Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

‘सायबर सुरक्षेसाठी सायबर शिक्षा' पुरस्कारांचे वितरण

 सायबर सुरक्षेसाठी सायबर शिक्षा' पुरस्कारांचे वितरण

मुंबई, १४ जानेवारी २०२४: क्विक हील फाऊंडेशन या क्विक हील टेक्‍नॉलॉजीज लिमिटेडच्‍या सीएसआर शाखेने ‘सायबर सुरक्षेसाठी सायबर शिक्षा' पुरस्काराच्या २०२५ आवृत्तीचे आयोजन केले. या प्रतिष्ठित कार्यक्रमात भारतभरात सायबर सुरक्षा व जागरूकतेला चालना देण्‍याप्रती समर्पित स्‍वयंसेवी संस्‍था, शिक्षक आणि विद्यार्थ्‍यांच्‍या अपवादात्‍मक योगदानांचा सन्‍मान करण्‍यात आला.

महाराष्‍ट्राचे राज्‍यपाल श्री. सी. पी. राधाकृष्‍णन, पुण्‍यश्‍लोक अहिल्‍यादेवी होळकर सोलापूर युनिव्‍हर्सिटीचे उप-कुलगुरू डॉ. प्रकाश महानवार, तसेच क्विक हील येथील ऑपरेशल एक्‍सलन्‍सच्‍या प्रमुख व क्विक हील फाऊंडेशनच्‍या अध्‍यक्ष श्रीमती अनुपमा काटकर यांनी उपस्थिती दाखवून या इव्हेन्टची शोभा वाढवली. तसेच, याप्रसंगी क्विक हीलची लीडरशीप टीम, जसे अध्‍यक्ष व व्‍यवस्‍थापकीय संचालक डॉ. कैलाश काटकर, संयुक्‍त व्‍यवस्‍थापकीय संचालक डॉ. संजय काटकर आणि मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्री. विशाल साळवी देखील उपस्थित होते. 




‘सायबर सुरक्षेसाठी सायबर शिक्षा' उपक्रम तरूणांना नेतृत्‍व, सादरीकरण व डिजिटल शिक्षणामधील आवश्‍यक कौशल्‍यांसह सक्षम करण्‍यावर लक्ष केंद्रित करतो, तसेच आत्‍मविश्‍वास निर्माण करण्‍यासाठी व्‍यासपीठ देतो. माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी प्रचारित केलेले ‘डिजिटल इंडिया' व ‘आत्‍मनिर्भर भारत' या उपक्रमांच्‍या दृष्टिकोनाशी संलग्‍न राहत हा उपक्रम वंचित समुदायांना आवश्‍यक सायबर सुरक्षा ज्ञान देतो. पथनाट्ये, कार्यशाळा व डिजिटल मोहिमा अशा नाविन्‍यपूर्ण आऊटरीच पद्धतींच्‍या माध्‍यमातून हा उपक्रम लाखो व्‍यक्‍तींपर्यंत पोहोचला आहे, १२० हून अधिक संस्‍थांसह सहयोग केला आहे, ४,६०० हून अधिक सायबर वॉरियर्सना प्रशिक्षण दिले आहे आणि शाळा व कॉलेजमधील ५५.९२ लाखांहून अधिक विद्यार्थ्‍यांमध्‍ये जनजागृती केली आहे.

यंदा, या पुरस्कारांमध्ये सायबर सुरक्षेला चालना देण्‍याप्रती अपवादात्‍मक नेतृत्‍व व कटिबद्धता दाखवलेले शिक्षक, क्‍लब अधिकारी आणि संस्‍थांच्‍या उल्‍लेखनीय योगदानांचा सन्‍मान करण्‍यात आला. या प्रयत्‍नांमधून तरूणांना परिवर्तनाचे उत्‍प्रेरक म्‍हणून सक्षम करण्‍याप्रती आणि सुरक्षित डिजिटल वातावरण निर्माण करण्‍याप्रती उपक्रमाची विद्यमान समर्पितता दिसून येते.

क्विक हील फाऊंडेशनच्या अध्‍यक्ष श्रीमती अनुपमा काटकर म्‍हणाल्‍या, “सायबर-सुरक्षित वातावरणाला चालना देण्‍याचा आमचा प्रवास अधिक प्रबळ होत आहे, जेथे तरूणांचे सक्षमीकरण व विकासाला प्राधान्‍य दिले जात आहे. आजच्‍या यशामधून आमच्‍या सहभागींची समर्पितता, स्थिरता व सर्जनशीलता दिसून येते, जे सायबर-सुरक्षित भारत घडवण्‍याप्रती कटिबद्ध आपल्‍या देशाचे भावी लीडर्स आहेत. मला सायबर सुरक्षेचा संदेश प्रसारित करण्‍यामध्‍ये विद्यार्थी, शिक्षक व संस्‍थांची अविरत कटिबद्धता पाहताना अत्‍यंत अभिमान आणि कृतज्ञता वाटत आहे. आम्‍ही या उपक्रमाला यशस्‍वी करण्‍यामध्‍ये सतत पाठिंबा देण्‍यासाठी राज्‍य प्रशासन, स्‍थानिक पोलीस आणि आमचे प्रतिष्ठित सहयोगी जसे महाराष्‍ट्र सायबर व उद्योग संस्‍थांचे मन:पूर्वक आभार व्‍यक्‍त करतो.'' 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.