*व्ह्यूसॉनिकने अत्याधुनिक मॉनिटर्सची व्यापक श्रृंखला सादर केली*
*मुंबई, १३ डिसेंबर २०२४:* व्हिज्युअल सोल्यूशन्समधील जागतिक अग्रेसर कंपनी व्ह्यूसॉनिकने भारतातील कलरप्रो ॲवॉर्ड्स २०२४ एक्झिबिशन: मोमेंटम कार्यक्रमात आज आपल्या अत्याधुनिक मॉनिटर्सच्या श्रृंखलेचे अनावरण केले. ही नव्या श्रेणीतील उत्पादने अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि अनन्यसाधारण कामगिरीने सुसज्ज असून ती खासकरून व्यावसायिक, आधुनिक कार्यस्थळे आणि गेमर्ससाठी तयार करण्यात आलेली आहेत. त्यातील मुख्य वैशिष्ट्यांत एक एआय मॉनिटर, अतिवेगवान गेमिंग मॉनिटर्स आणि एक ५के डिस्प्ले मॉनिटरचा समावेश आहे. क्रिएटर्स, विशेषत्वाने मॅक युजर्ससाठी त्यात स्वयंचलित कलर कॅलिबरेशन देण्यात आले आहे. हे सर्व मॉनिटर्स अप्रतिम दृश्य गुणवत्ता आणि उत्पादकता वाढवण्यासाठी तयार करण्यात आलेले आहेत. अत्याधुनिक मॉनिटर्सच्या श्रेणीत व्हीजी२७४८ए-२के, व्हीपी२७८८-५के, व्हीपी२७७६टी-४के आणि व्हीपी३२७६टी-४के थंडरबोल्ट™ ४, व्हीपी३२८५-४के-ओएलइडी, एक्सजी३२५डी-४के-ओएलइडी आणि एक्सजी२७३७ आदी उत्पादने सादर करण्यात आली आहेत.
*व्ह्यूसॉनिकमध्ये मॉनिटर बिझनेस युनिटचे महाव्यवस्थापक ऑस्कर लिन* म्हणाले की, “आम्ही आमच्या नवीन मॉनिटर्सची श्रृंखला सादर करण्यासाठी खूप उत्सुक आहोत, जी नवकल्पना आणि वापरकर्ता केंद्रीत डिझाइनसाठी आमची अढळ वचनबद्धता दर्शवते. आजच्या युगातील कार्यस्थळांसाठी इंटेलिजेंट सेन्सिंगयुक्त एआय मॉनिटरपासून ते विद्युतगती गेमिंग डिस्प्लेज; आणि सृजनशील व्यावसायिकांसाठी अत्याधुनिक सोल्यूशन्सपर्यंत, आमची ही नवीन श्रेणी आजच्या वापरकर्त्यांच्या विविध गरजांची पूर्तता करण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे. एआय आणि थंडरबोल्ट™ ४ सारखे अत्याधुनिक तंत्रज्ञानांची सांगड घालून आम्ही वापरकर्त्यांचा अनुभव, उत्पादकता आणि सृजनशीलतेला नव्या उंचीवर नेणे कायम ठेवणार आहोत.”
*व्ह्यूसॉनिकमध्ये आयटी डिव्हिजनमधील विक्री आणि मार्केटिंगचे संचालक संजॉय भट्टाचार्य* म्हणाले की, “जागतिक स्तरावरील पाचव्या वर्षातील माइलस्टोनचा भाग म्हणून भारतातील कलरप्रो पुरस्कारांचे पहिलेवाहिले स्थानिक प्रदर्शन आयोजित करताना आम्हाला आनंद होत आहे. आम्हाला भारतीय प्रेक्षकांच्या जवळ आणण्यासाठी हा सृजनशीलता आणि नवकल्पनांचा सोहळा आमच्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे. आम्ही मॉनिटर्सची जी व्यापक मालिका सादर करत आहोत ती सृजनशीलता, व्यवसाय आणि गेमिंगच्या क्षेत्रांतील भारतीय वापरकर्त्यांच्या विशिष्ट गरजा पूर्ण करण्यासाठी तयार करण्यात आली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालून आम्ही उत्पादकता आणि वापरकर्त्यांचा अनुभव वृद्धिंगत करणारे सोल्यूशनची निर्मिती करण्यासाठी वचनबद्ध आहोत.”
