआयएन २.० परिवर्तन सादर केले
~ नाविन्‍यपूर्ण तंत्रज्ञान, डिझाइन आणि स्थिरतेचे संयोजन ~ मुंबई, ६ ऑक्टोबर २०२४: किया या आघाडीच्‍या प्रीमियम कारमेकरने पुन्‍हा एकदा भावी दृष्टिकोन अवलंबवत आपल्‍या २.० परिवर्तन धोरणासह भारतीय ऑटोमो‍बाइल इकोसिस्‍टमला नव्‍या उंचीवर नेले आहे. किया २.० हा वेईकलमधील डिझाइन व तंत्रज्ञान सुधारण्‍याप्रती केंद्रित दृष्टिकोन आहे, जो भारतीय ऑटोमोबाइल उद्योगामधील परिवर्तनामध्‍ये अग्रस्‍थानी आहे. कंपनीने अभूतपूर्व तंत्रज्ञानांसह या परिवर्तनाला सुरूवात करण्‍यासाठी ईव्‍ही९ आणि कार्निवल लिमोझिन लाँच केली, ज्‍यामधून उद्योग अग्रणी म्‍हणून कंपनीची क्षमता दिसून येते. कियाने ईव्‍ही९ आणि कार्निवल लिमोझिनमधील २० प्रबळ सुरक्षितता वैशिष्‍ट्यांसह सक्रिय व निष्क्रिय सुरक्षिततेमध्‍ये वाढ केली आहे. कंपनीकडून ईव्‍ही९ व कार्निवल लिमोझिन लाँच, ज्‍यांची सुरूवातीची किंमत अनुक्रमे १,२९,९०,००० रूपये आणि ६३,९०,००० रूपये आहे.
किया २.० ची खासियत उल्‍लेखनीय नाविन्‍यतांसह सादर करण्‍यात आलेले किया कनेक्‍ट २.० आणि प्रगत वेईकल टू एव्‍हरीथिंग (व्‍ही२एक्‍स) तंत्रज्ञान यामध्‍ये सामावलेली आहे. किया कनेक्‍ट २.० चे खास आकर्षण म्‍हणजे कियाचे अपडेटेड कनेक्‍टेड कार प्‍लॅटफॉर्म, जे अनेक नवीन नाविन्‍यतांचा अनुभव देते. या नवीन प्लॅटफॉर्मने मॅपसोबत वेईकल डायग्‍नोस्टिक उद्देशासाठी कंट्रोलर ओटीए (ओव्‍हर द एअर) अपडेट्स सादर केले आहेत. किया कनेक्‍ट २.० अंतर्गत ओटीए कियाला नवीन लाँच करण्‍यात आलेल्‍या ईव्‍ही९ आणि कार्निवल लिमोझिनला अनुक्रमे ४४ व २७ कंट्रोलर मॉड्यूल्‍ससह दुरून डायग्‍नोज व फिक्‍स करण्‍याची सुविधा देते. किया २.० परिवर्तनासह आणखी एक महत्त्वपूर्ण झेप म्‍हणजे वेईकल-टू-एव्‍हरीथिंग (व्‍ही२एक्‍स) तंत्रज्ञान, जे कनेक्‍टेड युगामध्‍ये नवीन क्षमतांना अनलॉक करते, ग्राहकांच्‍या डिजिटल जीवनशैलीशी जुळून जाते. या एकीकृत दृष्टिकोनासह कियाचा गाहकांना त्‍यांच्‍या वेईकल्‍सच्‍या संपूर्ण क्षमता देण्‍याचा मनसुबा आहे, ज्यामुळे असे भविष्‍य घडेल, जेथे गतीशीलता व कनेक्‍टीव्‍हीटी अमर्यादित क्षमता निर्माण करतील. सध्‍या, ईव्‍ही९ व्‍ही२एक्‍स कॉम्‍पॅटिबिलिटी असलेली भारतातील एकमेव वेईकल आहे आणि कियाची बाजारपेठ व इकोसिस्‍टम सुसज्‍जता एक्‍स्‍प्‍लोअर केल्‍यानंतर इतर वेईकल्‍समध्‍ये ही सुविधा विस्‍तारित करण्‍याची योजना आहे.
किया इंडियाचे एमडी व सीईओ श्री. ग्‍वांगू ली म्‍हणाले, “कियामध्‍ये आम्‍ही नेहमी नवीन क्षमतांचा शोध घेण्‍याचा प्रयत्‍न करतो, ज्‍यांचा कंपनीसोबत एकूण ऑटोमोटिव्‍ह इकोसिस्‍टमवर मोठ्या प्रमाणात दीर्घकालीन प्रभाव पडू शकतो. आम्‍ही २०१९ मध्‍ये भारतीय ऑटोमोबाइल उद्योगामध्‍ये धुमाकूळ निर्माण केला, तसेच ५ वर्षांनंतर देखील किया २.० परिवर्तन धोरणासह पुन्‍हा एकदा बदल घडवून आणत आहोत. किया २.० परिवर्तनाचा मुलभूत बाबी कायम ठेवत ऑटोमोबाइलबाबत तुम्‍हाला असलेली माहिती अधिक दृढ करण्‍याचा मनसुबा आहे. सादर करण्‍यात आलेले किया कनेक्‍ट २.० आणि वेईकल टू एव्‍हरीथिंग टेक मोबिलिटीचा भावी स्‍तर दाखवण्‍याची आमची पद्धत आहे. अत्‍याधुन‍िक तंत्रज्ञान, आकर्षक डिझाइन आणि अद्वितीय लक्‍झरीवरील आमचा फोकस भारतातील बाजारपेठेत क्रांतिकारी बदल घडवून आणेल. आमची नवीन डिझाइन शैली ‘डिझाइन २.०'मधून आकर्षकता, अत्‍याधुनिकता आणि साहसीपणा दिसून येतो, जे आमचे नवीन शोस्‍टॉपर्स - ईव्‍ही९ आणि कार्निवल लिमोझिनमध्‍ये समाविष्‍ट आहेत. मी आमचे ग्राहक, सहयोगी व भागधारकांचे त्‍यांच्‍या अविरत पाठिंब्‍यासाठी आभार व्‍यक्‍त करतो. भारतातील कियाच्‍या यशामधून नाविन्‍यता, दर्जा व ग्राहक समाधानाप्रती आमची कटिबद्धता दिसून येते.''

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.