Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

ईव्ही वित्तपुरवठ्यासाठी जेएसडब्ल्यू एमजी मोटर इंडियाची कोटक महिंद्रा प्राइमसोबत भागीदारी

 ईव्ही वित्तपुरवठ्यासाठी जेएसडब्ल्यू एमजी मोटर इंडियाची कोटक महिंद्रा प्राइमसोबत भागीदारी

 

  • कोटक महिंद्रा प्राइम लिमिटेड (केएमपीएलही पहिल्या आघाडीच्या ऑटो वित्तपुरवठादार कंपन्यांपैकी एक आहे, जिने ईव्ही ग्राहकांसाठी जेएसडब्ल्यू एमजी इंडियाच्या बास मालकी उपक्रमाला पाठिंबा दर्शवला आहे
  • केएमपीएलच्या व्यापक नेटवर्कमुळे ईव्ही ग्राहकांमध्ये बासचा स्वीकार केला जाईल

 

१३ जानेवारी २०२५जेएसडब्ल्यू एमजी मोटर इंडियाने आज केएमपीएलसोबत भागीदारीची घोषणा केली असून त्यातून ईव्ही ग्राहकांना आपल्या नावीन्यपूर्ण बॅटरी-एज-सर्व्हिस (बासमालकी उपक्रमासाठी आर्थिक उपाययोजना दिली जाईलया भागीदारीमार्फत बासच्या संकल्पनेला पाठिंबा देणारी केएमपीएल पहिली आघाडीची ऑटो फायनान्सर ठरली असून संभाव्य ग्राहकांपर्यंत तिची पोहोच वाढवण्यासाठी मदत होईल.

 


बास हा एक लविचक मालकी उपक्रम आहेज्यामुळे प्रारंभीचा खरेदी खर्च खूप कमी होतो आणि वाजवी दरातील विनाअडथळा मालकी अनुभव मिळतोबासची स्थापना सप्टेंबर २०२४ मध्ये झाली आणि त्यांनी ग्राहकांमध्‍ये पुन्हा एकदा ईव्हीबाबत आवड निर्माण केली आहेत्यामुळे ईव्हीच्या विक्रीत वाढ झाली आहेया आगळ्यावेगळ्या मालकी मॉडेलमध्ये ग्राहकांचे स्वारस्य वाढत असल्यामुळे केएमपीएल बासच्या श्रेणीत पोहोचली आहे आणि तिला ईव्ही ग्राहकांसाठी आर्थिक उपाययोजना तयार करणे शक्य झाले आहे.

 

या निमित्ताने बोलताना जेएसडब्ल्यू एमजी मोटर इंडियाचे चीफ ग्रोथ ऑफिसर गौरव गुप्ता म्हणाले की, आमचा नावीन्यपूर्णतेचा ध्यास कायम आहे आणि आम्ही ग्राहकांचा आनंद वाढवणारे अनुभव निर्माण करण्यासाठी वचनबद्ध आहोतबासमार्फत आम्ही बाजारात एक नवीन गोष्ट आणली आहे आणि इलेक्ट्रिक वाहन उद्योगात एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहेईव्हीचा अंगीकार वाढवण्यासाठी ती विविध वित्तीय भागीदारांमार्फत जास्तीत-जास्त पोहोचवणे हे आमचे प्राधान्य आहेमी केएमपीएल टीमचे स्वागत करतो आणि बास संकल्पना ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी भागीदारी केल्याबद्दल आभार मानतोकेएमपीएलचे व्यापक नेटवर्क आणि डीलर भागीदारांसोबतचा संपर्क हा नक्कीच खास बास संकल्पना जास्तीत-जास्त पोहोचवण्यासाठी  ईव्ही विक्री वाढवण्यासाठी महत्त्वाचा ठरेल.” 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.