Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*आदिमानवाच्या विश्‍वातील आमिर खानसोबत पुन्‍हा एकदा ‘माइंड चार्ज्ड, बॉडी चार्ज्ड’ मोहिम लाँच केली*

 *आदिमानवाच्या विश्‍वातील आमिर खानसोबत पुन्‍हा एकदा ‘माइंड चार्ज्ड, बॉडी चार्ज्ड’ मोहिम लाँच केली*



नवी दिल्ली, ३१ जानेवारी २०२५: चार्ज्ड हे कोका-कोला इंडियाचे चैतन्यवर्धक पेय आपल्या ‘माइंड चार्ज्ड, बॉडी चार्ज्ड’च्‍या नवीन सीझनमध्‍ये आदिमानवाच्‍या पुनरागमानासह चर्चेत आले आहे. या मोहिमेत दिग्गज अभिनेता आमिर खान आदिमानाच्या अवतारात दिसणार आहे. चार्ज्‍डने २०२५ मधील समरसाठी नवीन मोहिम लाँच केली आहे. ताकद व गतीशीलतेचे प्रतीक असलेला लांडगा (वुल्फ) या नवीन मॅस्कोटसह उत्पादनाला नवीन ओळख देण्यात आली आहे. 


'चार्ज्‍ड'ने अशक्य सोल्‍यूशन्‍स संपादित करण्‍यासोबत शारीरिक चपळता व बुद्धीकौशल्‍य आवश्‍यक असलेले मोठे यश गाठण्‍यासाठी उत्‍प्रेरक म्‍हणून बाजारपेठेत वेगळे स्‍थान प्राप्‍त केले आहे. याच दर्जाला विविध जाहिरातीमधून दाखवण्‍यात आले आहे. यामध्ये आमिर खान यांना आजवर कधीच न दिसलेल्या आदिमानाच्या (केव्हमॅन) अवतारात दाखवण्‍यात आले आहे, जेथे ते जोशात आलेल्या मन व शरीरासह एका अनपेक्षित गोष्टीला तोंड देताना दिसणार आहेत!



या मोहिमेचे सर्जनशील उद्दिष्ट ओगिल्व्हीने विकसित केले आहे. या मोहिमेमध्‍ये आमिर खान यांनी आदिमानाची भूमिका साकारली आहे, जो त्‍यांच्‍या स्‍वत:च्‍या 'चार्ज्‍ड' बॉटलसह अनेक थरारक आव्हानांचा सामना करतो.  

रांगडी तीव्रता आणि आदिम प्रेरणा ही वैशिष्ट्ये असलेल्या अनन्यसाधारण अश्मयुगीन रूपात आमिर खान प्रेक्षकांचे चित्त वेधून घेत आहे. फिल्म्सच्या या मालिकेत आमिर खानने आदिमानवाचे व्यक्तिमत्त्व आपलेसे केले आहे आणि हा आदिमानव अनेक थरारक आव्हानांना तोंड देत आहे, जेथे हा आदिमानव डायनोसरवर मात करताना, डान्स पार्टी सुरू करताना आणि डेट नाइटला अचंबित करणाऱ्या स्थितींचे व्‍यवस्‍थापन करताना पाहायला मिळतो. प्रत्‍येक स्थितीमध्‍ये 'चार्ज्‍ड' त्‍याचे मन व शरीर उत्‍साहित करते, ज्‍यामधून त्‍याला समस्‍यांसाठी अनपेक्षित सोल्‍यूशन्‍स मिळतात. 


कोका-कोला कंपनीच्या स्पार्कलिंग फ्लेवर्स (भारत व नैऋत्य आशिया) विभागाच्या कॅटेगरी हेड सुमेली चॅटर्जी म्हणाल्या,  "ग्राहकांनी विशेषत: स्‍वादासाठी चार्ज्ड पेयाचे भरभरून कौतुक केले आहे. आम्‍हाला आमचे नवीन पॅकेजिंग लाँच करण्‍याचा आनंद होत आहे, जे साहसी, आकर्षक व न थांबणारे आहे आणि त्‍यामधून पेयाची विशिष्‍टता दिसून येते. ब्रँडने सतत नाविनयपूर्ण कथानक सादर केले आहे, जे उत्‍साहवर्धक व अनपेक्षित आहेत. दिग्‍गज अभिनेते आमिर खान यांनी साकारलेली भूमिका आमचा लाडका आदिमानव त्‍याच्‍या आगळ्यावेगळ्या विश्‍वासह परतला आहे.”

आमिर खान म्हणाले, "चार्ज्डचा भाग असणे माझ्यासाठी खरोखर विशेष आहे. या ब्रॅण्डमध्ये धाडस व अस्सलता ही दोन्ही मूल्ये सामावलेली आहेत आणि या मूल्यांबद्दल माझ्या मनात खोलवर आदर आहे. ‘माइंड चार्ज्ड, बॉडी चार्ज्ड’ मोहिम जीवनातील प्रत्येक बाजूमध्ये समतोल व उत्कृष्टतेसाठी प्रयत्नशील राहण्यावरील माझ्या विश्वासाशी सुसंगत आहे. हा सहयोग अनन्यसाधारण अनुभव होता आणि प्रेक्षक याच्याशी कसे जोडून घेतात, हे बघण्यासाठी मी उत्सुक आहे.'' 


ओगील्‍व्‍ही इंडियाचे चीफ क्रिएटिव्‍ह ऑफिसर सुकेश नायक म्‍हणाले, ''चार्ज्‍ड परतला आहे आणि यावेळी आमिर खान अष्‍मयुगीन काळात जात आदिमानवाच्‍या अवतारामध्‍ये दिसणार आहेत. इतिहासपूर्व काळातील विलक्षण साहसांना आधुनिक विश्‍वातील गरजांशी सुरेखरित्‍या संलग्‍न करण्‍यात आले आहे, ज्‍यामधून शारीरिक व मानसिक स्‍वास्‍थ्‍य उत्तम ठेवण्‍याचे महत्त्व दिसून येते. ही मोहिम धमाल व नवीन पद्धतीने टीजीशी संलग्‍न होईल, जे श्रेणीमध्‍ये यापूर्वी कधीच पाहायला मिळाले नाही, तसेच उत्‍साहवर्धक पेयासह प्रेक्षकांना उत्‍साहित करण्‍यात येईल.''  

उत्पादनाचे नवीन लेबल आणि ठळक दृश्यात्मक बदल यांमुळे ते बाजारपेठेत वेगळे उठून दिसेल आणि त्याचे आकर्षण आणखी वाढेल. तुमच्या मनाला व शरीराला चालना देणाऱ्या चार्ज्ड या सळसळत्या पेयाचा आस्‍वाद घ्या!

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.