*व्हीजी२७४८ए-२के: इंटेलिजन्स सेन्सिंग तंत्रज्ञानासह एआय मॉनिटर:*
हे अत्याधुनिक एआय मॉनिटर वापरकर्त्याचा आराम, गोपनीयता आणि टिकाऊपणाला प्राधान्य देत कार्यस्थळी नवक्रांती आणण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहेत. ॲम्बिएंट लाइट सेन्सरने सुसज्ज हे मॉनिटर उपकरणाकडे पाहण्याचा अनुभव आरामदायी करण्यासाठी स्क्रीनची ब्राइटनेस आणि बॅकलाइट सेटिंग्ज आपोआप अनुकूलित करतात. दीर्घ काळापर्यंत काम करत असताना पोस्चर चेक, ब्रेक रिमाइंडर आणि फोकस्ड अटेन्शन मोडसारखी वैशिष्ट्ये एर्गोनोमिक सपोर्ट, एकाग्रता आणि तुमचे आरोग्य उत्तम राखण्याची खात्री देतात. गोपनीयतेसाठी मॉनिटरमध्ये प्रायव्हसी अलर्ट आणि ऑटो-डिमरसारख्या सुविधा देण्यात आल्या आहेत. त्या व्हिज्युअल हॅकिंगला प्रतिबंध घालून तुमची संवेदनशील माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी मदत करतात. इतकेच नव्हे तर, हा मॉनिटर आपल्या पॉवर-सेव्हिंग मोड, एनर्जी स्टार आणि ईपीईएटी प्रमाणपत्रे तसेच पर्यावरण सुसंगत पॅकेजिंगच्या माध्यमातून टिकाऊपणाला प्रोत्साहन देतो.
*व्हीपी२७८८-५के : खासकरून मॅक युजर्ससाठी 5K मॉनिटर:*
व्हीपी२७८८-५के मॉनिटरला खासकरून मॅक वापरकर्त्यांसाठी तयार करण्यात आले आहे. तो आपले अद्ययावत हार्डवेअर आणि स्व-विकसित सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ॲपल इकोसिस्टिमसोबत अगदी सुलभपणे एकरूप होऊन एक अद्वितीय दृश्य आणि व्यावसायिक अनुभव मिळवून देतो. २१८ पीपीआयवर चित्तथरारक ५के रिझोल्यूशन आणि ९९ % डीसीआय-पी३ सोबत हा मॉनिटर चमकदार आणि सुसंगत रंग सुनिश्चित करतो. ते ॲपलच्या दृश्य मानदंडांसोबत पूर्णपणे अनुकूल होतात. त्याची थंडरबोल्ट™ ४ कनेक्टिव्हिटी बाह्य उपकरणांसोबत सहजसुलभ एकरूप होते. दुसरीकडे, अद्वितीय ५के डेझी-चेनिंग क्षमता मल्टिटास्किंग क्षमतेचे विस्तारीकरण करते.
*व्हीपी२७७६टी-४के आणि व्हीपी३२७६टी-४के थंडरबोल्ट™ ४ मॉनिटर्स:*
व्हीपी२७७६टी-४के आणि व्हीपी३२७६टी-४के थंडरबोल्ट™ 4 मॉनिटर्स कनेक्टिव्हिटी आणि कार्यक्षमतेसाठी नवीन मापदंड प्रस्थापित करतात, जे सृजनशील कलाकार आणि व्यावसायिक अशा दोघांसाठीही डिझाइन करण्यात आलेले आहेत. दुहेरी थंडरबोल्ट ™ ४ पोर्ट्स जे ४० जीबीपीएस अशी अत्यंत वेगवान स्पीड देतात. यामुळे विद्युतवेगाने डेटा ट्रान्स्फर होतो. डेझी चेनच्या माध्यमातून ड्युअल ४के डिस्प्ले मिळतो अन् कामही सुव्यवस्थितरीत्या मार्गी लागतो. ही सर्व किमया फक्त एकाच केबलच्या माध्यमातून घडून येते, हे विशेष. या मॉनिटरमध्ये कनेक्टिव्हिटीची एक सर्वसमावेशक मालिका देण्यात आली आहे. त्यात ड्यूअल एचडीएमआय २.१, यूएसबी-सी, डिस्प्लेपोर्ट १.४, आणि ईथरनेट यांचा समावेश आहे. हे मॉनिटर कोणत्याही सेटअपमध्ये अखंडितपणे डॉकिंग इंटिग्रेशन प्रदान करतात. अद्भूत ४के युएचडी रिझोल्यूशन, डेल्टा इ <२ रंग अचूकता आणि ९८% डीसीआय-पी३ तसेच १००% एसआरजीबी रंग गॅमट अशा वैशिष्ट्यांसोबत हे मॉनिटर्स व्यावसायिकांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी चमकदार, जिवंत व्हिज्युअल पुरवतात.
