पर्नोड रिकार्ड इंडियाकडून ग्रामीण परिवर्तनाला चालना
~ दरवर्षी १०,००० पेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या जीवनावर प्रभाव
मुंबई, १० डिसेंबर २०२४: पर्नोड रिकार्ड इंडिया (पीआरआय) शाश्वत कृषी आणि समुदाय सक्षमतेमधील कायापालट करणाऱ्या उपक्रमांसह ग्रामीण विकासाला हातभार लावत आहे. पीआरआयचे वॉल (पाणी, कृषी, उपजीविका) वरील सीएसआर प्रोग्राम दरवर्षी १०,००० पेक्षा जास्त शेतकऱ्यांसह काम करून कृषी क्षेत्रात सक्षमीकरण, नाविण्यता, सर्वसमावेशक धोरणाचा पुरस्कार करत आहेत.
वॉलचा मुख्य फोकस समुदायांना वर्षभर पाणी उपलब्ध करून देण्यावर (२०१९ पासून २३५५ प्रकल्पांद्वारे ४४८४ दशलक्ष लीटर भूजल पुनर्भरण क्षमता उत्पन्न केली) आणि त्याद्वारे सुधारित उत्पादनासाठी, दुष्काळात तग धरून राहण्यासाठी, संसाधनाचा पुरेपूर उपयोग करण्यासाठी आणि एक स्थानिक मूल्य साखळी तयार करण्यासाठी सूक्ष्म सिंचनाचा प्रचार करण्यावर आहे. आत्तापर्यंत याच्यामुळे कृषी उत्पन्न यशस्वीपणे २०% ने वाढले आहे आणि उत्पादन खर्च २२%ने कमी झाला आहे.
महाराष्ट्र, राजस्थान, मध्यप्रदेश, पंजाब आणि उत्तर प्रदेश या ५ राज्यांतील ८ शेती उत्पादक संघटनांच्या माध्यमातून पीआरआयचा एकत्रित यशावर असलेला फोकस स्पष्ट दिसून येतो. या संघटना १५० खेड्यांमधील ४००० पेक्षा जास्त शेतकऱ्यांची उपजीविका वाढवत आहेत. लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली या एफपीओ शेतकऱ्यांमधील परस्पर सहयोग मजबूत करतात, त्यांना शास्त्रीय ज्ञान देतात आणि उत्पादन माहिती, आर्थिक साहाय्य आणि व्यावसायिक बुद्धिमत्ता यांसाठी लागणारी महत्त्वाची संसाधने उपलब्ध करून देतात.
महिला सशक्तीकरण हा पीआरआयच्या समावेशक विकास उपक्रमांमधील एक महत्त्वाचा घटक आहे. आपल्या ५६ महिला उत्पादक समूहांद्वारे पीआरआय महिलांमध्ये उद्योजकीय नेतृत्वाला चालना देत आहे. नाशिकमध्ये महिलांच्या नेतृत्त्वाखाली सूक्ष्म उद्योगांची भरभराट झाली आहे. ३ गावांमध्ये ७ एसएचजी आणि ६० महिला मिळून टोमॅटो पॉलीटनल्स, पिठाच्या गिरण्या आणि शेवई मशीन्ससारखे नावीन्यपूर्ण प्रकल्प चालवत आहेत. कानपूरमध्ये पापड बनवण्यातील आणि बहरोर येथे मोहरी तेल उत्पादनातील पीआरआय उपक्रमांमुळे पारंपरिक कौशल्यांचे भरभराटीच्या आणि शाश्वत उद्योगात रूपांतर झाले आहे. एफपीओ संचालक मंडळात ५०% महिला आहेत तसेच त्यांच्या ३५% भागधारक देखील महिला आहेत. अशाप्रकारे पीआरआयचे उपक्रम ग्रामीण अर्थव्यवस्थेत लैंगिक समानतेचा आदर्श घालून देत आहेत.
इंटिग्रेटेड ऑपरेशन्स अँड एसअँडआरचे वरिष्ठ उपाध्यक्ष गगनदीप सेठी म्हणाले, “पर्नोड रिकार्ड इंडियामध्ये आमच्या एसअँडआर उपक्रमांच्या मागची प्रेरणा आहे “गुड टाइम्स फ्रॉम अ गुड प्लेस” हे तत्त्वज्ञान. वॉल उपक्रम हा आमच्या सगळ्या शाश्वततेच्या प्रयत्नांमध्ये आघाडीवर आहे. समुदायांना जल सुरक्षा, नावीन्यपूर्ण पद्धती आणि लक्षणीय प्रभाव यांच्याद्वारे सक्षम बनवून शाश्वत कृषीबाबतची आमची वचनबद्धता या उपक्रमातून दिसते. आयओटी टेक्नॉलॉजी आणि एआय-चलित अॅनालिटिक्सच्या माध्यमातून पीआरआय डेटा-आधारित अंतर्दृष्टीसह चिरस्थायी प्रभाव पाडत आहे. डेटा-आधारित अंतर्दृष्टी शेतकऱ्यांना संसाधनांचे अनुकूलन करण्यासाठी तसेच अचूकतेसह शाश्वत माहितीचा मागोवा घेण्यास सक्षम करते.”