Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

हाऊसिंग डॉटकॉमने घर खरेदीचा अनुभव अधिक आकर्षक बनवला

 हाऊसिंग डॉटकॉमने घर खरेदीचा अनुभव अधिक आकर्षक बनवला

~ नेक्स्ट-जेन थ्रीडी, एआर आणि व्हीआर इनोव्हेशन्ससह व्हिज्युअलाइझेशनला नवीन अर्थ दिला ~


मुंबई, २४ जानेवारी २०२५: हाऊसिंग डॉटकॉम या भारताच्या आघाडीच्या रियल इस्टेट अॅपने एक दशकापूर्वी थ्रीडी, ऑग्मेन्टेड रियालिटी (एआर) आणि व्हर्च्युअल रियालिटी (व्हीआर) टूल्स दाखल करून घर खरेदी करण्याच्या अनुभवात क्रांतीकारक बदल घडवून आणला होता. त्या आधारावर, हाऊसिंग डॉटकॉम ने आता त्याच टेक्नॉलॉजीचा नेक्स्ट-जनरेशन टप्पा लॉन्च केला आहे आणि घराचा शोध घेणाऱ्यांसाठी मालमत्तेचा शोध घेण्याचा अधिक आकर्षक आणि ऑटोमेटेड अनुभव प्रदान केला आहे. या प्रगतीमुळे प्रॉपटेक क्षेत्रातील हाऊसिंग डॉटकॉम चे अव्वल स्थान आणि रियल इस्टेटमध्ये इनोव्हेशन करण्याची त्यांची वचनबद्धता यांना बळकटी मिळाली आहे.


हाऊसिंग डॉटकॉमचे उत्पादन प्रमुख संगीत अग्रवाल म्हणतात, “ही व्हिज्युअलाइझेशन टूल्स आमच्या यूझर्सना एक अर्थपूर्ण अनुभव प्रदान करून मूल्यवर्धन करतात. ही आकर्षक आणि इंटरॅक्टिव्ह टूल्स प्रदान करून आम्ही ग्राहकांना मालमत्तेचा असा अनुभव देत आहोत की जणू ती वास्तू प्रत्यक्ष त्याच्यासमोर उभी असावी. यामुळे व्हर्च्युअल निरीक्षण करून ग्राहक प्रत्यक्ष निर्णय घेऊ शकतात. हाऊसिंग डॉटकॉम मध्ये आम्ही मशीन लर्निंग आणि आर्टिफिश्यल इंटेलिजन्सचा उपयोग करून आमचे संचालन आणि यूझरचा अनुभव या दोन्हीत सुधारणा करण्याबाबत वचनबद्ध आहोत. या तंत्रज्ञानाच्या अभिनव अंमलबजावणीचा निरंतर शोध घेऊन आम्ही फक्त आमची कार्यक्षमता सुधारत नाही, तर बाजारपेठेत त्याचा स्पर्धात्मक फायदा देखील मिळवत आहोत.”




डीजीएआर आणि डीजीटूर ही दोन मुख्य एआर आणि व्हीआर इनोव्हेशन्स या आकर्षक अनुभवात भर घालतात. डीजीएआर हे एक ऑग्मेन्टेड रियालिटी सोल्यूशन आहे, जे खरेदीदारांना विकासकाने कल्पिलेल्या मालमत्तेच्या डिझाईनचा संपूर्ण थ्रीडी प्रोटोटाइप दाखवते. वेबएआर मार्फत अॅक्सेसिबल असलेल्या डीजीएआरच्या मदतीने यूझर प्रत्यक्ष भूखंडावर डिजिटल मालमत्तेच्या प्रतिकृतीची कल्पना करू शकतो आणि यामुळे शोध अनुभवाला अत्यंत इंटरॅक्टिव्ह आणि जिवंत परिमाण मिळते. याला आणखी पुढची पायरी गाठत व्हीआरमधील डीजीटूर हे पोझ ट्रॅकिंग आणि नियर-आय थ्रीडी डिस्प्लेजचा उपयोग करून मालमत्तेत व्हर्च्युअल फेरफटका मारण्याचा एक अत्यंत आकर्षक अनुभव प्रदान करते आणि मालमत्तेत प्रत्यक्ष उपस्थित न राहता खरेदीदार ती मालमत्ता बारकाईने पाहू शकतो. दूर राहणाऱ्या ग्राहकांना, कोणताही निर्णय घेण्याअगोदर मालमत्ता व्यवस्थित बघता यावी यासाठी हे व्हीआर सोल्यूशन विशेष उपयुक्त आहे.


हाऊसिंग डॉटकॉमच्या नेक्स्टजेन थ्रीडी उत्पादनांच्या इनोव्हेटिव्ह क्षमतांचा विस्तार करत, ही नवीन टूल्स आकर्षक रियल इस्टेट अनुभवात एक मापदंड स्थापित करतात. यातील डीजीप्लॉट हे टूल भूखंडाचे व्यापक थ्रीडी दर्शन घडवते आणि मुख्य ठिकाणांपासून (लँडमार्क्स) त्याचे अंतर दाखवत ते भूखंड विकले गेले आहेत की उपलब्ध आहेत याची माहिती देते. डीजीस्लेट एजंट्सना त्या-त्या प्रकल्पाची एक रियल-टाइम इनसाइट देऊन सक्षम बनवते आणि हे एजंट्स जेव्हा आपल्या ग्राहकांना भेटतात त्यावेळी अद्यतन व्हिज्युअल्स सादर करून ते ग्राहकांचा विश्वास संपादन करू शकतात.


डीजीपोर्ट आणि ड्रोनव्ह्यू ही टूल्स इंटरॅक्टिव्ह मास्टरप्लान टूर आणि एरियल दृष्टिकोनासह  व्हिज्युअलाइझेशनला एका नवीन पातळीवर घेऊन जातात आणि लेआउट व कनेक्टिव्हिटीचा संपूर्ण बोध करून देतात. एआय आणि चॅटजीपीटीद्वारा संचालित फ्लोअरप्लॅन थ्रीडी या सर्व टूल्सना परिपूर्णता देते आणि २डी ब्लूप्रिंट्सचे तपशीलवार, इंटरॅक्टिव्ह थ्रीडी मॉडेल्समध्ये रूपांतर करून ग्राहकांना त्यांचे भावी घर व्यवस्थित तपशिलात जाऊन बघण्याचा अनुभव देते. यामुळे ग्राहक मालमत्ता विकत घेण्याच्या बाबतीत आत्मविश्वासाने आणि माहितीपूर्ण निर्णय सहजपणे घेऊ शकतात.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.