*व्हीपी३२८५-४के-ओएलइडी : क्रिएटर्ससाठी अतुलनीय अचूकता आणि परफॉर्मन्सची शक्ती:*
व्हीपी३२८५-४के-ओएलइडी अत्याधुनिक ओएलइडी तंत्रज्ञानयुक्त व्यावसायिक डिस्प्लेसाठी मानकांची उंची वाढवतो. तसेच अद्वितीय दृश्य सुस्पष्टतेसाठी प्रत्यक्ष गडद काळा रंग आणि १.०७ बिलियनपेक्षा अधिक रंगांची (true 10-bit) सुविधा प्रदान करतो. इंटेलिजेंट सेन्सर सूटच्या माध्यमातून संवर्धित – ज्यात ॲम्बिएंट लाइट, ह्युमन पोझिशन आणि हावभाव नियंत्रण यांचाही समावेश आहे. हा मॉनिटर वापरकर्त्याला एक सहज अन् सर्वसमावेशक अनुभव मिळवून देतो. हा मॉनिटर सृजनशील व्यावसायिकांसाठी डिझाइन करण्यात आलेला आहे. तो ९८ % डीसीआय-पी३ आणि १०० एसआरजीबी कलर कव्हरेज, पॅनटोन व्हॅलिडेशन आणि अचूक अन् अखंडित कलर ॲक्युरसीसाठी डेल्टा इ < २ ने सुसज्जित आहे. कनेक्टिव्हिटीचे बहुविध पर्याय आणि डेझी-चेनिंग कार्यक्षमतेसह व्हीपी३२८५-४के-ओएलइडी कामाचा व्याप सहज करतो. परिणामी तो अखंडित उत्पादकता आणि सृजनशीलतेसाठी एक अत्यावश्यक उपकरण ठरतो.
*नव्या पातळीवरील गेमिंग मॉनिटर्स : एक्सजी३२५डी-४के-ओएलइडी आणि एक्सजी२७३७:*
प्रतिस्पर्धकांवर कायमच आघाडी मिळवण्याची महत्त्वाकांक्षा असलेल्या गेमर्ससाठी व्ह्यूसॉनिकने एक्सजी३२५डी-४के-ओएलइडी आणि एक्सजी२७३७ मॉनिटर सादर केले आहेत. एक्सजी३२५डी-४के-ओएलइडी हा ३२ इंचांचा ४के युचडी ओएलईडी डिस्प्लेयुक्त मॉनिटर असून त्यात ड्युअल मोड फीचर आहे. त्या माध्यमातून वापरकर्त्यांना ४के एटी २४०हर्ट्झ किंवा एफएचडी ४८० २४०हर्ट्झ मध्ये स्विच करताना कुठलीही अडचण येत नाही. या मॉनिटरमध्ये एएमडी फ्रीसिंक प्रीमियम प्रो या वैशिष्ट्याचाही समावेश आहे. त्यात कुठलाही अडथळा न येता सहजपणे गेमप्ले करता येतो, तोही ०.०३ एमएस जीटीजी इतक्या अद्भूत रिस्पॉन्स टाइममध्ये.
एक्सजी२७३७ हा एक 27 इंचांचा एफएचडी आयपीएस मॉनिटर असून त्यात तब्बल ५२०हर्ट्झ चा रिफ्रेश रेट आणि १एमएस एमपीआरटी रिस्पॉन्स टाइम आहे. तो वेगवान स्पर्धात्मक गेमिंगसाठी अत्यंत परिपूर्ण आहे. तुमचा गेमिंगचा अनुभव अधिक उत्तम करण्यासाठी हे दोन्ही मॉनिटर्स अत्याधुनिक फीचर्सने सुसज्जित करण्यात आले आहेत. त्यात मल्टिपल कनेक्टिव्हिटीचा पर्याय आणि इमर्सिव्ह ऑडिओसाठी बिल्ट-इन स्पीकर्सदेखील देण्यात आले आहेत. व्ह्यूसॉनिक २०२५ च्या पहिल्या सहामाहीत आपल्या अद्ययावत मॉनिटर्सची मालिका सादर करण्यासाठी सज्ज झाली आहे. नवकल्पना आणि सर्वोच्च व्हिज्युअल गुणवत्तेसाठी लक्ष्य केंद्रीत करत हे मॉनिटर्स व्यावसायिक आणि गेमर्स अशा दोन्हींच्या वाढत जाणाऱ्या गरजा पूर्ण करण्यासाठी डिझाइन केलेले आहेत. यामुळे त्यांचा दृक अनुभव नव्या ऊंचीवर पोहोचेल, यात शंकाच नाही.