Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

सेक्राइटद्वारे इंडिया सायबर थ्रेट रिपोर्ट २०२५ चे अनावरण

 सेक्राइटद्वारे इंडिया सायबर थ्रेट रिपोर्ट २०२५ चे अनावरण


मुंबई, ८ डिसेंबर २०२४: जागतिक स्तरावर सायबरसुरक्षेच्या उपाययोजना पुरविणारी कंपनी क्विक हिल टेक्नोलॉजीज लिमिटेडची उद्योजकीय शाखा सेक्राइटने सिक्युरिटी काउन्सिल ऑफ इंडियाच्या सहयोगाने इंडिया सायबर थ्रेट रिपोर्ट २०२५ चे अनावरण केले. हा अहवाल भारताच्या सायबरसुरक्षेच्या विद्यमान परिस्थितीचे सखोल विश्लेषण करणारा आहे, ज्यातून धोक्याची घंटा वाजविणारी आकडेवारी व कल सामोरे आले आहेत.



भारतातील ८.४४ दशलक्षांच्या इन्स्टॉलेशन बेसमधून ३६९ दशलक्ष इतक्या प्रचंड संख्येने मालवेअर्स डिटेक्शन्स झाल्याचे या अभ्यासामधून दिसून आले, ज्यातून देशासमोर असलेल्या सायबर धोक्यांची व्याप्ती आणि तीव्रता अधोरेखित झाली. उल्लेखनीय बाब म्हणजे ८५.४४ टक्‍के डिटेक्शन्स ही सिग्नेचर-बेस्ड पद्धतींच्या आधारे करण्यात आली, तर १४.५६ टक्‍के मालवेअर्स ही बिहेविअर-बेस्ड पद्धतींच्या आधारे शोधण्यात आली. यातून नव्या बदलांना सामावून घेणाऱ्या सुरक्षा उपाययोजनांची गरज अधोरेखित झाली.


या अहवालामध्ये मालवेअर्सचे काही उपगटांमध्ये वर्गीकरण करण्यात आले आहे, ज्यामध्ये ट्रोजन्सचे प्रमाण सर्वाधिक ४३.३८ टक्‍के इतके दिसून आले आहे, त्याखालोखाल इन्फेक्टर्स गटातील मालवेअर्सचे प्रमाण ३४.२३ टक्‍के इतके दिसून आले आहे. अँड्रॉइड प्रणालीमध्ये सापडलेल्या धोक्यांच्या प्रकारांमध्ये विविध धोक्यांचे चिंताजनक प्रमाण आढळून आले आहे, जिथे एकूण डिटेक्शन्समध्ये मालवेअर्सचे प्रमाण ४२ टक्‍के इतके आहे, त्याखालोखाल सर्वाधिक संख्येने आढळून येणारा धोका पोटेन्शियली अनवॉन्टेड प्रोग्राम्सपासून असल्याचे दिसून आले आहे. अशा धोक्यांचे प्रमाण ३२ टक्‍के होते. अँड्रॉइड उपकरणामध्ये सापडलेल्या धोक्यांतील २६ टक्‍के  भाग अॅडवेअरने व्यापल्याचे दिसले. याखेरीज हा अहवाल मालवेअर डिटेक्शन्सचे राज्यवार विश्लेषणही पुरवतो, ज्यात तेलंगणा, तामीळ नाडू आणि दिल्ली हे सर्वाधिक प्रभावित प्रांत असल्याचे विशेषत्वाने सूचित करण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर यात वेगवेगळ्या उद्योगक्षेत्रात कोणत्या प्रकारचे सायबरधोके अधिक प्रमाणात संभवतात यावरही प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. यात BFSI, आरोग्यसेवा आणि हॉस्पिटॅलिटी ही क्षेत्रे सायबरगुन्हेगारांकडून सर्वाधिक प्रमाणात लक्ष्य केली जात असल्याचे दिसून आले आहे.




क्विक हील टेक्नोलॉजीज लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल साळवी म्हणाले, “सेक्राइट मालवेअर अॅनालिसिस प्लॅटफॉर्म आणि सेक्राइट थ्रेट इंटेल सोल्यूशनच्या जोडीने केलेले ‘इंडिया सायबर थ्रेट रिपोर्ट २०२५’चे अनावरण हे भारतीय व्यावसायिक संस्थांसमोर असलेल्या सायबरसुरक्षेच्या नवनव्या स्वरूपाच्या आव्हानांना हाताळण्यासाठी आम्ही अंगिकारलेल्या सर्वसमावेशक दृष्टिकोनाचे प्रतीक आहे. या उपायययोजना केवळ धोक्यांना प्रतिसाद देण्यासाठी नव्हे तर त्यांची संभाव्यता ओळखण्यासाठीही आहेत. आमचा थ्रेट रिपोर्ट महत्त्वाची अंतर्गत माहिती व कृतीत उतरविण्याजोग्या शिफारशी देऊ करतो, एसएमएपी सुरक्षा व्यावसायिकांना प्रगत विश्लेषण क्षमता पुरवून त्यांना सक्षम बनविते तर सेक्राइट थ्रेट इंटेल रिअल-टाइम सुरक्षा यंत्रणा पुरवेल. सायबरसुरक्षेच्या क्षेत्रात सर्वोत्कृष्टता साध्य करण्याप्रती अखंडपणे जपलेल्या बांधिलकीसाठी व या परिसंस्थेला नवा आकार देण्यासाठीच्या प्रयत्नांसाठी मी डीएससीआय व लॅब्जमध्ये कार्यरत असलेल्या या विषयाला वाहून घेतलेल्या तज्ज्ञांचे मनापासून आभार मानतो. या प्रयत्नांमधून आमचे क्लाएन्ट्स डिजिटल सुरक्षासाधनांच्या स्पर्धेमध्ये सदैव एक पाऊल पुढे राहतील याची हमी मिळते, ज्यामुळे भारताचे सायबरसुरक्षा विश्व ही विद्यमान व भावी धोक्यांपासून संरक्षण देणारी भक्कम प्रणाली उभी राहिली आहे.”

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.