Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

किया इंडियाने भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पोमध्ये नवीन ईव्ही६ सादर केली

 किया इंडियाने भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पोमध्ये नवीन ईव्ही६ सादर केली

मुंबई, १९ जानेवारी २०२५: किया इंडिया या आघाडीच्या मास प्रीमियम कार उत्पादक कंपनीने भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो २०२५ मधून नवीन ईव्ही६ सर्वांपुढे आणली. नवीन किया ईव्ही६ साठी बुकिंग्ज आजपासून खुली होत असल्याचेही जाहीर करून किया इंडियाने ब्रॅण्डच्या इलेक्ट्रिक वाहन प्रवासामधील आणखी एक महत्त्वाचा टप्पा पार केला.


नवीन किया ईव्ही६ सुरक्षिततेबाबत सातत्याने नवीन मापदंड स्थापन करत आहे, ही कार एडीएएस २.० पॅकेजने सुसज्ज आहे. या पॅकेजमध्ये २७ अतिप्रगत सुरक्षितता व ड्रायव्हर सहाय्य सुविधा आहेत. यापूर्वीच्या ईव्ही6च्या तुलनेत पाच अतिरिक्त एडीएएस २.० सुविधांची भर या कारमध्ये घालण्यात आली आहे. या सुविधा पुढीलप्रमाणे: फ्रण्ट कोलिजन्स अव्हॉयडन्स असिस्ट (एफसीए)- शहर/पादचारी/सायकलस्वार/जंक्शन टर्निंग; फॉरवर्ड कोलिजन अव्हॉयडन्स (एफसीए)- जंक्शन क्रॉसिंग; फॉरवर्ड कोलिजन अव्हॉयडन्स- लेन असिस्ट चेंज (एफसीए) – ऑनकमिंग अँड साइड; फॉरवर्ड कोलिजन अव्हॉयडन्स असिस्ट (एफसीए)- इव्हेजिव स्टीअरिंग आणि लेन फॉलो असिस्ट (एलएफए). या सर्व सुविधा आमच्या ईव्ही9 या फ्लॅगशिप मॉडेलमधील अत्याधुनिक तंत्रज्ञानातून विकसित करण्यात आल्या आहेत. यामध्ये दोन वाहनांमधील धडक टाळण्यासाठी आवश्यक सुरक्षितता सुविधांमध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत तसेच वाहनाची बांधणी अधिक पक्की करण्यात आली आहे. गाडीत बसलेल्यांच्या सुरक्षिततेची व्यवस्थाही सुधारण्यात आली आहे. वाढीव शक्ती आणि सुधारित एडीएएस पॅकेज यांमुळे तुम्ही ही कार अधिक आत्मविश्वासाने चालवू शकता. ईव्हीसिक्सचे डिझाइन अपघातांपासून वाचवण्याच्या दृष्टीनेच करण्यात आले आहे.


किया इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. ग्वांगु ली म्हणाले, "वाहन उद्योगातील सकारात्मक बदलाला चालना देण्यासाठी किया इंडिया वचनबद्ध आहे. ईव्ही६ प्रथम रस्त्यावर धावू लागल्यापासून, तिचे व्यापक स्तरावर कौतुक होत आहे, तिची लोकप्रियता वाढत आहे आणि जागतिक स्तरावरील लौकिकही अधिक दृढ होत आहे. आज नवीन ईव्ही6 सर्वांपुढे आणतानाही ही कार आपल्या नवीनतम हाय-टेक नवोन्मेषाच्या जोरावर इलेक्ट्रिक वाहतुकीच्या मानकांची व्याख्या नव्याने करेल अशी खात्री आम्हाला वाटत आहे.” 



श्री. ली पुढे म्हणाले, “भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो २०२५ मधील आमच्या सहभागातून आमची बांधिलकी अधोरेखित होते. या प्रदर्शनादरम्यान आमच्या नवीन ईव्हीसिक्सचे अनावरण करणे आमच्यासाठी अभिमानास्पद आहे. कार्बनमुक्तीच्या दिशेने चाललेल्या आमच्या प्रवासातील हे महत्त्वाचे पाऊल आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने जागरूक, अत्याधुनिक तंत्रज्ञान भारतीय ग्राहकांना देऊ करण्याच्या दिशेने आम्ही मोठी झेप घेत आहोत.”


नवीन किया ईव्ही६: शक्ती, कामगिरी व नवोन्मेषासह इलेक्ट्रिक वाहनांतील आरामाची नवीन व्याख्या

कियाची नवीन ईव्ही6 म्हणजे इलेक्ट्रिक वाहनांच्या क्षेत्रातील मोठी भरारी आहे. ही कार पूर्वीच्या गाड्यांहून अधिक शैलीदार, शक्तिशाली व तंत्रज्ञानाच्या दृष्टीने सक्षम आहे. कियाच्या पहिल्यावहिल्या समर्पित ईव्हीची ताजी आवृत्ती म्हणून ही कार महत्त्वाचे अपग्रेड्स देऊ करते. त्यामुळे बाजारपेठेतील सर्वांत प्रगत इलेक्ट्रिक वाहनांपैकी एक म्हणून असलेले ईव्ही6चे स्थान अधिक भक्कम झाले आहे.

रचना किंवा डिझाइनबाबत सांगायचे तर, कियाच्या वैशिष्ट्यपूर्ण ‘ऑपोझिट्स युनायडेट’ डिझाइन भाषेनुसार, या मॉडेमधील पुढील भाग अधिक दणकट व आक्रमक आहे. कनेक्टेड डीआरएल्ससह नवीन खास स्टार मॅप लायटिंग, फ्रण्ट जीटी-लाइन स्टायलिंग बम्पर, ग्लॉसी फिनिश असलेली  १९ इंची मिश्रधातूंची चाके आणि स्टार-मॅप एलईडी रीअर कॉम्बिनेशन लॅम्प्स आदी १५ सुधारणांसह, नवीन ईव्हीसिक्स अधिक दणकट, धारदार आणि या मालिकेतील पूर्वीच्या गाड्यांच्या तुलनेत अधिक गतीशील आहे. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.