मासिक पाळी बाबत खुलेपणाने बोलणे गरजेचे - बॉलीवूड अभिनेत्री अनन्या पांडे
मुंबई, १३ डिसेंबर, २०२४: मासिकपाळी संदर्भातील अनेक गोष्टी बदलून टाकणाऱ्या व्हिस्पर अल्ट्रा उत्पादनाचे लाँचिंग साजरे करण्यासाठी मुंबईत एक समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यात अभिनेत्री अनन्या पांडे सह एम्ब्रायोलॉजिस्ट व वैज्ञानिक डॉ. तनया नरेंद्र (डॉ. क्युटेरस नावाने लोकप्रिय) या सहभागी झाल्या होत्या.
यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना अनन्या पांडे म्हणाली, मासिक पाळी बाबत खुलेपणाने बोलणे गरजेचे असून “व्हिस्परसोबत सहयोग माझ्यासाठी विशेष आहे, कारण हा फक्त ब्रॅण्ड सहयोग नाही, तर मासिकपाळीबद्दल संभाषणांना चालना देणारा हा एक प्रभावी मंच आहे. पाळीच्या दिवशी सलग शूट करायचे असो किंवा सुट्टी असल्याने बिछान्यात पडून आराम करायचा असो, माझ्यासाठी उपयुक्त ठरेल असे सर्वोत्तम उत्पादन मला हवे आहे. व्हिस्पर अल्ट्रा हे केवळ एक पॅड नाही. कर्व्हवेअर तंत्रज्ञानामुळे या पॅडच्या मध्यभागी वेगळा उंचवटा आहे, त्यामुळे मला गळतीची चिंता नाही किंवा अवघडल्यासारखे वाटणार नाही.
व्हिस्पर हा भारतातील आघाडीच्या फेमिनाइन हायजिन ब्रॅण्ड मासिक पाळीतील सुरक्षेची व्याख्या नव्याने करण्यासाठी आपले नवीनतम उत्पादन-व्हिस्पर अल्ट्रा अपटू नो गॅप नो लीक्स- घेऊन आला आहे. जगातील पहिल्या कर्व्हवेअर तंत्रज्ञानाने युक्त असलेले हे पॅड स्त्रीच्या शरीराच्या रुपरेखांमध्ये अत्यंत चपखलपणे बसेल अशा पद्धतीने डिझाइन करण्यात आले आहे. त्यामुळे ते लावले असता कुठेच अंतर पडणार नाही, गळती होणार नाही आणि एक मऊ, आरामदायी भावना दिवसभर राहील. व्हिस्पर अल्ट्रा तुम्ही कोठेही गेलात तरी अप्रतिम दर्जाची सुरक्षा पुरवतात, तसेच त्या दिवसांतील प्रत्येक क्षणाला आत्मविश्वासाने सामोरे जाण्याची शक्ती स्त्रीला देतात.
व्हिस्पर अल्ट्रासाठी ब्रॅण्ड अॅम्बेसेडर म्हणूनही तिच्या नावाची घोषणा करण्यात आली असून लाँचिंगच्या कार्यक्रमात अनन्या पांडेचा एक प्रभावी व्हिडिओही प्रदर्शित करण्यात आला. यामध्ये ती पाळीतील आव्हानांबाबत मोकळेपणाने चर्चा करते आणि त्यावरील खरा उपाय म्हणून व्हिस्पर अल्ट्रा सर्वांपुढे ठेवते. ‘रिअल पिरियड, रिअल सोल्यूशन्स’ हे ब्रॅण्डचे घोषवाक्य अभियानाद्वारे जिवंत करण्यात आले आहे, स्त्रिया नेमक्या कशातून जातात, त्यांना पाळीच्या दिवसात नेमके काय होते आणि त्यासाठी कोणते उपाय केले जाऊ शकतात हे समजून घेण्यासाठी एक प्रामाणिक व प्रभावी गोष्ट यात सांगितलेली आहे.
लिंक – https://youtu.be/yW0xkq9mzis
यावेळी बोलताना प्रॉक्टर अँड गॅम्बल इंडियाच्या फेमिनाइन केअर विभागाचे कॅटेगरी हेड व उपाध्यक्ष गिरीश कल्याणरामन म्हणाले, “व्हिस्परमध्ये नवोन्मेषामागील हेतू हा स्त्रियांच्या खऱ्या गरजा खऱ्या अर्थाने ओळखणे व त्याचे समर्थन करणे तसेच त्यांना जाणवत असलेल्या दैनंदिन आव्हानांवर मात करण्यासाठी उपाय करणे हे असते. व्हिस्पर अल्ट्रा अपटू नो गॅप नो लीक्स हे केवळ पॅड नाही; स्त्रियांना दर महिन्याला जाणवणाऱ्या गळती, अवघडलेपणा व सुरक्षेची सतत वाटणारी काळजी या पाळीच्या खऱ्याखुऱ्या समस्यांना दिलेला हा प्रतिसाद आहे. याचे डिझायनिंग स्त्रियांनी स्त्रियांसाठी केले आहे, आपली वैफल्ये आणि गरजा यांबाबत मोकळेपणा सांगणाऱ्या भारतभरातील स्त्रियांकडून मिळालेली वास्तव माहिती, त्यांच्याशी झालेले संभाषण यांमधून हे शक्य झाले आहे.